Wednesday, June 27, 2018

नवीन औद्योगिक धोरणावर उद्योगमंत्री
यांनी साधला उद्योजकांशी संवाद


            पुणे, दि. 27 : नवीन औद्योगिक धोरण निश्चित करण्यासाठी उद्योग विभागामार्फत विविध क्षेत्रातील उद्योजकांशी संवाद साधण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्येाग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे उद्योजकांशी संवाद साधला. उद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव सतिश गवई, उद्योग सह संचालक संजय कोरबु, पुणे विभागाचे उद्योग सह संचालक व्ही.एल.राजाळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक के.जी.डेकाटे, विविध उद्योजक संघटनांचे प्रतिनिधी, उद्योजक यावेळी उपस्थित होते.
            उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी उद्योजकांनी केलेल्या सूचनांचा नवीन औद्योगिक धोरण निश्चित करताना प्राधान्याने विचार करण्यात येऊन नवीन औद्योगिक धोरण परिपूर्ण असेल, असे यावेळी सांगितले. नवीन औद्योगिक धोरण ठरवताना औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक आणि रोजगार वाढावा याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. औद्योगिक धोरण ठरवताना महिला उद्योजकांच्या समस्या सोडविण्यात येणार आहे. मोठया प्रमाणावर महिला उद्योजक तयार व्हाव्या, अशी अपेक्षा त्यांनी उद्योजकांशी संवाद साधताना व्यक्त केली. उद्योगांमध्ये विविध क्षेत्रांचा सहभाग वाढत असल्याने, त्या-त्या क्षेत्रात होणाऱ्या उत्पादनांचा विचार करुन औद्योगिक वसाहती निर्माण करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
            या चर्चासत्रादरम्यान विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी आणि उद्योजकांनी औद्योगिक विकासासाठी महत्वपूर्ण सूचना केल्या. 
000






Monday, June 25, 2018

विद्यार्थीच देशाचा कणा आणि केंद्रबिंदू आहेत -पालकमंत्री गिरीश बापट

विद्यार्थीच देशाचा कणा आणि केंद्रबिंदू आहेत
                                     -पालकमंत्री गिरीश बापट
पुणे दि. 25- विद्यार्थी देशाचा कणा आणि केंद्रबिंदू आहेत. त्यामुळे त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण आणि शैक्षणिक सुविधा देण्यासाठीच शासनाच्या विविध योजना आहेत. विद्यार्थी दशेत चांगले शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी स्वत:चे भवितव्य घडवावे, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन तथा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.


येथील अल्पबचत भवन येथे आयोजित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव, अंतर्गत मुला-मुलींच्या वसतिगृहस्तरावरील विविध उपक्रमांचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकास विभागाचे आयुक्त रामचंद्र कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगूरू विलास गायकर, बि. डी. काळे महाविद्यालयाचे प्राचार्य इंद्रजित जाधव, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.
श्री. बापट म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्यांने वेळेचे योग्य नियोजन करावे तरच त्यांना विविध क्षेत्रात यश मिळू शकेल. तसेच शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा योग्य वापर करावा. एखाद्या विषयात परिपूर्ण होण्यासाठी त्या विषयाचा सखोल अभ्यास करा. समाजातील विविध घटनांची माहिती व परिस्थितीची जाण ठेवणारा विद्यार्थी यशाचे शिखर गाठतो. आजच्या स्पर्धेच्या यूगात टिकण्यासाठी व्यवहार ज्ञान असणे आवश्यक आहे. वस्तुस्थितीवर मात करून पुढे जाणे हाच यशस्वी होण्यासाठीचा मार्ग असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. जन्म हा आपल्या हातात नसला तरी देखील जन्मभर चांगला माणूस म्हणून जगणे आपल्या हातात आहे, त्यासाठी शिक्षण घेणे गरजेचे आहे. शासनाच्या विविध प्रकल्पांमधुन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक तसेच सर्वांगीण विकास होणे महत्वाचे असल्याने त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले. 
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते, स्टार्टअप ट्रायबल या योजनेचे तसेच संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. तसेच पुणे विद्यापीठाबरोबर वस्तिगृहातील शैक्षणिक प्रगतीबाबत आढावा घेण्यासाठीचा सामंजस्य करार तसेच वसतिगृहातील विविध कामांचे मुल्यमापन करण्यासाठीचा गोखले महाविद्यालया सोबतचा सामंजस्य करार यावेळी त्यांच्या हस्ते सबंधितांकडे हस्तांतरीत करण्यात आला. तसेच ज्ञानदर्पन या पुस्तकाचे, वस्तिगृह व आश्रमशाळेच्या कॅलेंडरचे प्रकाशन श्री. बापट यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आदिवासी विकास विभागाचे आयुक्त रामचंद्र कुलकर्णी यांचा निवृत्ती सत्कार देखील करण्यात आला.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

वसतीगृहातील विद्यार्थांची गुणवत्ता मुल्यमापनासाठी विशेष कक्ष 
अदिवासी वसतीगृहात राहणाऱ्या आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत विविध महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मुल्यमापन करण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यार्थांना शैक्षणिक सुविधा, तसेच कमी गुण असणाऱ्या किंवा उत्तम गुण असणाऱ्या विषयाचे विशेष प्रशिक्षण देण्यासाठी हे मुल्यमापन करण्यात येणार असून त्यासाठी पुणे विद्यापीठा सोबत हा सामंजस्य करार केला असल्याचे देखील श्री. प्रसाद यांनी सांगितले.

00000

Friday, June 22, 2018

बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र
देशासाठी रोल मॉडेल – उपराष्ट्रपती नायडू

 बारामती दि.22 : -  कृषी,विज्ञान,शिक्षण क्षेत्रात बारामतीने घेतलेली झेप कौतुकास्पद आहे. येथील  कृषी विज्ञान केंद्र हे देशातील सर्व कृषी विज्ञान केंद्रासाठी रोल मॉडेल आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी केले.
 बारामती मधील कृषी विज्ञान केंद्र, शारदानगर शैक्षणिक संकुल आणि विद्या प्रतिष्ठान येथील संग्रहालयाला भेट दिल्यानंतर उपराष्ट्रपती नायडू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री अजित पवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे आदींची उपस्थिती होती.
बारामती येथील कृषी तंत्रज्ञान, शिक्षण क्षेत्रात झालेली प्रगती सर्वांनी आवर्जून पाहण्यासारखी आहे. याशिवाय कृषी क्षेत्रात येथील कृषी विज्ञान केंद्रात झालेले संशोधनही इतर अभ्यासकांना उपयुक्त आहे, असे सांगून उपराष्ट्रपती नायडू म्हणाले, कृषी विस्तार क्षेत्रात सर्व कृषी विज्ञान केंद्रांनी काम करण्याची गरज आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेनेही संशोधनात मुलभूत काम केले आहे. ते शेतक-यांपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी कृषी विज्ञान केंद्राची असल्याचे त्यांनी नमूद केले.
                          देशातील शेतक-यांपुढे  आणि शेतीसमोर आव्हाने भरपूर आहेत. मात्र त्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी येथे संशोधन क्षेत्रात होत असलेले काम मूलभूत स्वरूपाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
                          उपराष्ट्रपतीपद स्वीकारल्यानंतर आपण केवळ एकाच ठिकाणी न थांबता देशातील चांगल्या संशोधन संस्था, कृषी संस्था, विद्यापीठे यांना आवर्जून भेट देत आहे. तेथील संशोधन, नवीन प्रकल्पांची माहिती घेत असलयाचे श्री.नायडू यांनी नमूद केले.

                           दरम्यान पत्रकारांशी संवाद साधण्यापूर्वी श्री.नायडू यांनी विद्या प्रतिष्ठान येथील संग्रहालयाला भेट दिली. याठिकाणी श्री.पवार यांना विविध ठिकाणांहून भेट मिळालेल्या वस्तू, त्यांची छायाचित्रे यांची श्री. नायडू यांनी पाहणी केली. पाहणीवेळी नायडू हे भारावून गेले होते.
                        "हे संग्रहालय एक असामान्य व्यकतीमत्वाचं व्यक्तीचित्रण करणारे प्रतिबिंब आहे. अतिशय मौल्यवान असा हा ठेवा असून अतिशय उत्कृष्ट पध्दतीने तो जतन करण्यात आला आहे. नवीन युवा पिढीस हा ठेवा निश्चित मार्गदर्शक ठरेल", असा अभिप्राय यावेळी श्री.नायडू यांनी अभिप्राय नोंदवहीत नोंदवला.
                       यावेळी त्यांनी श्री.पवार, श्रीमती सुळे, पालकमंत्री बापट,श्री.अजित पवार, विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ए.व्ही.प्रभुणे, रजिस्ट्रार कुंभाजकर यांच्यासह या संग्रहालयाची पाहणी केली.
                     विभागीय आयुक्त डॅा.दिपक म्हैसेकर,विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे – पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक सुवेझ हक आदींची उपस्थिती होती.

0 0 0 0

कृषी विज्ञान केंद्रातील संशोधनाने उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू प्रभावीत

 कृषी विज्ञान केंद्रातील संशोधनाने
   उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू प्रभावीत

बारामती, दि. २२ - बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रातील शेती संशोधनाने उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आज प्रभावीत झाले. कृषी केंद्रातील विविध संशोधन आणि प्रायोगिक प्रकल्पाचे त्यांनी कौतुक केले.
              उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज माळेगाव (ता. बारामती) येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली. यादरम्यान त्यांनी इंडो-डच सेंटर फॉर व्हेजिटेबल एक्सेलन्स, पशुजनुकीय सुधारणा केंद्र, कृषी विज्ञान केंद्राची प्रशासकीय इमारत अशा विविध ठिकाणांची पाहणी केली. त्यांनी केंद्रातील प्रायोगिक प्लॉटवर जाऊन उत्पादन पाहिले.
            उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे सकाळी पावणेदहाच्या सुमारास कृषी विज्ञान केंद्र येथे आगमन झाले. त्यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार यांनी त्यांचे स्वागत केले.
उपराष्ट्रपती श्री. नायडू यांनी प्रथम केंद्रातील ग्रीनहाऊसमधील सिमला मिरचीच्या प्लॉटला भेट दिली. केंद्राचे प्रमुख संशोधक सय्यद  शाकीर अली यांनी त्यांना मिरचीचे वाण, उत्पादकता व त्यातून मिळणारे उत्पन्न याबाबत माहिती दिली. इंडो-डच सेंटर फॉर व्हेजिटेबल एक्सेलन्सच्या माध्यमातून पिकविण्यात येणाऱ्या विविध भाज्यांची उत्पादकता कशी वाढवता येईल, या तसेच त्याचा प्रसार केला जाण्यासाठी केंद्राकडून करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती उपराष्ट्रपती श्री. नायडू यांनी घेतली.


उपराष्ट्रपती श्री. नायडू यांनी मधुमक्षिका पालन आणि पशुजनुकीय संशोधनाबाबत माहिती घेतली. तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशासकीय इमारतीमध्ये त्यांनी संपूर्ण कृषी विज्ञान केंद्राच्या प्रकल्पाच्या प्रतिकृतीची पाहणी केली.
त्यानंतर कृषी विज्ञान केंद्रातील सभागृहात राजेंद्र पवार यांनी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचा शाल, बैलगाडीची प्रतिकृती आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. रणजित पवार यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांचा सत्कार केला. यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी कृषी विज्ञान केंद्राची प्रगती आणि विविध संशोधन व प्रायोगिक प्रकल्पांवर आधारित माहितीपट पाहिला.
         
यावेळी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, शुभांगी पवार, डॉ. लखन सिंग आदी उपस्थित होते.

00000
 उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी विद्यार्थ्यांकडून घेतली नावीन्यपूर्ण प्रयोगांची माहिती

       दिनांक 22-उपराष्‍ट्रपती  व्‍यंकय्या नायडू यांनी आज बारामती येथील शारदानगर शैक्षणिक  संकुलातील विद्यार्थ्‍यांनी केलेल्‍या नावीन्‍यपूर्ण उपक्रमांची माहिती घेऊन आनंद व्‍यक्‍त केला.

नीती आयोगाकडून शेतीशी निगडीत उद्योग उभारणीसाठी कृषि महाविद्यालयास मंजूर झालेल्‍या भारतातील दुस-या व महाराष्‍ट्रातील पहिल्‍या अटल इन्‍क्‍युबेशन सेंटर आणि अटल टिंकरिंग लॅबच्‍या विद्यार्थ्‍यांशी उपराष्‍ट्रपती  श्री. नायडू यांनी संवाद साधला. संस्‍थेच्‍या दहावीच्‍या विद्यार्थ्‍यांनी तयार केलेल्‍या विविध उपकरणांची माहिती त्‍यांनी जाणून घेतली. टाकाऊतून खेळणी, पवनचक्‍की, अविष्‍कार स्‍वच्‍छता यंत्र, चरख्‍यातून वीजनिर्मिती, ऑब्‍स्‍टॅकल अॅव्‍हॉयडर, ऑटोमॅटीक रेन अलार्म सिस्‍टीम, थ्रीडी प्रिंटर, गॅस सुरक्षा यंत्र, कम्‍युनिकेशन ऑफ डिव्‍हाईसेस युझींग वायफाय, टच सेन्‍सर अशा विविध उपकरणांची उपराष्‍ट्रपतींनी पहाणी केली. याशिवाय  नेदरलँड एज्‍युकेशन प्रोग्राम, सीबीई बेस्‍ड एज्‍युकेशनल थिम्‍सची माहिती घेतली. अॅग्रीकल्‍चरल डेव्‍हलपमेंट ट्रस्‍ट,  बारामती कृषी महाविद्यालयाच्‍या तसेच शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांनी जमीनीचा पोत सुधारण्‍यासाठी  तसेच पीक उत्‍पादकता वाढीसाठी तयार केलेल्‍या उत्‍पादनांची माहितीही उपराष्‍ट्रपतींनी घेतली.

           यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, अन्‍न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री अजित पवार, जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष विश्‍वासराव देवकाते, सुनंदा पवार, शुभांगी पवार, रोहित पवार, रणजीत पवार, राजेंद्र पवार, नीलेश नलावडे, डॉ. एस.पी. महामुनी, प्रा. संतोष कर्णेवार, प्रा. सोनाली सस्‍ते, तेजश्री गोरे, सुनील पवळ,  सूर्यकांत मुंढे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
        विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्‍ण प्रकाश, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील, अपर जिल्‍हाधिकारी रमेश काळे, जिल्‍हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक, बारामतीचे  उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, उपविभागीय अधिकारी संजय अस्‍वले, बारामतीचे तहसिलदार हनुमंत पाटील,  हेही यावेळी उपस्थित होते.

0 00 0

Thursday, June 21, 2018

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे
 विमानतळावर स्वागत


बारामती  दि.22 :-    उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे आज बारामती येथील विमानतळावर आगमन झाले.
                     यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, माजी मंत्री अजित पवार, बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर,विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, अपर जिल्हाधिकारी रमेश काळे,जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक, बारामतीचे उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, बारामतीचे तहसिलदार हनुमंत पाटील आदींची उपस्थिती होती.
0000



सुदृढ लोकशाहीसाठी पारदर्शी आणि जबाबदारीपूर्ण काम व्हावे
उपराष्‍ट्रपती व्‍यंकय्या नायडू
 पुणे दि. 21 (विमाका):  पुणे शहराला  ऐतिहासिक वारसा लाभलेला असून देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून या शहराची ओळख आहे.महानगरपालिकेने सुंदर सभागृह बांधले असून या सभागृहातून जनहिताचे चांगले निर्णय व्हावे आणि  सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न व्हावा.सुदृढ लोकशाहीसाठी पारदर्शी आणि जबाबदारीपूर्ण कामकाज व्हावेअसे प्रतिपादन उपराष्‍ट्रपती व्‍यंकय्या नायडू यांनी केले.

पुणे महानगरपालिकेच्‍या नवीन विस्‍तारीत इमारतीचे उद्घाटन उपराष्‍ट्रपती व्‍यंकय्या नायडू यांच्‍या हस्‍ते झालेत्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्‍हणून  मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. कार्यक्रमास  केंद्रीय मनुष्‍यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकरराज्‍याचे अन्‍न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राज्‍याचे सामाजिक न्‍याय राज्‍यमंत्री दिलीप कांबळेजलसंपदा व जलसंधारण राज्‍यमंत्री विजय शिवतारेखासदार अनिल शिरोळेमहापौर मुक्ता टिळकउपमहापौर सिध्दार्थ धेंडेस्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीकसभागृह नेते श्रीनाथ भिमाले,मनपा आयुक्त सौरभ राव आदि उपस्थित होते

आपण अनेक ठिकाणी जावून आलो पण असे सुंदर आणि देखणे सभागृह कुठेही पाहायला मिळाले नाहीअसे गौरवोद्गार काढून उपराष्‍ट्रपती व्‍यंकय्या नायडू पुढे म्हणालेया शहराविषयी नेहमीच मनात आदर व आकर्षण राहिले आहेया शहराने देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात अमुल्य योगदान दिले आहेमुंबईनंतर देशात पुण्याची  ओळख आहेझपाट्याने विकसित होणाऱ्या या पुणे शहराने केंद्र व राज्यशासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून स्वच्छसुंदर आणि हिरवेगार शहर निर्माण करावेअशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पुणे शहराचा स्मार्टसिटी योजनेत समावेश झाला आहेयातील सर्व योजनांच्या कामात पारदर्शीपणा आणि उत्तरदायित्व जोपासले जावे.नागरिकांना कालचे पुणेआजचे पुणे आणि उद्याचे पुणे याबाबत समजावून सांगितल्यास त्यांचाही सहभाग याकामी लाभू शकतोनागरिकांना प्राथमिक गरजा उपलब्ध करुन देतांनाच ऑनलाईन सुविधा पुरविण्याच्या प्रयत्न केला जावारस्ते तसेच नद्यांवरील अतिक्रमणे दूर व्हावीतनद्यांमध्ये सांडपाणी सोडले जावू नयेयासाठी जनजागृती करावीअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शारीरिक श्रम नसल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याचे नमूद करुन त्यांनी सायकल ट्रॅक्सची आवश्यकता प्रतिपादन केलीआरोग्य हीच संपत्ती या उक्तीचा उल्लेख करुन ते म्हणालेधनसंपत्ती असूनही मधूमेहहायपर टेन्सन या सारखे रोग असतील तर त्या संपत्तीचा काय उपयोग ?महापालिकेने नागरिंकाच्या आरोग्याचीही काळजी घ्यावीअसे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
          मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यावेळी आपल्या प्रमुख भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेउपराष्ट्रपती या कार्यक्रमासाठी आलेयाबद्दल राज्याचे प्रमुख या नात्याने त्यांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतोपुणे महानगरपालिकेने सुंदर आणि देखणे सभागृह बांधले आहेया सभागृहाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव दिल्याने अधिक महत्व वाढले आहेछत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार चालवताना नेहमीच रयतेचा विचार केलासामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून सर्व घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केलात्यांचे विचार व आचार अंमलांत आणून या सभागृहातून कामकाज चालावेअशी अपेक्षा व्यक्त करुन मुख्यमंत्री पुढे म्हणालेपुणे हे ऐतिहासिक शहर आहेया शहराला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेला आहेत्यांच्या कार्याने ही भूमी पुनित झालेली आहे.
          सांस्कृतिक बरोबरच ज्ञाननगरी म्हणून पुण्याचा देशभर नावलौकिक आहे.        21  व्या शतकात मुंबईनंतर पुणे हे विकासाचे इंजिन म्हणून काम करणार असल्याचे सांगून ते पुढे म्हणालेपुणे हे आंतरराष्ट्रीय शहर व्हावेयासाठी विविध विकासाची कामे आपण राबवित आहोतपुणे महामेट्रो,रिंगरोड हे विकासाचे मॉडेल ठरणार आहेपुणे येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊ घातले असून पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा व मुठा या नदीचे पुनर्जीवन करण्याचे काम हाती घेतले आहेयाशिवाय स्वारगेट येथे ट्रान्सपोर्ट हब होत आहेप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे स्मार्ट सिटीचे उद्घाटन झाले होतेत्यांच्या स्वप्नातले हे शहर आदर्शसुंदर व देखणे होण्यासाठी राज्यशासनाचे पाठबळ असणार आहे.
          पुण्याचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा यापुढेही अधिक जोमाने सुरु राहावायासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन करुन  मुख्यमंत्री पुढे म्हणालेविकासासाठी सर्वांनी एकत्र येवून काम करावेया सभागृहातून चांगले निर्णय व्हावेअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी केंद्रीय मनुष्‍यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर म्हणालेहे सभागृह देखणे झाले आहेविकासासाठी सर्वांनी एकत्र येवून काम करावे.
          यावेळी पालकमंत्री गिरीश बापट आपल्या मनोगतात म्हणालेपुण्याचा डीपी मंजूर झाल्याने विकासाच्या वाटा मोकळ्या झाल्यासामान्यांना केंद्रबिंदू मानून पुण्याचा विकास सुरु आहेशहराच्या विकासासाठी कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
          यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात पुणे शहराची ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी स्पष्ट करतांना शहराने केलेल्या विकास कामाची व होऊ घातलेल्या विविध योजनांची माहिती दिलीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे शहर नावलौकिक मिळवेलअसा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपमहापौर सिध्दार्थ धेंडे यांनी मानलेयावेळी लोकप्रतिनिधी,अधिकारी उपस्थित होते.
       
ठळक वैशिष्ट्ये
·                     पुणे महानगरपालिकेचे सध्याचे क्षेत्रफळ सुमारे 250 चौ. कि.मी असून नव्याने समाविष्ट 11 गावांसहीत क्षेत्र सुमारे 331 चौ. किमी. इतके झाले आहे. सध्याची लोकसंख्या सुमारे 40 लक्ष  इतकी असून 167 नगरसेवक आहेत. वाढत्या लोकसंख्येचा कारभार त्या त्या भागातून चालण्याच्या दृष्टीने क्षेत्रिय स्तरावरील 15 क्षेत्रिय कार्यालये कार्यरत आहेत.
·                     पुणे मनपाचा वाढलेला विस्तार विचारात घेऊन अस्तित्वातील इमारतीच्या दक्षिण बाजूस चौरस आकारात एका नवीन विस्तारीत इमारतीचे दुमजली बेसमेंट पार्किंग अधिक चार मजले अशा स्वरूपाचे इमारतीचे बांधकाम पूर्ण केले असून वापरासाठी एकूण सुमारे अंदाजे 14 हजार चौ.मी. क्षेत्र उपलब्ध झाले आहे.
·                    या मध्ये तळमजल्यावर सर्व विभागांसाठी एकत्रित असे नागरिक सुविधा केंद्रएक खिडकी योजना कक्षपोस्ट ऑफिसबँक ए.टी.एम,पीएमपीएमएल पास केंद्र इ. सुविधा करण्यात आल्या आहेत.
·                    पहिल्या मजल्यावर विविध पक्ष कार्यालये व नगरसचिव कार्यालय करण्यात आली आहेत. दुस-या मजल्यावर सभागृह नेतास्थायी समिती अध्यक्षउपमहापौरविरोधी पक्षनेता व विविध समिती अध्यक्ष यांची दालने तसेच स्थायी समिती सभागृह इतर समिती सभागृहपत्रकार कक्ष व विविध पक्ष पदाधिकारी कार्यालय बांधण्यात आली आहेत.
·                    तिस-या मजल्यावर 72 फूट व्यासाचे घुमटाकार मुख्य सभागृहाचे व महापौर दालनाचे बांधकाम करण्यात आले आहे. मुख्य सभागृहाचे व महापौर दालनाचे बांधकाम करण्यात आले आहे. मुख्य सभागृहासाठीलोखंडी फ्रेम व जी.आर.सी. (ग्लास रिनर्फोर्स्ड कॉन्क्रीट) मटेरियलचा गोलाकार घुमट करण्यात आला असून घुमटाची उंची तळापासून सुमारे 60 फूट इतकी आहे. नवीन सभागृहामध्ये 224 सभासदांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रेक्षक गॅलरीमध्ये 180 नागरिकांकरीता आसन व्यवस्था केलेली आहे. महापौर यांच्या डायसच्या मागील बाजूस 50 अधिकारी व त्या मजल्यावर सुमारे 50 पत्रकारांसाठी कक्षाची रचना केली आहे.
·                    इमारतीसाठी अद्ययावत वातानुकूलीत यंत्रणा, 6 उद्वाहने व वीजेची बचत होणारी एल.ई.डी दिव्यांची विद्युत व्यवस्था करण्यात आलेली आहे. या इमारतीचे बांधकाम हे पर्यावरण पुरक निकषांन्वये करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे सुसज्ज अग्निशमन यंत्रणा व फायर अलार्म सिस्टिम करण्यात आली आहे.
·                     आजपर्यंत या कामासाठी सुमारे 48.75 कोटी रुपये इतका खर्च झाला आहे. या इमारतीचे बांधकाम सुमारे सव्वातीन वर्षात पूर्ण करण्यात आले असून यामुळे पुणे महानगरपालिकेस नवीन सुसज्ज वास्तू उपलब्ध झाली आहे.

000000

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे पुणे विमानतळावर स्वागत

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे पुणे विमानतळावर स्वागत
  उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे आज वायुसेनेच्या विमानाने पुणे येथील लोहगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पुणे येथील विविध समारंभास उपस्थित राहण्यासाठी पुण्यात त्यांचे आगमन झाले आहे.
  यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापटसामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेपुण्याच्या महापौर मुक्ता टिळकखासदार अनिल शिरोळेलेफ्टनंट जनरल मनोज पांडेविभागीय आयुक्त दीपक म्हैसेकरपोलीस आयुक्त रश्मी शुक्लाजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही उपराष्ट्रपती महोदय यांचे स्वागत केले.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.






























शेतीच्या शाश्वत विकासासाठी प्रयोगशाळेतील तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता -उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

शेतीच्या शाश्वत विकासासाठी
प्रयोगशाळेतील तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता
-उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
            पुणे दि. २१ : शेती क्षेत्राच्या विकासासाठी सिंचनपायाभूत सुविधागुंतवणूक आणि विमा क्षेत्रांना बळकट करून प्रयोगशाळेतील तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे. कृषी उत्पादनाच्या विपणन व्यवस्थेला बळकटी देण्याबरोबरच शेतकऱ्यांना ज्ञानतंत्रज्ञान आणि पतपुरवठा केल्यास त्यांची उत्पादकता वाढेल. शेतकऱ्यांच्या ज्ञानात आणि त्यांच्याकडील तंत्रज्ञानात भर घालण्यासाठी सर्वांना  शेतकऱ्यांसोबत काम करावे लागेलअसे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज व्यक्त केले.
येथील वैकुंठ मेहता सहकार व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेमध्येआयोजित कृषी क्षेत्र शाश्वत व फायदेशीर बनविण्याविषयी आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमाजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवारज्येष्ठ शास्त्रज्ञ तथा कृषी तज्ज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथनएस. के. पट्टनायकआय. व्ही. सुब्बा रावटी. चटर्जीआंध्रप्रदेशचे माजी कृषीमंत्री व्ही रावअशोक गुलाटी उपस्थित होते.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणालेशेती व्यवहार्यफायदेशीर आणि शाश्वत  बनविण्यासाठी बहुस्तरीय धोरण विकसित करण्याची गरज आहे. कृषी उत्पादनात आपण मोठी प्रगती केली असून  अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झालो आहे. मात्र यापुढे आपल्याला रासायनिक खते व औषधांच्या वापरावर नियंत्रण आणण्याची आवश्यकता आहे.तरच आपण शाश्वत शेतीकडे जावू शकतो. शेतीमधून शाश्वत उत्पादन मिळत नसल्याने अनेक जण शेतीपासून तुटत आहेत. विविध उपाययोजनांचा अवलंब करून आपल्याला शेतीला शाश्वत केले पाहिजे. तरुणांना शेती व्यवसायाकडे वळविण्यासाठी आपल्याला प्रयत्न करण्याची आवश्यकताआहे. कृषी क्षेत्रासमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

         फळेभाजीपालामसालेडाळीआणि ऊस यांसारख्या उच्च मूल्यांच्या पिकाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. उत्पादन वाढीबरोबरच आपल्याला अन्नधान्याच्या कार्यक्षम वितरणाची गरज आहे. शेतकऱ्यांना पीक पध्दतीकापणी नंतरची प्रक्रिया आणि अन्नप्रक्रिया तंत्रज्ञानाविषयी सल्ला देण्यासाठी कृषि विज्ञान केंद्रांनी अधिक लोकाभिमूकपणे काम करण्याची आवश्यकता आहे. आपल्याला शेती क्षेत्र सुधारण्यासाठी काही अर्थपूर्ण आणि व्यावहारिक उपाय शोधून सध्याच्या धोरण व कार्यक्रमांचे सुसूत्रीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेराज्यातील ५० ते ५५ टक्के जनता आजही कृषी क्षेत्रावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अवलंबून आहे. मात्र राष्ट्रीय सकल उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा केवळ १० टक्के आहे.  यासाठी कृषी क्षेत्रात अधिकाधिक गुतंवणूक होण्याची आवश्यकता आहे. गुंतवणुकीच्या माध्यमातूनच कृषी क्षेत्राचा शाश्वत विकास शक्य आहे. त्यासाठी राज्य शासन कृषी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी प्रयत्नशील आहे. कृषी क्षेत्राच्या विकासावर अनेक घटकांचा परिणाम होतोत्यात मान्सूनचा मोठा वाटा आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे कृषी क्षेत्रावर मोठा ताण येतो. जलव्यवस्थापनाच्या माध्यमातून या समस्येवर मात करता येते. महाराष्ट्रात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून यावर मात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जलयुक्त शिवार’ अभियान हे शास्त्रशुद्ध प्रक्रीया असणारी चळवळ आहे. या माध्यमातून राज्यातील अनेक खेडी जलस्वयंपूर्ण झाली आहेत. शेकडो गावे पाणीदार झाली असून त्याठिकाणी संरक्षीत सिंचन शेतीसाठी उपलब्ध झाले आहे. गेल्यावर्षी सरासरीच्या ८० टक्के पाऊस होऊनही शेती उत्पादन ११० टक्के झालेहे योग्य प्रकारे जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापनामुळेच शक्य झाले.
            मुख्यमंत्री पुढे म्हणालेजलसंधारणाच्या विविध उपययोजनांमुळे शेती उत्पादनात वाढ झाल्याने कृषी मालाच्या दरा विषयी अडचण निर्माण झाली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या कृषी मालाला योग्य दर देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठया प्रमाणावर कृषिमाल खरेदी केला आहे. शाश्वत शेतीसाठी शेती आणि शेतकऱ्यांसमोर मार्केट लिंकेज हे सगळ्यात मोठे संकट आहे. शेतकऱ्याच्या उत्पादित कृषी मालाला योग्य बाजारपेठ मिळवून देणे आवश्यक आहे. त्याच बरोबर छोटी जमीनधारणा ही सुध्दा शाश्वत शेतीसमोरील मोठी समस्या आहे. यासाठी शासन गट शेतीला चालना देण्यासाठी प्रयत्नशील आहे. गट शेतीला चालना देण्यासाठी शासनाच्यावतीने विविध योजना आखण्यात आल्या आहेत. कृत्रिम बुध्दीमत्ते सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती क्षेत्रात तंत्रज्ञान आणणे आवश्यक असून यासाठी शासन प्रयत्नशील आहे. केंद्र सरकारच्यामाध्यमातून सुरू असणारी स्वराज्य ते सुराज्य ही चर्चासत्राची शृंखला अत्यंत महत्वाची आहे. या माध्यमातून देशातील कृषी क्षेत्रात मोठा बदल घडण्यास मदत होईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी खासदार शरद पवार म्हणालेगेल्या काही वर्षात भारत हा कृषीमाल निर्यातदार देश झाला आहे. देशातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी त्यांच्या कौशल्य विकासव्यापार कौशल्य आणि कृषी क्षेत्रात येणाऱ्या नवनव्या तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याची आवश्यकता आहे. तसेच शेतकऱ्यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगांना चालना देण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी हे चर्चासत्र उपयुक्त आहे.
 यावेळी  डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनी ग्रीन टू एव्हरग्रीन फॉरेव्हर या विषयावर सादरीकरण केले. यावेळी त्यांनी आपल्या देशातील शेतीसमोर असणाऱ्या विविध आव्हानांचा आढावा घेतला. शेतीच्या शाश्वत विकासासाठी उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.
यावेळी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञसंशोधकशास्त्रज्ञ उपस्थित होते.
00000

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...