Friday, August 25, 2017

देश आणि राज्यासमोरील विघ्ने दूर करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे गणरायाला साकडे *पुण्यातील मानाच्या गणपतींचे मुख्यमंत्री यांनी घेतले दर्शन

देश आणि राज्यासमोरील विघ्ने दूर करण्याचे
मुख्यमंत्री फडणवीस यांचे गणरायाला साकडे
 *पुण्यातील मानाच्या गणपतींचे मुख्यमंत्री यांनी घेतले दर्शन

पुणे दि. 25 : “देशासमोरील आणि राज्यासमोरील सर्व विघ्ने दूर करावीत”, अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. पुण्यातील मानाच्या श्री कसबा गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम मंडळाचा गणपती, श्री तुळशीबाग गणपती व श्री केसरीवाडा गणपती या पाच गणपतींबरोबरच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचेही दर्शन मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी घेवून श्रीगणेश चरणी ही प्रार्थना केली.
यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला आदि मान्यवर उपस्थित होते.
कसबा गणपती
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री कसबा गणपतीचे दर्शन घेवून मानाचा पहिला गणपती श्री कसबा सार्वजनिक गणपतीची पुजा केली. तसेच देशासमोरील आणि राज्यासमोरील सर्व विघ्ने दूर करावीत, अशी प्रार्थना श्री गणेशाच्या चरणी केली. यावेळी शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त तयार केलेल्या प्रथम तुला वंदितो या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, उपाध्यक्ष अनिल रुपदे उपस्थित होते.
केसरीवाडा गणपती
सार्वजनिक गणेशोत्सव सुरु होवून 125 वर्षे पूर्ण होत आहेत. पहिल्या दिवशी या ऐतिहासिक पुण्यनगरीत मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्याची संधी मला मिळाली, याचा आनंद होत आहे. लोकमान्य टिळकांनी या गणेशोत्सवाच्या माध्यमातून  सामाजिक अभिसरण घडविले आणि स्वातंत्र्याची ज्योत पेटविली. नवभारत घडविण्याचा आपणास संकल्प करावयाचा आहे. भ्रष्टाचार मुक्त भारत घडवायचा आहे. या केसरीवाडयात येण्याचे मला भाग्य लाभले. लोकमान्य टिळकांचे पुण्यस्मरण मी करतो. बलशाली भारत व महाराष्ट्र घडविण्याची विघ्नहर्त्याकडे प्रार्थना करतो, असे श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
दगडूशेठ हलवाई गणपती
 मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेवून श्री गणेशाची आरती केली. देशाच्या जडणघडणीत तरुणांचा वाटा महत्वपूर्ण असतो. नवभारताच्या निर्मितीसाठी सर्व गणेश भक्तांनी योगदान देण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त तयार केलेल्या श्री गणेश नामावली  या कॅलेंडरचे प्रकाशन मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे, उपाध्यक्ष हेमंत रासने उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी पुण्यातील मानाच्या श्री तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम मंडळाचा गणपती व श्री तुळशीबाग गणपतीचेही दर्शन घेतले. त्यांच्यासोबत लोकप्रतिनिधी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी उपस्थित होते.
000000

नवभारताच्या निर्मितीसाठी शैक्षणिक संस्थांनी योगदान द्यावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवभारताच्या निर्मितीसाठी शैक्षणिक संस्थांनी योगदान द्यावे
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे दि. 25: आपल्या देशा तरुणांची संख्या मोठी आहे, या तरुणाईला मानवसंसाधनात परिवर्तीत करणे आवश्यक आहे. येत्या पाच वर्षात आपल्याला नवभारताची निर्मिती करावयाची असून या प्रक्रीयेत शैक्षणिक संस्थांची भूमीका महत्वाची आहे. शिक्षण संस्थांनी कौशल्यधारित शिक्षण देवून नवभारत निर्मितीत आपले योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
वारजे येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न शैक्षणिक संकुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीष बापटसामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेमहापौर मुक्ता टिळकखासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, आमदार मेधाताई कुलकर्णीआमदार भिमराव तापकीरविभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी सौरभ राव, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विघ्नहर देव, कार्याध्यक्ष प्राडॉगजानन एकबोटेकार्यवाहक प्राशामकांत देशमुखसहकार्यवाहक प्रासुरेश तोडकरप्रा.सौ.ज्योत्सना एकबोटे उपस्थित होते.
श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपला देश सध्या संक्रमाणावस्थेतून जात आहे. आपल्या देशात तरुणाईची संख्या मोठी आहे. या तरूणाईला कौशल्याधारित शिक्षणाची जोड देणे आवश्यक आहे. आपला देश जगाचा मार्गदर्शक व्हावा असे आपले सर्वांचे स्वप्न आहे, हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. येत्या पाच वर्षात भ्रष्टाचार, अस्वच्छता अशा वाईट व्याधींपासून मुक्त असणारा देश आपल्याला घडवायचा आहे. यासाठी प्रत्येक देशवासीयांनी कोणती ना कोणती जबाबदारी उचलली पाहिजे.
माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या कक्षा रुंदावल्या आहेत. गेल्या दोन वर्षात राज्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारला आहे. नवभारत घडविण्यात शिक्षण क्षेत्राची महत्वाची भूमीका आहे. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शासनाने आराखडा तयार केला आहे. त्यामाध्यमातून शासनाचे काम सुरू आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात देशात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या आपल्या राज्याला पहिल्या क्रमांकावर न्यायचे आहे. त्यासाठी राज्यातील 30 हजार शाळा डिजीटल करण्यात आल्या आहेत. सरकारी शाळांबरोबरच खासगी शाळांतूनही दर्जेदार शिक्षण मिळावे ही सरकारची भूमीका आहे. त्यादृष्टीने सरकारने पावले उचलली आहेत.
प्राथमिक शिक्षणाबरोबरच उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. केवळ पदवी देणारी शिक्षण संकुले उभी न राहता ज्ञान आणि संस्कार देणाऱ्या शिक्षण संस्था निर्माण होण्याची आवश्यकता आहे. गुणवत्ता राखण्याचे विद्यापीठांचे काम आहे, महाविद्यालये स्वायत्त असावीत. उत्तम व दर्जेदार शिक्षण हीच त्यामागची भूमीका आहे. पदव्यांबरोबरच रोजगार निर्मिती होण्यासाठी विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

पालकमंत्री गिरीष बापट म्हणाले, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे शिक्षण क्षेत्रात मोलाचे काम आहेया शिक्षण संस्थेच्या माध्यमातून‍ शिक्षण घेतलेले विद्यार्थी अनेक क्षेत्रात चमकले आहेतयेथील विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करण्यावर संस्थेचा भर असतो.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या दिवाकर पारखी, हिरामण जगताप, शारदा हगवणे व रणजित हगवणे यांचा सत्कार करण्यात आलासंस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांच्या हस्ते मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याकडे ‘मुख्यमंत्री सहायता निधीʼसाठी 15लाखांचा धनादेश देण्यात आलामुख्यमंत्र्यांच्या हस्ते संस्थेच्या ‘ज्ञानमयʼ रिसर्च जर्नलचे प्रकाशन, मॉडर्न शैक्षणिक संकुलच्या स्मरणिका, वेबसाईट आणि नूतन संकुलाचे रिमोटद्वारे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष प्राडॉगजानन एकबोटे यांचे भाषण झालेकार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राज्योत्स्ना एकबोटे यांनी केलेतर आभार प्रायशवंत कुलकर्णी  यांनी मानले.

Tuesday, August 22, 2017

महिलांसाठीच्या कायद्यांबाबत व्यापक जनजागृती होणे गरजेचे - विजया रहाटकर

पुणे, दि. 22: महिलांसाठी देशात प्रभावी कायदे असून त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन व्यापक जनजागृती होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले.
अल्पबचत भवन येथे कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारणे) अधिनियम 2013 च्या अंमलबजावणी संदर्भात शासकीय कार्यालयांअंतर्गत तक्रार निवारण समितीच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त लहूराज माळी, राज्य महिला आयोगाच्या सचिव मंजुषा मोळवणे, सदस्या आशाताई लांडगे, सदस्या विंदा किर्तीकर, विधि सेवा प्राधिकरणचे सचिव प्रदिप अब्दुरकर, चिफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट श्रीमती कटारे, प्रशिक्षक व वक्त्या ॲड. अर्चना गोंधळेकर, महिला व बालविकास विभागाचे विभागीय उपआयुक्त प्रशांत शिर्के उपस्थित होते.
 कार्यशाळेस उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना श्रीमती रहाटकर म्हणाल्या, महिला आयोग सदैव आपल्या पाठीशी आहे. अन्याय सहन करु नका, गरज भासल्यास कायद्याची मदत घ्या, राज्यात कोणत्याही ठिकाणी महिला पिडीत असतील किंवा त्यांच्यावर अन्याय-अत्याचार होत असेल त्याठिकाणी महिला आयोग त्याच्या मदतीस तत्पर आहे. महिलांमध्ये त्यांच्या हक्कांची व अधिकारांची जनजागृती करण्यास महिला आयोग नेहमीच प्रयत्नशील आहे. महिलांनी आयोगाची कार्यपध्दती व कायदे समजून घेवून आवश्यक तेथे त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना त्यांनी केल्या. आज ‘पुश’ (PUSH- People United Against Sexual Harassment)  या उपक्रमाअंतर्गत विद्यापीठांच्या माध्यमांतून एकूण पाच लाख विद्यार्थिनींना प्रशिक्षण देण्यात आले आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी आपला देश, आपली प्रशासकीय यंत्रणा व कायदे उत्तमरित्या काम करत आहेत. कार्यक्रमास उपस्थितांनी 9112200200 या दूरध्वनी क्रमांकावर मिस कॉल करुन पाठिंबा दर्शविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी म्हणाले, कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळाविषयी दाद कशी मागावी, 2013 च्या कायद्याअंतर्गत न्याय कसा मिळवावा यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरेल. शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी आयोगाने दिलेले पोस्टर्स आपल्या कार्यालयात दर्शनीय ठिकाणी लावून आपल्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांमध्ये या संदर्भातील जनजागृती करावी. प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालयात महिला तक्रार निवारण समितीची स्थापना करावी, समितीवर जिल्हास्तरिय अधिकारी नेमावेत, तालुका स्तरावर नोडल ऑफिसर नेमावा,  जिल्हा स्तरावर प्रत्येक महिन्याला महिला लोकशाही दिन कार्यक्रम घेवून महिलांच्या समस्यांविषयी प्राप्त होणाऱ्या तक्रारीचा आढावा घेऊन निराकरण करण्यात यावे, अशा सुचना केल्या.
यावेळी महिलांविषयक कायद्यांबद्दलची माहिती पुस्तिका, भित्तिपत्रिका वितरीत करण्यात आल्या. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, पोलीसांची महिलांसाठी मदतीची भूमिका, कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ या पोस्टर्सचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
प्रास्ताविक महिला व बालविकास विभागाचे विभागीय उपआयुक्त प्रशांत शिर्के यांनी केले. महिला व बालविकास विभागाचे आयुक्त लहुराज माळी, ॲड. आशा लांडगे यांनी मनोगत व्यक्त केले. सुनिता ओव्हाळ यांनी आभार मानले.  सुत्रसंचालन दिपक म्हस्के यांनी केले. कार्यशाळेस पुणे जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागातील विविध शासकीय  विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
00000000

Monday, August 14, 2017

कृषी आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या हस्ते मध्यवर्ती इमारत प्रांगणात ध्वजवंदन

पुणे, दि.15- भारतीय स्वातंत्र्याच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त कृषी आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या हस्ते आज मध्यवर्ती इमारतीच्या प्रांगणात ध्वजवंदन झाले. या शानदार समारंभास राज्य शासनाच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कृषी आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी  उपस्थित अधिकारी  आणि  कर्मचाऱ्यांना  शुभेच्छा दिल्या.
00000000

पालकमंत्री गिरीश बापट यांच्याहस्ते पुण्यात मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न

पुणे, दि. १५भारतीय स्वातंत्र्याच्या 70 व्या वर्धापना दिनानिमित्त पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्याहस्ते आज विधान भवनाच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजवंदन झाले. विधान भवन परिसरात सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी ध्वजवंदनाचा शानदार समारंभ पार पडला.
पालकमंत्री गिरीश बापट यांचे सकाळी नऊ वाजता विधानभवन येथे आगमन झाले. विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांतर पालकमंत्र्यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजवंदनानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, प्रशासकीय अधिकारी आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांसह महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, खासदार अमर साबळे, आमदार भिमराव तापकीर, आमदार माधुरी मिसाळ, आमदार शरद रणपिसे, आमदार जयदेव गायकवाड, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी सौरभ राव,अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, पदाधिकारी, नागरिक, पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.
00000000

स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवारवाड्यावर जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण

पुणे, दि.15- स्वातंत्र्य   दिनाच्या  70 व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारवाड्यावर सकाळी 7.30 वाजता जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, उपजिल्हाधिकारी सर्वश्री, शंकरराव जाधव, मोनिका सिंग, दिनेश भालेदार, ज्योती कदम, महसूल आणि इतर विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारीतसेच नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                                                         000000

Saturday, August 12, 2017

पिंपरी चिंचवडला लवकरच पोलिस आयुक्तालय होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -विकास प्रकल्पांचे उदघाटन

पिंपरी चिंचवडला लवकरच
पोलिस आयुक्तालय होईल
        मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -विकास प्रकल्पांचे उदघाटन
पुणे,दि.१२-पिंपरी चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या पाहता पोलिस आयुक्त कार्यालय कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच ते मार्गी लागेल ,असे आश्वासन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या तीन  विकास प्रकल्पांचे उदघाटन आणि दोन प्रकल्पांचे भूमिपूजन झाले.  त्यावेळी ते बोलत होते.  

यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट,  महापौर नितीन काळजे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार बाळा भेगडे,  गौतम चाबूकस्वार,  उपमहापौर शैलजा मोरे,  पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला,  आयुक्त श्रावण बर्डिच आदी उपस्थित होते. भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात हा कार्यक्रम झाला.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा विस्तार अतिशय गतीने होत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड साठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.  लवकरच त्याबाबतच्या आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण केल्यावर पिंपरी चिंचवड साठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय जाहिर केले जाईल,  असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,  राज्याच्या कानाकोपर्यातून रोजगारासाठी पिंपरी चिंचवड येथे नागरिक आले आहेत. येथील उद्योगाने सर्वांना संधी दिली आहे.  आता राज्य शासन या शहराला विकासाची संधी देणार आहे.  या संधीचा पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करतो.

पुण्यापेक्षा जास्त गतीने विकास करण्याचे पिंपरी चिंचवडमध्ये क्षमता आहे.  मात्र महापालिकेने स्वच्छता, कचरा विल्हेवाट आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यावर भर द्यायला हवा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी आवश्यक असणार्या सर्व विकास प्रकल्पांसाठी राज्य शासन प्राधान्याने मदत करेल. त्यासाठी आवश्यक असणारा निधी पुरवला जाईल.

पालकमंत्री गिरीश बापट यांनी पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी राज्य शासन सर्व मदत करण्यासाठी तत्पर आहेच गरज भासल्यास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी दिला जाईल, असे सांगितले.

महापौर नितीन काळजे यांनी प्रास्ताविक केले. आभार स्थायी समिति सभापती सीमा सावळे यांनी केले.  सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. 

यावेळी पुणे पोलीस आयुक्त कार्यालय मार्फत विकसित करण्यात आलेल्या सिटी सेफ मोबाइल अप्लिकेशनचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
-----

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...