Sunday, July 12, 2020






लॉकडाऊन कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे
                        -उपसंचालक डॉ.रमण गंगाखेडकर

        पुणे,दि.12:- महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यातल्या त्यात मुंबई, पुणे येथे  कोरोनाचा जास्त प्रभाव झालेला आहे. यामुळे शासनाने दहा दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला असून या लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे, असे मत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे उपसंचालक डॉ.रमण गंगाखेडकर यांनी व्यक्त केले.
            शासनाने घेतलेल्या या लॉकडाऊन कालावधीत प्रत्येकाने हात स्वच्छ धुऊन मास्कचा वापर करावा. लॉकडाऊन मोडणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर घरातील कुठल्याही व्यक्तीला ताप व श्वसनाचा त्रास झाला तर पुढे येऊन तपासणी केली पाहिजे. प्रत्येक डॉक्टर, सुरक्षा कर्मचारी हे आपल्यासाठी सेवा देत आहेत. यासाठी प्रत्येकाने साथ देवून पुढाकार घेऊन स्वत:ला 'कोरोना योध्दे' समजून हा लॉकडाऊन यशस्वी करावा, असे आवाहन उपसंचालक डॉ.गंगाखेडकर यांनी केले.
००००

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...