Friday, May 31, 2019

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्ताने  जिल्हा रुग्णालयात सोहळा
            पुणे, दिनांक 31 –  जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्ताने येथील  जिल्हा रुग्णालयात  जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा पार पडला. कार्यक्रमास उद्घाटक म्हणून आमदार लक्ष्मण जगताप उपस्थितहोते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्‍यानंतर  पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस वंदन करण्‍यात आले.
            जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी  प्रास्‍ताविक केले. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने आरोग्यास होणाऱ्या दुष्परिणामांची त्‍यांनी  माहिती दिली.  मौखिक आरोग्य चांगले ठेवूनस्वस्थ जीवन कसे जगता येईल,  याबाबत त्‍यांनी मार्गदर्शन केले.  जिल्हयात एकूण १४ समुपदेशन केंद्र सुरु असून या  समुपदेशन केंद्राकरीता तयार करण्यात आलेल्या  समुदेशन पुस्तकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
            जिल्हा रुग्णालयातील वाहक श्री लोहार यांनी तंबाखू सोडली असल्याने त्यांचे सुद्धा स्वागत शाल व श्रीफळ देऊन करण्यात आले. लोहार यांनी कश्याप्रकारे तंबाखू सोडली व याकरीता दृढ निश्चय कसा आवश्यक आहे, हे मनोगतात सांगितले.  त्यानंतरआमदार जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त करत सर्वांनी तंबाखू सोडावी,  ते कठीण नाही.  मी सुद्धा सोडली, असे म्हणत सर्वांना तंबाखू सोडण्याकरीता आवाहन केले. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी  तंबाखू सोडणे गरजेचे आहे. धूम्रपानामुळे  सर्वांना  त्रास होतो,  त्यामुळे असे करणाऱ्यास दंड करावा व तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तीस त्याची जाणीव व्हावी याकरीता त्यांना समुपदेशन करावे, असे त्यांनी सांगितले. आमदार जगताप यांनी उपस्थितांना  तंबाखू मुक्तीची शपथ दिली. कार्यक्रमानंतर शाहीर बाळासाहेब मालुसकर यांनी एकपात्री नाटक सादर केले. 
0000


Thursday, May 30, 2019

                  पालखी सोहळयामध्ये वारक-यांना सोई-सुविधा
                         प्राधान्याने देण्यात याव्यात
                                             - जिल्हाधिकारी नवल किशोर राम
 पुणे, दि.  30 :- आषाढी वारीच्या निमित्ताने पुणे जिल्हयामध्ये पालखी सोहळयाच्या कालावधीमध्ये वारक-यांना सर्व सोई-सुविधा प्राधान्याने देण्यात याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केल्या. पालखी सोहळा – 2019 च्या पार्श्वभूमीवर पूर्व तयारीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये  आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख,जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, अमर माने,कार्यकारी अभियंता.ग्रामीण पाणी पुरवठा विभाग एस.एम.कदम.प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, बारामतीचे उप विभागीय अधिकारी हेमंत निकम, दौंड-पुरंदरचे उप विभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड  , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अजित कारंजकर, जिल्हा रुग्णालय,पुणेचे जिल्हा चिकीत्सक डॉ. अशोक नांदापूरकर,तहसिलदार हवेली,बारामती,इंदापूर, पुरंदर तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीचे प्रमुख विश्वस्त तसेच श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू चे पालखी सोहळा प्रमुख              तसेच दोन्ही संस्थानचे प्रमुख विश्वस्त, शासकीय अधिकारी उपस्थ‍ित होते.
                       या बैठकीमध्ये दिनांक 25 जून 2019 रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे तर दिनांक 24 जून 2019 रोजी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या काळात पुणे जिल्हयातील पालख्यांचा मुक्कामाच्या ठिकाणी तसेच पालखी मार्गावर  मांसाहारी हॉटेल, मच्छी मार्केट, कत्तलखाने व दारुची दुकाने बंद ठेवावीत, या सोहळयामध्ये सामील असणा-या वाहनांची तपासणी करणे व त्यांना फिटनेस प्रमाणपत्र देणे, वाहतुकीचे नियोजन, सुरळीत विद्युत व्यवस्था, सपाटीकरण, निर्माल्य  व्यवस्था इ. बाबींवर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर वारक-यांना मुक्कामाच्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा, शासकीय दरामध्ये रॉकेल, धान्य, अखंडीत वीज पुरवठा करण्याबाबत संबंधित यंत्रणांना आदेश देण्यात आले.
                      यावेळी अपर जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी पुरवठा विभागाकडून देण्यात येणा-या सुविधा तसेच अग्नीशमन यंत्रणा इ.बाबतचा आढावा घेतला. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या कालावधीमध्ये पोलीस बंदोबस्त, वाहतुक नियोजन इ.बाबत संस्थानप्रमुखांशी चर्चा केली.
                      यावेळी  दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वारीच्या काळात पाणीपुरवठयाचे नियोजन करण्यासाठी, पालखीतळांवरील खड्डे मुरुम भराई करुन व्यवस्थ‍ित करणे, आवश्यक त्याठिकाणी रोलींग करणे, पालखीतळांकडे जाणा-या रस्तयांवर दुकानदारांकडून होणा-या अतिक्रमणाबाबत तसेच पालखीमध्ये सामील वाहनांच्या पार्किंगबाबत चर्चा करण्यात आली तसेच याबाबत संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या.
            यावेळी संस्थानच्या प्रमुख पदाधिका-यांनी केलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली.      
०००००

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

            पुणेदि. 28 जिल्हा प्रशासनातर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलेजिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात निवासी उपजिल्‍हाधिकारी यांनी स्‍वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सर्वसाधारण शाखेचे तहसिलदार प्रशांत आवटेजिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000

Tuesday, May 28, 2019

31 मे पासून तंबाखू नकार सप्‍ताह – अपर जिल्‍हाधिकारी रमेश काळे



31 मे पासून तंबाखू नकार सप्‍ताह – अपर जिल्‍हाधिकारी रमेश काळे
पुणे, दिनांक 28- तंबाखूमुक्‍तीबाबत शहरी भागातील नागरिकांप्रमाणेच ग्रामीण भागातही जनजागृती करण्‍यात यावी, असे आवाहन अपर जिल्‍हाधिकारी रमेश काळे यांनी केले. राष्‍ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्‍या जिल्‍हा स्‍तरीय समन्‍वय समितीच्‍या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्‍त जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. अशोक कांबळे, अतिरिक्‍त जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. अभय तिडके यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
31 मे पासून तंबाखू नकार सप्‍ताह सुरु करण्‍यात येत आहे. या निमित्‍ताने शासकीय कार्यालयातील कर्मचारी-अधिका-यांची मौखिक आरोग्‍य तपासणी करण्‍यात येणार आहे. कार्यालय प्रमुखांनी या कामी पुढाकार घेवून सहकार्य करण्‍याचे आवाहन श्री. काळे यांनी केले. पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही तंबाखू नकार सप्‍ताहामध्‍ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन जनजागृती करावी, शहरातील जाहिरात फलकांवर, शासकीय कार्यालयांमध्‍ये तंबाखूचे दुष्‍परिणाम दर्शवणारे फलक लावण्‍यात यावेत, निवासी सोसायट्या तंबाखूमुकत घोषित करण्‍याबाबत पुढाकार घ्‍यावा,असेही आवाहन त्‍यांनी केले.
कार्यक्रमाचे समन्‍वय डॉ. राहूल मणियार यांनी राष्‍ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची माहिती सांगितली. गेल्‍या वर्षी या कार्यक्रमांतर्गत एकूण 88 प्रशिक्षण घेण्‍यात आले त्‍यामध्‍ये 7299 प्रशिक्षणार्थींना तंबाखूच्‍या दुष्‍परिणामांबाबत माहिती देण्‍यात आली. या कालावधीत 1504 लोकांवर कार्यवाही करण्‍यात येऊन 3 लाख 44 हजार 165 रुपये एवढी रक्‍कम दंड स्‍वरुपात जमा करण्‍यात आली. या शिवाय अन्‍न व औषध प्रशासनाच्‍यावतीने जिल्‍ह्यात 1 कोटी 24 लाख 96 हजार 148 रुपये किंमतीचा गुटखा तर ग्रामीण पोलीस विभागाच्‍यावतीने 30 लाख 85 हजार 410 रुपये किंमतीचा गुटखा जप्‍त करण्‍यात आल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
बैठकीस दिलीप करंजखेले, जीवन माने, अनिता वाघचौरे, बीके भाग्‍यश्री, बीके दशरथभाई, बीके पार्थभाई, मुकूंद अयाचित, दीपक माळी, ज्‍योती ढमाळ, मदन व्‍हावळ, जयश्री डोंगरे, अपर्णा शेंडकर, सचिन पाटील आदींची उपस्थिती होती.
                                                                  0000

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...