Sunday, July 31, 2016

डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा समताधिष्ठीत समाज घडविण्यासाठी प्रयत्नशील - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले

डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा
समताधिष्ठीत समाज घडविण्यासाठी प्रयत्नशील
-    सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले

पुणे, दि.३१ : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा समताधिष्ठीत समाज घडविण्यासाठी राज्याचा सामाजिक न्याय विभाग कायमच प्रयत्‍नशील राहील असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज केले.
            मोशी ता. हवेली येथील 250 विद्यार्थीनी क्षमतेचे मुलींचे शासकीय वसतिगृह इमारतीचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री श्री. बडोले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, पुणे कॅन्टोनमेंट बोर्डाचे उपाध्यक्ष दिलीप गिरणकर, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त एल.व्ही. महाजन, सहाय्यक उपायुक्त एस.आर.दाणी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एन.व्ही. तेलंग उपस्थित होते.
            श्री. बडोले म्हणाले, डॉ. बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंती निमित्त राज्यात नवीन ५० शासकीय वसतिगृह उभारण्यात आली आहेत. या वसतिगृहाच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होत आहे. डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचे पाईक होवूनच राज्याचा सामाजिक न्याय विभाग वाटचाल करत आहे. राज्यातील मागसवर्गीय मुले स्पर्धा परिक्षेव्दारे प्रशासकीय सेवेत येण्यासाठी तसेच त्यांना उच्च शिक्षण मिळवून देण्यासाठी सामाजिक न्याय विभाग विविध योजना राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.
            राज्यमंत्री श्री. कांबळे म्हणाले, डॉ. बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंती निमित्त राज्यातील १२५ मागासवर्गीय मुलांना परदेशी शिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. या मुलांचा सर्व खर्च राज्यशासन करत आहे. बाबासाहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र उभा करण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक एल. व्हृी. महाजन यांनी केले. तर आभार सहाय्यक आयुक्त एस. आर. दाणी यांनी मानले.
००००






मागासगवर्गियांसाठीच्या योजनांचा लाभ तळागाळापर्यत पोहोचवा --- सामजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले


मागासगवर्गियांसाठीच्या योजनांचा लाभ
तळागाळापर्यत पोहोचवा
                                  --- सामजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले




पुणे, दि.३१ : मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. या  योजनांचा लाभ सर्वसामान्यांना होण्यासाठी त्या ताळागाळापर्यत पोहोचाव्याअसे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री श्री. राजकुमार बडोले यांनी आज केले.
            सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने शिरुर, जि. पुणे येथे बांधण्यात येणाऱ्या १०० विद्यार्थीनी क्षमतेचे मुलींचे शासकीय वसतीगृह इमारतीची पायाभरणी सामाजिक न्यायमंत्री  राजकुमार बडोले  यांच्या शुभहस्ते झाली. या पायाभरणी समारंभानंतर आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार बाबुराव पाचर्णे, माजी आमदार सुर्यकांत पलांडे, बांधकाम सभापती मंगलदास बांदल, पंचायत सभापती सिध्दार्थ कदम, भगवानराव शेळके, धर्मेंद्र खांडरे उपस्थित होते.
            यावेळी बोलतांना सामाजिक न्यायमंत्री  श्री. बडोले म्हणाले की, थोर पुरुषांनी समाज घडवण्याचे मोलाचे कार्य केले आहे. राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता व बंधुत्वाची शिकवण भारतीयांना दिली. सामाजिक न्यायाचा त्यांचा विचार जिवंत ठेवण्यासाठी व सर्वांना प्रेरणा मिळावी यासाठी शासनाने लंडनस्थीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पावन झालेले निवासस्थान खरेदी केले आहे. विदेशामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे असे सांगून ते म्हणाले की, समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे कार्य सामाजिक न्याय विभाग करत आहे. येणाऱ्या काळात नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी वसतिगृह उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मंत्रीमहोदयांनी दिली.
            दिव्यांगांसाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ दिव्यांगांना मिळावा यासाठी ग्रामीण भागात शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
            आमदार बाबुराव पाचर्णे यांनी मुलींच्या वसतिगृहाप्रमाणे मुलांचे वसतिगृह मंजूर करणे करवे अशी सूचना केली.
            बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांनी वसतिगृह प्रमाणे क्रीडा संकुल उभे करावे अशी मागणी यावेळी केली.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त लक्ष्मीकांत महाजन यांनी केले. वसतिगृह इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. पंचायत समिती सभापती भगवानराव शेळके यांनी आभार प्रदर्शन केले.
            कार्यक्रमास कार्यकारी अभियंता अेन. अे. तेलंग, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त्‍ अेस. आर. दाणे, विद्यार्थीनी , नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००


Saturday, July 30, 2016

जिल्ह्यात सरासरी 2.5 मि.मी. पाऊस

जिल्ह्यात सरासरी 2.5 मि.मी. पाऊस

पुणे दि. 30 :  गेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील हवेली, वेल्हा, शिरुर,  बारामती, दौंड व  पुरंदर हे तालूके सोडून इतर  सर्व तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यात सरासरी 4.0  मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण 5983.2  मि.मी. एवढा पाऊस झाला असून तो सरासरी  460.2 मि. मीआहे.
              शनिवार दि. 30 जुलै, 2016 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतची पावसाची तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ( कंसात दि. 1 जून 2016 पासूनचा एकुण पाऊस) हवेली  0.0  मि.मी.  (176.4  मि.मी.), मुळशी 7.1 मि.मी. (1106.4 मि.मी.), भोर 6.8   मि.मी.  (756.3 मि.मी.), मावळ 13.4 मि.मी.  (1053.4 मि.मी.), वेल्हा 0.0 मि.मी. (874.5 मि.मी.), जुन्नर 4.0  मि.मी. (536.8 मि. मी.), खेड 0.9 मि.मी. (374.7  मि.मी.), आंबेगाव 0.8 मि.मी. (295.5 मि.मी.), शिरुर 0.0 मि.मी.  (150.3 मि.मी.), बारामती 0.0 मि.मी. (153.6) मि. मी., इंदापूर 0.0 मि.मी. (215.7 मि.मी.), दौंड 0.0  मि.मी. (171.3 मि.मी.) आणि पुरंदर 0.0 मि.मी. (118.4  मि.मी.)
000

धरणातील उपयुक्त पाणी साठा



     धरणातील उपयुक्त पाणी साठा
        पुणे दि. 30 : पुर नियंत्रण कक्षाद्वारे कळविण्यात आलेला जिल्ह्यातील धरणांतील आज  दि. 30 जुलै, 2016 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतचा धरणातील पाण्याचा एकूण साठा (. . . मी.),  धरणातील पाण्याची टक्केवारी   उपयुक्त पाणी साठा (टीएमसी मध्ये) याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
.क्र
धरणाचे नाव
        एकूण साठा
       . . . मी.
टक्केवारी
उपयुक्त साठा (टीएमसी)
1
पिंपळगाव जोगे
1.41.32
14.66
0.57
2
माणिकडोह
107.17
30.32
3.08
3
येडगाव
80.19
83.30
2.33
4
वडज
27.01
73.12
0.85
5
डिंभे
188.01
45.14
5.64
6
घेाड
116.20
35.34
1.93
7
विसापूर
1.13
4.41
0.04
8
कळमोडी
42.87
100.00
1.51
9
चासकमान
163.92
63.74
4.83
10
भामा आसखेड
130.44
53.85
4.13
11
वडीवळे
32.49
72.43
0.78
12
आंद्रा
60.97
73.00
2.13
13
पवना
169.30
57.33
4.88
14
कासारसाई
14.77
83.75
0.47
15
मुळशी
361.70
66.70
12.31
16
टेमघर
50.44
45.22
1.68
17
वरसगाव
208.16
53.96
6.92
18
पानशेत
201.72
63.92
6.81
19
खडकवासला
68.45
68.77
1.36
20
गुंजवणी
54.68
89.15
1.92
21
नीरा देवधर
205.92
60.42
7.09
22
भाटघर
407.38
60.14
14.13
23
वीर
173.04
60.42
5.68
24
नाझरे
1.461
0.00
0.00
25
उजनी
1373.91
-28.27
-15.14

****


  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...