Saturday, March 16, 2019

निवडणूक निर्णय अधिका-यांना इव्‍हीएम-व्‍हीव्‍हीपॅट हाताळणीचे प्रशिक्षण




      पुणे, दिनांक 16- जिल्‍ह्यातील निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांना आज इव्‍हीएम-व्‍हीव्‍हीपॅट हाताळणीचे प्रशिक्षण समन्‍वय अधिकारी डॉ. ज्‍योत्‍स्‍ना पडियार यांनी आज दिले. जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्‍या या प्रशिक्षणास मावळच्‍या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, शिरुरचे रमेश काळे यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते. डॉ. पडियार यांनी इलेक्‍ट्रॉनिक व्‍होटींग मशीन, कंट्रोल युनिट, व्‍हीव्‍हीपॅट यांच्‍या जोडणीचे प्रात्‍यक्षिक करुन घेतले तसेच शंकांचे निरसन केले.

00000



निवडणूक प्रक्रियेत क्षेत्रीय अधिकारी हा महत्‍त्‍वाचा घटक - जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

            पुणे, दिनांक 15-निवडणूक प्रक्रियेत क्षेत्रीय अधिकारी (झोनल ऑफीसर) हा महत्‍त्‍वाचा घटक असून निवडणूक कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांच्‍यामध्‍ये उत्‍तम समन्‍वय असला तर निवडणूक योग्‍य पध्‍दतीने पार पडली जावू शकते, असे प्रतिपादन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
            जिल्‍हाधिकारी राम हे लोकसभा निवडणुकांच्‍या पार्श्‍वभूमीवर जिल्‍ह्यातील मतदार संघाचा दौरा करत असून विविध मतदान केंद्रांना भेट देत आहेत. या  दरम्‍यान, मतदान केंद्रांची पहाणीही ते करत आहेत.  आज त्‍यांनी भोर येथे पहाणी दौरा आयो‍जित केला होता. त्‍यांच्‍या समवेत जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील हे होते. भोर येथील पंचायत समिती सभागृहात जिल्‍हाधिकारी राम आणि जिल्‍हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी क्षेत्रीय अधिकारी तसेच निवडणुकीशी संबंधित सर्व अधिकारी-कर्मचारी यांची बैठक घेतली. यावेळी भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसिलदार अजित पाटील, मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण, वेल्‍ह्याचे तहसिलदार शिवाजी शिंदे, गट विकास अधिकारी संतोष हराळे, मुळशीच्‍या गट विकास अधिकारी स्मिता पाटील, वेल्‍ह्याचे गट विकास अधिकारी मनोज जाधव, पोलीस निरीक्षक राजू मोरे, यशवंत गवारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            प्रारंभी जिल्‍हाधिकारी राम यांनी क्षेत्रीय अधिका-यांची ओळख करुन घेतली. प्रत्‍येक अधिका-याकडे असलेल्‍या मतदान केंद्रांची माहिती घेवून तेथे असलेल्‍या मुलभूत सुविधांबाबत विचारणा केली. इलेक्‍ट्रॉनिक वोटींग मशीन आणि व्‍हीव्‍हीपॅटचे कार्य कसे चालते, याबाबतही त्‍यांनी माहिती विचारली. यंदाच्‍या निवडणुकीत व्‍हीव्‍हीपॅटचे महत्‍त्‍व लक्षात घेऊन सर्वांनी त्‍याचे अद्ययावत ज्ञान आणि हाताळणी बाबत दक्ष रहावे, अशा सूचना त्‍यांनी दिल्‍या. आदर्श आचार संहिता, खर्च नियंत्रण कक्ष, भरारी पथक, सी-व्‍हीजील अॅप, मतदान यंत्रांची सुरक्षितता, वाहतूक आराखडा याबाबतही त्‍यांनी माहिती जाणून घेतली.
            जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी निवडणूक प्रक्रियेत पोलीस यंत्रणेचे संपूर्ण सहकार्य राहणार असून क्षेत्रीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांनी एकमेकांमध्‍ये योग्‍य समन्‍वय आणि सुसंवाद ठेवावा, असे आवाहन केले. भोर परिसरात काही ठिकाणी मोबाइल किंवा इंटरनेट सुविधा नाहीए, तेथे वॉकीटॉकी सारखी सुविधा उपलबध करुन दिली जाणार असून याबाबत हाताळणीचे प्रशिक्षणही दिले जाईल, असे त्‍यांनी सांगितले.
            बैठकीनंतर जिल्‍हाधिकारी राम आणि जिल्‍हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी विविध कक्षांना भेट दिली. तसेच यावेळी भोर तालुकयातील कर्नावड येथील जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळेच्‍या विद्यार्थ्‍यांनी सादर केलेल्‍या मतदान जागृती पथनाटयाचे कौतुक केले.

000000




Wednesday, March 13, 2019

जिल्‍हाधिकारी राम यांची विविध कक्षांना भेट
            पुणे, दिनांक 13- लोकसभा निवडणुकीसाठी स्‍थापन करण्‍यात आलेल्या विविध कक्षांना जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी आज भेट देऊन पहाणी केली. यावेळी निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंहतहसिलदार विकास भालेराव, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीचे काम सुरळीत पार पाडण्‍यासाठी तसेच मतदारांच्‍या सुविधेसाठी विविध कक्ष स्‍थापन करण्‍याचे निर्देश देण्‍यात आले आहेत. त्‍यानुसार  जिल्‍हाधिकारी राम यांनी मतदार मदत केंद्र, तक्रार निवारण कक्ष,  जिल्‍हा नियंत्रण कक्षमतदार जागृती कक्ष (स्‍वीप)इव्‍हीएम व्‍यवस्‍थापन याबाबत पहाणी केली. निवडणूक विषयक प्रमुख घडामोडींची माहिती सर्वसामान्‍य नागरिकांपर्यंत पोहोचण्‍यासाठी विविध माध्‍यमांचा वापर करण्‍याच्‍या सूचना त्‍यांनी दिल्‍या. त्‍यासाठी डिजीटल बोर्ड, बॅनर तयार करण्‍यात यावेत, असेही त्‍यांनी सांगितले.  लोकसभा निवडणुकीसाठी मतदार यादीत ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करण्‍यात आले असून त्‍यावर योग्‍य ते निर्णय घेण्‍याचे निर्देश जिल्‍हाधिकारी राम यांनी दिले. विहीत मुदतीत प्राप्‍त झालेले सर्व पात्र अर्ज मंजूर करण्‍यात  येतील, असे बैठकीत सांगण्‍यात आले. लोकसभा निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर जिल्‍हाधिकारी राम हे मतदार संघ निहाय दौरा करणार आहेत. दौ-यात झोनल ऑफीसर्ससह इतर अधिका-यांची बैठक घेऊन निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेणार आहेत. यामध्‍ये कायदा व सुव्‍यवस्‍था, मतदान केंद्रे, तेथील सुविधा, संवेदनशील मतदान केंद्रे, आदर्श आचार संहिता, खर्च नियंत्रण कक्षमतदान यंत्रांच्‍या सुरक्षितेसाठी केलेल्‍या उपाययोजना, उपलब्‍ध कर्मचारी वर्ग या विषयांचा समावेश असेल.
0000



Thursday, March 7, 2019





सार्वत्रिक निवडणूक तयारीसंदर्भात
स्वीपआणि पीडब्ल्यूडीसमितीची बैठक संपन्न

पुणे, दि. 7 – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक शाखेतर्फे विविध समित्यांची स्थापना करुन तयारीचा आढावा घेण्यात येतो. या अनुषंगाने स्वीपआणि पीडब्ल्यूडीसुकाणू समितीची बैठक उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली. यावेळी मतदान जनजागृती मोहिम, मतदान संकल्प पत्र वितरण, शाळा व महाविद्यालयात इलेक्टोरल लर्नींग क्लबची स्थापना करणे, शासकीय व निमशासकीय कार्यालये, संस्थांमध्ये मतदार साक्षरता मंच स्थापणे, ग्राम पंचायत स्तरावर चुनाव पाठशालाआयोजित करणे, दृक-श्राव्य माध्यमांचा वापर करुन निवडणूक प्रक्रियेबद्दल प्रचार करणे, दिव्यांग मतदारांचा शोध घेणे, दिव्यांग मतदारांची नोंदणी, दिव्यांग मतदारांना मतदानाप्रसंगी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देणे, निवडणूक प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग वाढविणे याचा आढावा उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग यांनी घेतला. उपजिल्हाधिकारी सुभाष बोरकर, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग तसेच नेहरु युवा केंद्राचे समन्वयक यशवंत मानखेडकर यांनी उपस्थित अधिकारी व समिती सदस्यांना मार्गदर्शन केले. बैठकीला विविध विभागांचे अधिकारी, समितीचे सदस्य उपस्थित होते.
 

000

Saturday, March 2, 2019

सर्वांच्‍या सहकार्याने निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडेल- जिल्‍हाधिकारी राम
            पुणे, दिनांक 2- आगामी लोकसभा निवडणुकीच्‍या दृष्टिने सर्व समन्वय अधिका-यांनी ( नोडल ऑफीसर्स) योग्‍य ती पूर्वतयारी केल्‍याबद्दल जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी समाधान व्‍यक्‍त केले असून सर्वांच्‍या सहकार्याने निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडली जाईल, असा विश्‍वास व्‍यक्‍त केला.
            जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मावळ लोकसभा मतदार संघाच्‍या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, बारामती लोकसभा मतदार संघाचे सुभाष डुंबरे, शिरुर लोकसभा मतदार संघाचे रमेश काळे,उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
            जिल्‍हाधिकारी श्री. राम यांनी प्रारंभी समन्‍वय अधिका-यांकडून त्‍यांच्‍यावर सोपवण्‍यात आलेल्‍या जबाबदारीची आणि त्‍यांनी केलेल्‍या पूर्वतयारीची माहिती  घेतली. निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक घटकाची जबाबदारी महत्‍त्‍वाची असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. मतदार जागृतीसाठी (स्‍वीप कार्यक्रम) विविध सामाजिक व स्‍वयंसेवी संस्‍थांची मदत घेण्‍यात येणार असून पथनाट्ये, पोस्‍टर्स, वैयक्तिक भेटी, कलापथक अशा विविध साधनांचा वापर केला जाणार आहे. वृत्‍तपत्रे,  रेडिओ,दूरचित्रवाणी, तसेच सोशल मिडीयाद्वारेही जनजागृती केली जाणार आहे.
            बैठकीत मतदान केंद्रे, मतदान केंद्रावरील मुलभूत सुविधा,( रॅम्‍प, वीज, पाणी, प्रसाधनगृहे),  दिव्‍यांग मतदार याबाबत माहिती घेण्‍यात आली. 


  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...