Tuesday, June 25, 2019

संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे
पालकमंत्री चंद्रकांत (दादापाटील यांच्या हस्ते पुजन
  
            पुणे,दि.25 :- संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे देहु येथील इनामदार वाडा येथे आज महसूलसार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते  पुजन करण्यात आले.इनामदार वाडा येथून मुक्काम हलवून पालखी आकुर्डीकडे मार्गस्थ झाली. यावेळी वारकऱ्यांच्या आनंदाला उधाण आले होते.
     यावेळी विभागीय आयुक्त डॉदिपक म्हैसेकरजिल्हाधिकारी नवल किशोर रामजिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडेपिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त आरकेपदमनाभन आदींसह संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त उपस्थित होते.
           
           
000






श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयास प्रारंभ
आषाढी वारीत सहभागी वारकरी बांधवांना
सर्वतोपरी सोईसुविधा पुरविण्यासाठी शासन कटीबध्द
-         पालकमंत्री चंद्रकांत (दादापाटील

            पुणेदि. 25 : पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी राज्यभरातून पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेतया वारीत सहभागी वारकरी बांधवांना आवश्यक त्या साईसुविधा पुरविण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन महसूलसार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे केले.
            संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाचा शुभारंभ महसूलसार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या उपस्थितीत आज श्री क्षेत्र आळंदी येथे झालायावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त ॲडविकास ढगे पाटीलविश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई,  विश्वस्त  डॉ.अजित कुलकर्णी,  अभय टिळक आदी उपस्थित होते.
            पालकमंत्री पाटील म्हणालेआषाढी वारी मार्गावर राष्ट्रीय सेवा योजनेचे 35 हजारावर विद्यार्थी वृक्षारोपन करणार आहेतवारकरी बांधवांना जेवणासाठी 50 लाखावर पत्रावळयांचे नियोजन करण्यात आले आहेयासोबतच वारी मार्गावर एक हजार आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेया शिबिराच्या माध्यमातून आवश्यक त्या आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहेतरेनकोटस्वच्छतागृहासोबतच आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.
        आध्यात्मिक ठिकाणाच्या माध्यमातून आध्यात्मिक समाधान मिळतेही समाधानाची बाब असल्याचे सांगून या आध्यात्मिक ठिकाणाच्या माध्यमातून मदतीचेही कार्य विस्तारले जावेशेगाव संस्थानच्या धर्तीवर काम उभे राहावे,अशी अपेक्षा पालकमंत्री श्रीपाटील यांनी व्यक्त केली.
संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच लाख रूपयांचा धनादेश पालकमंत्री श्रीपाटील यांच्याकडे यावेळी देण्यात आला.
     पालखी प्रस्थानानंतरश्री क्षेत्र आळंदी येथील गांधी वाडयात पालखीचा मुक्काम राहणार असून त्यानंतर पुढील प्रवासासाठी पालखी मार्गस्थ होणार असल्याची माहिती यावेळी विश्वस्तांनी दिली.  या सोहळयास वारकरी,नागरीकस्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारीस्वयंसेवक उपस्थित होते.                                                            000




Sunday, June 23, 2019

मुख्‍यमंत्री फडणवीस यांच्‍या हस्‍ते नाना वाड्याचे पुनरुज्जीवन
व "स्वराज्य" क्रांतिकारक संग्रहालयाचे उद्घाटन

       पुणे दि.२३-  पुण्यनगरीचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे काम "स्वराज्य" या क्रांतिकारकांच्या संग्रहालयात झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुणे महानगरपालिकेतर्फे आयोजित पेशवे कालीन नाना वाड्याचे पुनरुज्जीवन व "स्वराज्य" क्रांतिकारक संग्रहालयाचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.
            यावेळी पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, खासदार गिरीश बापट, खासदार संजय काकडे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार विजय काळे, जगदीश मुळीक, महापौर मुक्ता टिळक, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नाना वाड्याचे पुनरुज्जीवन करून महापौर आणि नगरसेवक यांनी अभिनंदनीय कार्य केले आहे. पुण्यामध्ये ऐतिहासिक वास्तूंची कमी नाही. आपल्या देशाला 5000 वर्षांची संस्कृती आहे.
आपण आपल्या देशाचा इतिहास जतन केला पाहिजे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले आहेत, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाणीतून त्या किल्ल्यांची माहिती ऐकण्याची पर्वणी असते. राज्यातील ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन करण्याचे काम राज्य शासनाने दोन वर्षापासून हाती घेतले आहे.रायगड किल्ल्याचे संपूर्णपणे संवर्धन केले जात आहे, तेथे झालेल्‍या उत्खननात अडीचशे पेक्षा अधिक साईट सापडल्या आहेत. त्यातून महाराजांचे देदीप्यमान चित्र समाजापुढे उभे राहणार आहे. आपल्या देशाचा सांस्कृतिक वारसा समाजापुढे आला नाही तर समाज ऊर्जावान होऊ शकत नाही, नाना वाड्याचे पुनरुज्जीवन हा या शृंखलेतील एक भाग आहे.
            नाना वाड्यातील संग्रहालय इतिहासाचं चालते बोलते पुस्तक असून या ठिकाणी देदीप्यमान इतिहास मांडण्याचा प्रयत्न झाला आहे. पुणे महापालिकेच्यावतीने अशा पद्धतीने होणाऱ्या कामास राज्य सरकार पूर्ण मदत करेल, असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा सत्कार मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या बद्दलही मुख्‍यमंत्र्यांनी महापालिकेचे कौतुक केले.
            पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनीही थोडक्‍यात आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या.  मी विद्यार्थी आहे,
असे नम्रपणे नमूद करुन देशाच्‍या स्‍वातंत्र्यासाठी हाल-अपेष्‍टा सहन करणा-या एका तरी क्रांतीकारकाचे
चरित्र पूर्णपणे वाचावे, असे आवाहन केले. मुक्‍या मनाने किती उधळावे शब्‍दांचे बुडबुडे, तुझे पोवाडे गातील पुढचे तोफांचे चौघडे या काव्‍यातून समर्पकपणे आपल्‍या भावना मांडल्या.
 
       खासदार गिरीश बापट यांनी हा एक ऐतिहासिक कार्यक्रम असल्‍याचे सांगितले. पुणे शहराला सांस्‍कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, औद्योगिक वारसा असल्‍याचा उल्‍लेख करुन स्‍मार्ट सिटीच्‍या माध्‍यमातून पुणे शहराला आदर्श शहर बनविण्‍यात येत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. नाना वाड्यातील संग्रहालयामुळे आजच्‍या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्‍वास व्‍यक्‍त करुन आपला इतिहास न विसरण्‍याचे नागरिकांना आवाहन केले.
महापौर मुक्‍ता टिळक यांनी आपल्‍या प्रास्‍ताविकात या संग्रहालयाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून नानावाडा ही वर्ग एक दर्जाची ऐतिहासिक वास्तू असल्‍याचे सांगितले. सन 1740 ते 1750 या कालावधीत पेशव्यांचे मंत्री असलेल्या नाना फडणवीसांनी हा वाडा बांधून घेतला. या वाड्याचे क्षेत्रफळ सुमारे दोन हजार चौ.मी. आहे. या वाड्यामध्ये ब्रिटीशकालीन दगडी इमारत आणि एल आकारातील मूळ पेशवाई वास्तू यांचा समावेश आहे.
            सागवानी लाकडात बनवलेल्या तुळ्या, दगडी खांब, दुर्मिळ मेघडंबरी, नाजूक कलाकुसर असलेले फॉलसिलींग,  दिवाणखाना, दुर्मिळ भीत्तीचित्रे ही या वाड्याची वैशिष्ट्ये आहेत. ही सर्व वैशिष्‍ट्य जतन करण्‍यात आल्‍याचे त्‍यांनी सांगितले. या वाड्यात स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असणा-या क्रांतीकारकांची माहिती असणारे संग्रहालय उभारण्यात आले आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामध्ये तळमजल्यावर असलेल्या अकरा खोल्यात स्वागत कक्ष, उमाजी नाईक, वासूदेव बळवंत फडके, लहुजी वस्ताद या क्रांतिकारकांचे तसेच 1857 चे युध्‍द, आदिवासींचा उठाव, नेमस्तांची चळवळ,  बाळ गंगाधर टिळक,  चापेकर बंधू,  जोतिबा-सावित्रीबाई फुले, शाहू महाराज या समाजसुधारकांचे जीवन चरित्र यामध्ये दर्शविण्यात आले आहे.
            उद्घाटनापूर्वी  मुख्‍यमंत्री श्री. फडणवीस यांनी या संग्रहालयाला भेट देऊन पहाणी केली.
कार्यक्रमास स्‍थायी समिती अध्‍यक्ष सुनिल कांबळे, नगरसेवक श्रीनाथ भिमाले, हेमंत रासने, राजेश येनपुरे, गायत्री खडके, तसेच नागरिक मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. 
००००








दिव्यांग खेळाडूंना दत्तक घेणे हा एक ह्दयस्‍पर्शी उपक्रम- मुख्‍यमंत्री फडणवीस

            पुणेदिनांक 23-क्रीडा क्षेत्रातील दिव्‍यांग खेळाडूंना ग्रॅव्‍हीटी फीटनेस क्लबने दत्तक घेऊन एक चांगला पायंडा पाडला आहे. या खेळाडूंच्‍या करियरला त्‍यामुळे  एक नवी दिशा मिळेलअसा विश्‍वास व्‍यक्‍त करुन हा एक हृदयस्पर्शी उपक्रम असल्‍याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
            बिबवेवाडी परिसरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  ग्रॅव्हिटी फीटनेस  क्लबच्यावतीने क्रीडा क्षेत्रातील 21 दिव्यांग व्यक्‍ती दत्तक घेण्यात आल्या असून त्यांचा सत्कार मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाला.
             यावेळी ज्‍येष्‍ठ विधीज्ञ उज्‍ज्‍वल निकममाजी राज्यमंत्री दिलीप कांबळेसुधीर कुलकर्णीआमदार माधुरी मिसाळमिहीर कुलकर्णीसंजय मोरे आदींची उपस्थिती होती.
            मुख्‍यमंत्री म्‍हणाले,  व्यक्ती शरीराने दिव्यांग नसतो,  तो मनाने असतो.  तो मनाने दिव्यांग होतो तेव्हाच खरा दिव्यांग असतो. मनात उमेदउभारीहिंमतताकद असली तर दिव्यांग व्यक्ती कुठल्याही उंचीपर्यंत जाऊ शकतात. स्वामी विवेकानंद यांनी तरुणांना मंदिरात जाण्याऐवजी फुटबॉलच्या मैदानात जाण्याचा सल्ला  होता. स्‍वामी विवेकानंद म्‍हणाले होतेकालीमातेची पूजा करतांना ताजी व टवटवीत फुले वापरली जातातकोमेजलेली फुले आपण वापरत नाहीतसेच मातृभूमीच्‍या स्‍वातंत्र्यासाठी सुदृढ शरीर असलेली तरुणाईच उपयोगी आहे. चांगले शरीर व चांगले मन ईश्वराला आवडते,  तसेच मातृभूमीलाही चांगले मन व चांगले शरीर असलेली तरुणाई आवडते. ग्रॅव्हिटी क्लबने दिव्यांगाना आवश्यक सुविधांनी परिपूर्ण असलेला क्लब  खुला केला असून त्याचा फायदा होईल आणि नवीन खेळाडूंची टीम तयार होईलअसा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.
            जेष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी ग्रॅव्हिटी क्लब आणि त्यांचे प्रमुख मिहीर कुलकर्णी यांचे कौतुक केले. समाजासाठी काहीतरी करावे ही भावना कुलकर्णी यांनी जपली आहे. शारिरीक स्वास्थ्य उत्तम असेल तर मानसिक स्वास्थ्य उत्तम असते. सुदृढ शरीर असलेल्‍या मनात सकारात्मक विचार येतात. आजही मी कोठेही असलो तरी एक तास व्‍यायाम करतोहे त्‍यांनी आवर्जून सांगितले. शारीरिक संपत्तीचा फायदा होतोअसेही ते म्हणाले
            मिहिर कुलकर्णी यांनी प्रास्‍ताविक केले. माजी राज्यमंत्री दिलीप कांबळेइंडियन बॉडी बिल्‍डींग अॅण्‍ड फीटनेस असोसिएशनचे संजय मोरे यांची यावेळी शुभेच्‍छापर भाषणे झाली. कार्यक्रमात योगेश मेहेरप्रतीक मोहितेसुनील मुलाहअक्षय शेजवळसूर्यकांत दुगावलेजय भवरअमोल कचरेनवनाथ भोगडेप्रियंका कुदळेरवी वाघ या दिव्‍यांग खेळाडूंचा सत्‍कार करण्‍यात आला.
0000






Friday, June 21, 2019

                                  आंतरराष्ट्रीय योग  दिन उत्साहात साजरा

          पुणे, दि21 आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयुष मंत्रालय,भारत सरकार,शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सुचनेनुसार पुण्यामध्ये जिल्हा प्रशासन, शालेय शिक्षण विभाग व उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरु युवा केंद्र, योगा संघटना, बी.जे.महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने  बी.जे.महाविद्यालयाच्या मैदानावर जिल्हास्तरीय योग  दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
                         या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम,  बी.जे. महाविद्यालयाचे  अधिष्ठाता डॉ. ननंदकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उप विभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, तहसिलदार प्रशांत आवटी, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपतराव मोरे, ऑलिम्पीयन मनोज पिंगळे, अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर,  शासकीय अधिकारी, कर्मचारी, शैक्षणिक संस्थांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
                        प्रारंभी प्रार्थनेने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय योग परीक्षक हेमा शहा यांनी उपस्थितांना योगविषयी माहिती दिली. व्यासपीठावर स्कूल ऑफ योगा ॲण्ड रिसर्च सेंटरच्या विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिके करुन दाखविली व त्यानसार उपस्थितांनी योगाभ्यासातील सर्व आसनांची  प्रात्यक्षिके केली.  यावेळी उपस्थ‍ितांना योग मार्गदर्शिका पुस्त‍िकेचे वाटपही करण्यात आले.
                        कार्यक्रमास उपस्थ‍ितांचे स्वागत उपसंचालक अनिल चोरमले यांनी केले तर जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी आभार मानले.
००००





Thursday, June 20, 2019

दौंड तालुक्‍यातील अनधिकृत वाळू उत्‍खनन व वाहतुकीवर उपाययोजना करा
                                      -जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

पुणेदिनांक 20-  दौंड तालुक्‍यातील अनधिकृत वाळू उत्‍खनन व वाहतूक रोखण्‍यासाठी  महसूल, पोलिस,  उप प्रादेशिक परिवहन विभागाच्‍या अधिका-यांनी उपाययोजना कराव्‍यातअशा सूचना जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्‍या. जिल्‍हाधिकारी कार्यालयातील त्‍यांच्‍या दालनात अवैध गौणखनिज वाहतूक तालुका दौंड बाबत जिल्‍हास्‍तरीय समितीच्‍या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ.जयश्री कटारेबारामतीचे अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक जयवंत मिना, दौंड, पुरंदर उप विभागाचे उप विभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, दौंडचे तहसीलदार बाळाजी सोमवंशी, जिल्‍हा खनिज कर्म अधिकारी संजय बामने आदी उपस्थित होते.
 
जिल्‍हाधिकारी राम म्‍हणाले की, तहसील कार्यालयाच्‍या ताब्‍यात असणा-या  57 वाहनधारकाकडून येणारा दंड न भरल्‍यास जुलै अखेर त्‍या वाहनांचा लिलाव करुन दंडाची रक्‍कम वसूल करण्‍यात यावी. उजनी जलाशयाच्‍या अखत्‍यारित अकरा गावांमधील अनधिकृत वाळू उत्‍खनन होत असल्‍यास संबंधित जलसंपदा विभागास जबाबदार धरण्‍यात यावे. भिमा नदीपात्रालगतच्‍या लाणगाव,वाटलूज येथील वन विभागाच्‍या मालकीच्‍या क्षेत्रामध्‍ये अनधिकृत वाळू साठे आढळून आल्‍यास त्‍याबाबत वन विभागाने कारवाई करावी. तसेच महसूल, पोलीस,उप प्रादेशिक परिवहन विभागाने आठवडयातून एकदा विशेष मोहम आखून अनधिकृत वाळू वाहतूक करणारांवर कारवाई करावी. यवत व पाटस या क्षेत्रीय पोलीस विभागानेही सोलापूर-पुणे महामार्गावरुन होणा-या अनधिकृत वाळू वाहतूकीवर कारवाई करावी, अशाही सूचना यावेळी दिल्‍या.
 
यावेळी  उप विभागीय अधिकारीतहसिलदारउप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्‍हाधिकारी कार्यालयातील अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.

00000


  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...