Friday, October 28, 2016

वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे -----जिल्हाधिकारी सौरभ राव

वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी
यंत्रणांनी सज्ज राहावे
                                      -------जिल्हाधिकारी सौरभ राव
पुणे,दि.28 : दिवाळीच्या सुट्टीनिमित्त नागरिक मोठया प्रमाणावर  बाहेरगावी जात आहेत. या कालावधीत जिल्हयातील प्रमुख मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे तसेच सातारा रोडवर वाहतुक सुरळीत रहावी, लोकांना त्रास होणार नाही, यासाठी संबधित यंत्रणांनी सज्ज राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केले.
            येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात हायवे पोलीस, ग्रामीण पोलीस, राष्ट्रीय महामार्ग, रस्ते विकास महामंडळ,महसुल विभागाचे  अधिकारी यांच्या तातडीच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, दिवाळी सुट्टी कालावधीत बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांना वाहतुकीची कोंडी होवू नये याकडे विशेष लक्ष द्यावे. टोल नाक्यावर तीन मिनिटापेक्षा जास्त वेळ लागू नये लेन कटिंग होवू नये, मोठी वाहने ओव्हर टेक करु नये. वाहनाची गती प्रमाणापेक्षा जास्त राहू नये याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबधितांना देण्यात आल्या आहेत. तसेच हायवे पोलीसांना या कालावधीत आवश्यक उपायोजना करण्यासाठी वाहने उपलब्ध करुन दिले जाणार असल्याचे सांगितले.
   सातारा रोडवर रस्त्याच्या लगत अतिक्रमण करुन विविध पदार्थाची विक्री केली जाते. यामुळेही अपघात होवू शकतो. वळण रस्त्यावर निकषाप्रमाणे सूचना फलक असले पाहिजे. त्याचप्रमाणे निकषाप्रमाणे योग्य ठिकाणी  कठडे आहेत की नाही  याची खात्री करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी  सौरभ राव यांनी दिल्या.
            याप्रसंगी  जिल्हाधिकारी यांनी  संबधित विभागाकडून सध्या काय परिस्थिती आहे. वाहतुकीची कोंडी व अपघात टाळणेसाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत. आदिबाबत सविस्तर माहिती  घेतली. तसेच वाहतुकी  संदर्भात  विविध समस्या व अडचणी जाणून घेतल्या. यानुसार रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग, आयआरबी, आदि संबधित विभागांना आवश्यक कार्यवाही  करण्याबाबत कळविले जाणार असल्याचे सांगितले.
            तसेच दिवाळीच्या सुट्टीनंतर कायमस्वरुपी उपययोजनाची कालबध्द कार्यवाही करुन भविष्यात अपघात टाळण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले.
0000000


Saturday, October 15, 2016



पोलीसांनी पारदर्शक पध्दतीने
काम करावे : पालकमंत्री बापट
पुणे, दि.१५ : पोलीस हा गणवेश घातलेला नागरिक आहे. पोलिसांनी पारदर्शक व न्यायाच्या पध्दतीने काम करावे. त्याचा जनतेला आधार वाटला पाहिजे. व गुन्हेगाराला भिती वाटली पाहिजे असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
लोहगाव विमानतळ, कोरेगावपार्क पोलीस स्टेशनच्या इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार जगदीश मुळीक, पोलीस आयुक्त श्रीमती रश्मी शुकला, पोलीस सहआयुक्त सुनिल रामानंद आदि उपस्थित होते तर कोरेगांव पार्क येथील कार्यक्रमात महापौर प्रशांत जगताप वरील मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री बापट म्हणाले की, सर्व नविन तंत्रज्ञानाचा वापर करुन सुसज्ज इमारत झाली पाहिजे. सामान्य माणसाला न्याय / मदत मिळाली पाहिजे. कायदा व सुव्यवस्था राहिली पाहिजे. पोलीस स्टेशन हे समाजमंदिर असले पाहिजे. त्याचप्रमाणे पोलीसांनीही समाजाचे सेवक, सामान्य माणसाचे मदतनीस ही प्रतिमा निर्माण झाली पाहिजे असे प्रतिपादन केले.
सदरील दोन्ही पोलीस स्टेशनचे काम लवकरात-लवकर पूर्ण करावे. येथे येणाऱ्या नागरिकांनी वाहन पार्किंग बसण्याची व्यवस्था असली पाहिजे. कोरेगांव पार्क परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा लावले पाहिजे पुणे हे सांस्कृतिक शहर आहे. काही चुकीच्या प्रकारामुळे येथील राहणाऱ्या नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी पोलीसांनी घेतली पाहिजे असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी कोरेगांव पार्क ही उच्च लोकांची वस्ती आहे. या परिसरात पोलीस स्टेशनची नविन इमारत पूर्ण झाल्यानंतर संगणकीकरण, सीसीटीव्ही आदी कामे आपल्या आमदार निधीतून केली जातील. शहरातील वातावरण चांगले ठेवण्याचे काम पोलीस विभागानी केले असल्याचे सांगितले. तर महापौर प्रशांत जगताप यांनी शहरात चांगली कायदा व सुव्यवस्था राहावी. यासाठी चांगले अद्यावत यंत्रणा व वास्तू असणे आवश्यक आहे. याकरिता पोलीस विभागाला मनपातर्फे आवश्यक सहकार्य केले जाईल असे सांगितले.
प्रारंभी पोलीस आयुक्त श्रीमती रश्मी शुक्ला यांनी उपस्थितांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. पुणे शहरासाठी सदरची दोन्ही पोलीस स्टेशनची वास्तू अद्यावत होणार आहे. हे काम पोलीस गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत होत असल्याचे सांगितले.
यावेळी आमदार जगदीश मुळकी यांचेही समयोचित भाषण झाले.

Friday, October 14, 2016

धरणातील उपयुक्त पाणी साठा व जिल्हयात सरासरी 0.0 मि.मी.पाऊस

धरणातील उपयुक्त पाणी साठा
पुणे दि 15: पुर नियंत्रण कक्षाद्वारे कळविण्यात आलेला जिल्ह्यातील धरणांतील आज दि. 15 ऑक्टोबर 2016 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतचा धरणातील पाण्याचा एकूण साठा (. . . मी.),  धरणातील पाण्याची टक्केवारी व  उपयुक्त पाणी साठा (टीएमसी मध्ये) याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
.क्र
धरणाचे नाव
   एकूण साठा
   द. . . मी.
टक्केवारी
उपयुक्त साठा (टीएमसी)
1
पिंपळगाव जोगे
219.68
85.79
3.34
2
माणिकडोह
230.63
73.17
7.44
3
येडगाव
54.06
50.33
1.41
4
वडज
35.91
100.00
1.17
5
डिंभे
382.06
100.00
12.49
6
घेाड
216.30
100.00
5.47
7
विसापूर
12.57
49.08
0.44
8
कळमोडी
42.87
100.00
1.51
9
चासकमान
238.82
98.66
7.47
10
भामा आसखेड
230.65
100.00
7.67
11
वडीवळे
40.87
100.00
1.07
12
आंद्रा
83.31
100.00
2.92
13
पवना
272.12
100.00
8.51
14
कासारसाई
17.15
98.57
0.56
15
मुळशी
530.44
98.98
18.27
16
टेमघर
78.57
72.01
2.67
17
वरसगाव
375.36
100.00
12.82
18
पानशेत
310.61
100.00
10.65
19
खडकवासला
83.40
95.51
1.89
20
गुंजवणी
61.10
100.00
2.16
21
नीरा देवधर
332.14
100.00
11.73
22
भाटघर
665.57
100.00
23.50
23
वीर
266.40
100.00
9.41
24
नाझरे
4.229
25.42
0.15
25
उजनी
1517.19
100.00
53.57
*********





जिल्हयात सरासरी 0.0 मि.मी.पाऊस

पुणे, दि.15 : गेल्या चोवीस तासात जिल्हयात सरासरी 0.0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्हयात आजअखेर एकूण 13157.5 मि.मी एवढा पाऊस झाला असून तो सरासरी 1012.1 मि.मी. आहे.
शनिवार, दि 15 ऑक्टोबर 2016 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतची पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे (दि. 1 जून 2016 पासूनचा एकुण पाऊस) हवेली 0.0 मि.मी.(409.8 मि.मी) मुळशी 0.0 मि.मी. ( 2084.4 मि.मी) भोर 0.0 मि.मी (1866.4 मि.मी) मावळ 0.0 मि.मी. (2354.5 मि.मी) वेल्हा 0.0 मि.मी (1822.4 मि.मी) जुन्नर 0.0 मि.मी (1109.1 मि.मी) खेड 0.0 मि.मी. (800.0 मि.मी) आंबेगाव 0.0 मि.मी. (679.6 मि.मी) शिरुर 0.0 (419.0 मि.मी) बारामती 0.0 मि.मी (438.9 मि.मी) इंदापूर 0.0 मि.मी  (469.5 मि.मी) दौंड 0.0 मि.मी. (432.4 मि.मीआणि पुरंदर 0.0 मि.मी. (271.6 मि.मी)
000000


  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...