Thursday, January 31, 2019

प्रधानमंत्री पंधरा कलमी कार्यक्रम अंमलबजावणीचा अल्पसंख्याक आयोगातर्फे आढावा शासनाच्या योजना अल्पसंख्याक समाजापर्यंत पोहोचवा … अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष हाजी अरफात शेख



            पुणे दि. 31 :- अल्पसंख्याक समाजातील नागरिकांची सर्वांगीण प्रगती व्हावी यासाठी, केंद्र राज्य शासनातर्फे विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजना अल्पसंख्याक समाजापर्यत पोहोचवून त्यांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी आज येथे अधिकाऱ्यांना दिले.
            प्रधानमंत्री पंधरा कलमी कार्यक्रमाद्वारे अल्पसंख्याकासाठी योजना राबविण्यात येतात. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष श्री.हाजी अरफात शेख यांनी या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला, त्यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी विजयसिं देशमुख, श्री. शहजाद खान, स्वीय सहायक गणेश सुरवसे उपस्थित होते.
            श्री.हाजी अरफात शेख यावेळी म्हणाले, विविध योजनांची अंमलबजावणी करुन अल्पसंख्यांक समाजाचा विकास व्हावा यासाठी प्रधानमंत्री पंधरा कलमी योजना कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येते. या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करुन, अल्पसंख्याक समाजाचा विकास करावा. अल्पसंख्याक समाजासंदर्भात समाज माध्यमातून गैरसमज पसरवणाऱ्या संदेशांना संबंधित यंत्रणांनी वेळीच पायबंद घालावा. पंधरा कलमी कार्यक्रमाची माहिती अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना करुन देतानाच योजना राबविण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
            बैठकीत डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना, मौलाना आझाद मोफत शिकवणी योजना, अल्पसंख्याक शाळांचा पायाभूत विकास, नई रोशनी योजना, नया सवेरा योजना, शिष्यवृत्ती योजना, वसतिगृह योजना, वक्फ मालमत्ता, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ, मोहल्ला समिती योजनांचा अध्यक्षांनी आढावा घेतला. हज यात्रेकरुंसाठी पुणे येथे हज हाऊस बांधणे तसेच ऊर्दू भवन बांधणे यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. योजनांच्या अंमलबजावणीचा नियमित आढावा घेण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. विविध संघटनांतर्फे यावेळी योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात अध्यक्षांना निवेदने दिली. बैठकीला महसूल विभाग, जिल्हा परिषद, पोलीस विभाग, आरोग्य विभागाचे अधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
                                                             00000





निवडणुकांच्‍या पार्श्‍वभूमीवर जिल्‍हाधिकारी राम यांनी घेतला आढावा
            पुणे, दिनांक 31- आगामी लोकसभा निवडणुकांच्‍या पार्श्‍वभूमीवर निवडणूकविषयक कामकाजासाठी समन्‍वयक अधिकारी नेमण्‍यात आले असून प्रत्‍येकाने आपापली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी, अशा सूचना जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्‍या. जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, उपजिल्‍हाधिकारी विजयसिंह देशमुख आदींसह इतर समन्‍वयक अधिकारी उपस्थित होते.
            प्रारंभी जिल्‍हाधिकारी राम यांनी लोकसभा निवडणुकांच्‍या पार्श्‍वभूमीवर करण्‍यात येणा-या पूर्वतयारीचा आढावा घेतला. प्रत्‍येक समन्‍वयक अधिका-याने सोपविण्‍यात आलेली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी. प्रत्‍येक विभागाकडून मागविण्‍यात आलेली माहिती अचूक आणि वेळेवर देण्‍यात यावी. सर्व समन्‍वय अधिका-यांचे प्रशिक्षण घेण्‍यात येणार असून त्‍याबाबतचा आराखडा तयार करण्‍याच्‍या सूचना त्‍यांनी दिल्‍या. जिल्‍हा निवडणूक व्‍यवस्‍थापन आराखडा तयार करण्‍यात येत असून त्‍यानुसार सर्वांनी आपले कर्तव्‍य पार पाडावे,असेही त्‍यांनी सांगितले.
            निवडणूक आयोगाचा जिल्‍ह्यात दौरा होणार असून त्‍याबाबत सर्व संबंधित अधिका-यांनी नियोजनासह तयार रहावे. अनेक अधिका-यांना यापूर्वीच्‍या निवडणुकविषयक कामाचा अनुभव आहे, ही चांगली गोष्‍ट आहे. तथापि, यावर अवलंबून न राहता निवडणूक आयोगाच्‍या मार्गदर्शक सुचनांचे अवलोकन करुन कार्यवाही करण्‍यात यावी, असेही जिल्‍हाधिकारी राम म्‍हणाले. बैठकीत निवडणूक खर्च व्‍यवस्‍थापन, एक खिडकी योजना, मतदार मदत केंद्र, तक्रार निवारण कक्ष,कायदा व सुव्‍यवस्‍था, निवडणूक प्रशिक्षण, वाहन अधिग्रहण  आदींचा आढावा घेण्‍यात आला. 
0000


Tuesday, January 29, 2019

पोस्टात विमा  प्रतिनिधींची भरती
9 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे अवाहन

            पुणे दि.29:-पोस्टाच्या जीवन विमा योजना व ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेंतर्गत असनाऱ्या विविध विमा योजनांच्या विक्रीसाठी विमा प्रतिनिधींची नेमणूक शिवाजीनगर पुणे ग्रामीण विभागअधीक्षक डाकघर यांचे मार्फत थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. खाली नमूद केलेल्या अटीची पूर्तता असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी अधीक्षक डाकघरपुणे ग्रामीण विभागशिवाजीनगर यांच्या कार्यालयास दिनांक 9 फेब्रुवारी 2019 पर्यंत अर्ज पाठवावेतअसे आवाहन पुणे ग्रामीण डाक विभागाचे अधीक्षक यांनी केले आहे.   
            अर्ज पाठविताना उमेदवाराने आवश्यक कागद पत्रे जन्म तारखेचा दाखलाशैक्षणिक पात्रतेची आवश्यक कागद पत्रे तसेच या क्षेत्रातील अनुभव असल्यास त्या बाबतची कागद पत्रे पाठवावीत शैक्षणिक पात्रता : ५००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या भागात राहणारा उमेदवार हा १० वी पास असावा तसेच ५००० व त्या पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या भागात राहणारा उमेदवार हा १२ वी पास असणे आवश्यक आहे. वय वर्षे १८ ते ६० कोणत्याही कंपनीचे माजी विमा प्रतिनिधी / माजी जीवन सल्लागारअंगणवाडी कर्मचारीमहिला मंडळ कर्मचारीस्वयंसेवी संघटना चालकमाजी सैनिकनिवृत्त शिक्षकबेरोजगार / स्वयंरोजगार असणारे तरुण,तरुणी किवा वरील पात्रता असणारे इच्छुक उमेदवारअर्ज पाठवू शकतात.इच्छुक उमेदवारांनी विमा पॉलीसी  विक्रीचा अनुभवसंगणकाचे ज्ञानस्थानिक भागाची पूर्णत: माहिती असणे अपेक्षित आहे. 
            उमेदवाराची निवड १०वी च्या गुणांवर तसेच उच्च शैक्षणीक पात्रता व मुलाखतीत मिळालेल्या गुणावर केली जाईल.  उमेदवाराने आपले अर्ज रजिस्टर/स्पीड पोस्ट द्वारे साध्या कागदावर शैक्षणिक पात्रता व संबंधित प्रमाणपत्राच्या प्रतीसह लीफाफावर डाक जीवन विमा/ग्रामीण डाक जीवन विमा एजंटची नियुक्ती असे लिहून अधीक्षक डाकघरपुणे ग्रामीण विभागपुणे ४११ ००५ यांचे नावे (अर्ज) दि ०९.०२.२०१९ पर्यंत पोहचतील असे पाठवावे.  अधिक माहितीसाठी कृपया आमच्या www.maharashtrapost.gov.inया वेबसाईट ला भेट द्यावीअसेही पुणे ग्रामीण विभागाचे अधीक्षक डाकघर यांनी कळविले आहे.
००००

Friday, January 25, 2019


विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर यांच्या हस्ते
 विभागीय आयुक्‍त कार्यालय येथे ध्वजारोहण

       पुणे दि.२६- विभागीय आयुक्‍त कार्यालयात विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक  म्‍हैसेकर यांच्‍या हस्ते ध्‍वजारोहरण झाले. यावेळी उपायुक्‍त संजयसिंह चव्‍हाण, उत्‍तम चव्‍हाण यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते शनिवार वाडा येथे ध्वजारोहण
      शनिवार वाड्यावर जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी ध्‍वजारोहण केले. यावेळी अपर जिल्‍हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी ज्‍योती कदम, भाऊसाहेब गलांडे, उपजिल्‍हाधिकारी विजयसिंह देशमुख,  उत्‍तम पाटील, रामदास जगताप,  जिल्‍हा नियोजन अधिकारी प्रमोद केंभावी, तहसिलदार विकास भालेराव, सुनील कोळी, हिरामण गवळी, अर्चना यादव, नागरी संरक्षण दलाचे उप नियंत्रक अनिल आवारे, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, संजय मधाळे आदींसह इतर अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. 
००००









  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...