Tuesday, July 23, 2019

जलशक्ती अभियानाचा घेतला आढावा
जलशक्ती अभियानात सर्व घटकांचा व्यापक सहभाग आवश्यक
                                                            -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

            पुणे दि. 23- जलशक्ती अभियानाची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी व्हावी, नागरिकांमध्ये त्याचा सकारात्मक संदेश जावून त्यांचा सहभाग मिळावा, स्थानिक स्तरावर काम करण्याच्या अनुषंगाने सर्व घटकांचा व्यापक सहभाग जलशक्ती अभियानात मिळेल, यासाठी विविध यंत्रणांनी स्थानिक पातळीवर नियोजन करावेअशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या आहेत.
            केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत देशातील दुष्काळी भागातील जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यासाठी जलशक्ती अभियान ( जे.एस.ए .) राबविण्यात येत आहे. जलसंधारण आणि पाऊसपाणी संकलनपारंपरिक व इतर पाण्याच्या संरचनांचे नूतनीकरणपाणलोट क्षेत्र विकास यावर भर देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शिरूर आणि पुरंदर तालुक्यांचा समावेश आहे. या अनुषंगाने या अभियानाची सद्यस्थिती व सुरू असलेल्या कामांचा आढावा जिल्हाधिकारी राम यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस वनविभागसामाजिक वनीकरणपाटबंधारे विभाग, कृषीमहसूल आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
            जलसंवर्धन आणि पाऊस पाणी संकलनाच्या दृष्टीने जिल्ह्यात झालेली कामेत्यांची सद्यस्थितीत्यावर करावयाच्या उपाययोजनाचेक डॅमतळेट्रेंचछतावरील पाण्याचे संकलनपारंपरिक पाणीयोजनातळी आदी संरचनांचे नूतनीकरण तसेच विहीरी आणि विंधनविहीरी पुनर्जिवीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजनाआदी कामांचा त्यांनी आढावा घेतला. सुरुवातीच्या टप्प्यातील कामांचा आढावा घेताना नियोजन करून कामे गतीने पूर्ण कराअसे सांगतानाच काम सुरू होण्यापूर्वीकाम सुरू झाल्यानंतर व काम पूर्ण झाल्यानंतरच्या सर्व प्रक्रिया नियोजनपूर्वक  करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या.
            पीकपदधतीठिबकचा वापरयोजनाव स्थानिक पातळीवरील सहभाग वाढविण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. ग्रामसेवकतलाठीकृषीसहायकभूजल यंत्रणेसह गावचे सरपंच यांची तालुकास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात यावी, स्थानिक स्तरावर काम करण्याच्या अनुषंगाने सर्व घटकांचा व्यापक सहभाग जलशक्ती अभियानात मिळेलयासाठी विविध यंत्रणांनी स्थानिक पातळीवर नियोजन करावेअसे  जिल्हाधिकारी राम यांनी स्पष्ट केले.                              
0000 

Tuesday, July 16, 2019

टेमघर धरणाची गळती रोखण्यासाठी नियोजनबध्‍द प्रयत्‍न
   पुणे, दिनांक 16-   पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या चार धरणांपैकी टेमघर धरणाच्या गळती रोखण्‍याचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे, असे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी सांगितले. उर्वरीत10 टक्के गळती रोखण्याचे काम पुढील वर्षभरात केले जाणार आहे. त्यामुळे टेमघर धरणाची गळती 100 टक्के रोखण्यासाठी वर्षभराचा कालवधी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
  अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे म्हणाले, पुणे शहरासाठी खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या चार धरणातून पाणीसाठा केला जातो. मात्र, टेमघर धरणातून 2016 ला मोठ्या प्रमाणावर गळती झाली होती. यानंतर राज्य सरकारने धरणातील पाणी गळतीची गंभीर दखल घेत धरणाचे बांधकाम करणार्‍या तीन कंपन्यासह 22 अभियंताच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात आली. सध्या हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. धरण मजबूत करण्याच्या दृष्टीने आणि गळती रोखण्यासाठी राज्य सरकार मार्फत 100 कोटींची विशेष तरतूद करण्यात आली. त्यानुसार 2016 ते आज अखेर 80 कोटी रुपयांच्या तरतुदीमधून 90 टक्के गळती रोखण्यात यश आले आहे. आता उर्वरित 10 टक्के गळती रोखण्‍याच्‍या कामास वर्षभराचा कालावधी लागणार आहे. ते पुढे म्हणाले, देशात प्रथमच ग्राऊंटींग या तंत्रज्ञानाचा वापर करुन धरणाची गळती रोखण्यात आली आहे. या पुढील काळात देखील अशाच पद्धतीने गळती रोखण्यासाठी आम्ही तंत्रज्ञान वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
   तसेच ते पुढे म्हणाले की, आता टेमघर धरणात यंदाच्या पावसाळ्यात 100 टक्के पाणीसाठा करणार असून पुणे शहराला मोठ्या प्रमाणावर पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
0000





Monday, July 1, 2019

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

             पुणेदि. 1 : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी अभिवादन केले.
          यावेळी उपजिल्हाधिकारी निता शिंदेउपजिल्हाधिकारी रेश्मा माळीजिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारीकर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...