Tuesday, August 20, 2019





द्भावना दिनानिमित्त घेतली प्रतिज्ञा

            पुणे, दि. 20 : जिल्हा प्रशासनातर्फे द्भावना  दिनानिमित्त प्रतिज्ञा घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, खनि कर्म अधिकारी श्री.बामणे, तहसिलदार श्रावण ताते, नायब तहसिलदार पी.डी.काशिकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी प्रतिज्ञा घेतली.
0000

Wednesday, August 14, 2019

21 व्या शतकातील पोलीस स्‍मार्ट आणि तंत्रज्ञानस्‍नेही  असणे आवश्‍यक- राज्‍यपाल
            पुणे, दिनांक 14- एकविसाव्‍या शतकातील महाराष्ट्राला 21 व्या शतकाच्या पोलिस दलाची आवश्यकता आहे,  यासाठी आपल्या पोलिस दलाचे स्मार्ट व तंत्रज्ञानस्‍नेही पोलिस दलात रूपांतर करावे लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले.
           येथील सिम्बायोसिस कॉलेजच्या सभागृहात पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध लोकाभिमुख उपक्रमांचे लोकार्पण राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले. त्‍यावेळी ते बोलत होते. महाराष्‍ट्रातील प्रभावी पोलीस प्रशासनाच्‍या आकलन आणि अपेक्षांबद्दलचे सर्व्‍हेक्षण आणि सेवा व सुरक्षा बोध मानके यांचे राज्‍यपाल चे. विद्यासागर राव यांच्‍या हस्‍ते स्‍वतंत्रपणे लोकार्पण करण्‍यात आले.  यावेळी पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कामगार व पुनर्वसन राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, खासदार अमर साबळे, खासदार गिरीश बापट, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सिम्बायोसिसचे संस्थापक शां. ब. मुजुमदार, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम आदी उपस्थित होते.
            राज्‍यपाल म्‍हणाले, महाराष्ट्रात वृद्ध लोकांची संख्या सर्वाधिक आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या वैयक्तिक, आर्थिक, भावनिक सुरक्षा आणि सुरक्षिततेचा विश्‍वास निर्माण करणे हे एक मोठे आव्हान असेल. विविध आस्‍थापनांमध्‍ये महिलांच्या वाढत्या सहभागामुळे देशातील कार्यक्षेत्रांमध्ये वेगाने बदल होत आहेत. महिला वेगवेगळ्या रोजगारांच्‍या क्षेत्रात पुरुषांपेक्षा अधिक संख्‍येने आहेत, ही आनंदाची बाब आहे  नजीकच्या काळात निमलष्‍करी दलात आणि सैन्य दलातही अधिक महिला असतील.
            पोलिस आणि सर्व सार्वजनिक संघटनांनी महिला आणि वृद्ध लोकांसाठी संवेदनशील बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते सामाजिक-आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, व्यक्तींसाठी अधिक दयाळू असले पाहिजेत. पुण्यासारख्या आंतरराष्ट्रीय शहरातील परदेशी नागरिक आणि विद्यार्थ्यांकरिता पोलिस दल अत्यंत सभ्य आणि सहकारी वृत्‍तीचे असणे देखील आवश्यक आहे, असे राज्‍यपाल म्‍हणाले.
            यापूर्वी महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबई आणि पुणे या शहरांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. असे हल्ले रोखण्यासाठी आपल्याकडे यंत्रणा असणे आवश्यक असल्याचे सांगून सोशल मिडीयाद्वारे होणा-या वाढत्‍या गुन्‍ह्यांबाबतही त्‍यांनी चिंता व्‍यक्‍त केली.
            पालकमंत्री तथा महसूल मंत्री पाटील म्‍हणाले, पोलीस विभागाने सुरु केलेल्‍या या नवीन अभिनव उपक्रमांमुळे सर्वसामान्‍यांच्‍या मनात पोलिसांविषयी चांगली प्रतिमा निर्माण होण्‍यास मदत होणार आहे. सीमेवरील सैनिकांविषयी जनतेच्‍या मनात जशी आदरयुक्‍त प्रतिमा आहे, तशीच पोलिसांविषयी निर्माण होण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍याची अपेक्षाही त्‍यांनी व्‍यक्‍त केली. शासन पोलिसांना मदत करण्‍यास बांधिल असून पोलिसांच्‍या गृहप्रकल्‍पासाठी 25 कोटी रुपयांची मान्‍यता देण्‍यात आली आहे. तसेच जिल्‍ह्यातील नियोजन समितीच्‍यावतीने  5 कोटी रुपयांची तरतूद वाहतूक विषयकबाबीसाठी करण्‍यात आल्याचे त्‍यांनी सांगितले.
            सिम्बायोसिसचे संस्थापक शां. ब. मुजुमदार यांनी पोलिस विभागाचे कौतुक करुन पोलीस आणि समाज यांच्‍यामधील दरी दूर होण्‍याची गरज प्रतिपादन केली.
            कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक पोलीस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम यांनी केले. पोलीस म्‍हणजे नम्र आणि कर्तव्यात कठोर अशी प्रतिमा कायम ठेवण्‍याची गरज प्रतिपादन करुन त्‍यांनी शहरी नक्षलवादाविरुध्‍द कठोरपणे कारवाई केल्‍याचे सांगितले. पोलिस विभागामार्फत नागरिकांना सुरक्षिततेची हमी देण्‍यासाठी सुरु केलेल्‍या विविध उपक्रमांचीही त्‍यांनी माहिती दिली. शहरात गेल्‍या 4 महिन्‍यापूर्वी 1300 सीसीटीव्‍ही कॅमेरे होते. नागरिक आणि विविध कंपन्‍या, संस्‍था यांच्‍या मदतीने आज शहरात 30 हजार कॅमेरे लावण्‍यात आल्‍याचे त्‍यांनी लक्षात आणून दिले. महाराष्‍ट्रातील प्रभावी पोलीस प्रशासनाच्‍या आकलन आणि अपेक्षांबद्दलचे सर्व्‍हेक्षण हे सिम्‍बॉयसिसच्‍या विद्यार्थ्‍यांनी केले आहे. पोलिसांनी नागरिकांना दिलेल्‍या सेवेनंतर नागरिकांचे समाधान झाले की नाही, त्‍यांच्‍या अपेक्षा काय होत्‍या, याबाबत सर्वेक्षण करण्‍यात आले,असेही त्‍यांनी सांगितले.
            कार्यक्रमात पोलिस दलाच्‍या विविध विभागांचा गौरव राज्‍यपाल चे. विद्यासागर राव यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. कार्यक्रमास जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह पोलिस व सनदी अधिकारी उपस्थित होते.आभार प्रदर्शन सह पोलीस आयुक्‍त रवींद्र शिसवे यांनी केले. 
0000




मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू
            पुणेदि. 14 : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुणे जिल्हयातून विविध सामाजिक संस्थाउद्योजकसामान्य नागरिकांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदतीचा ओघ सुरू आहे. महसूलसार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्याकडे आज अनेकांनी मदतीचे धनादेश सुपूर्द केले.
                 पूरग्रस्त भागात गतीने पुनर्बांधणी व्हावी, पूरग्रस्त भागातील प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबाचा संसार नव्याने उभा करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातून दिलेल्या माहितीनुसार दिनांक 13 ऑगस्ट रोजी विठठल्‍ परशुराम महाजन यांच्याकडून 50 हजारइंदापूर नगरपरिषदइंदापूर अधिकारीकर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतन एक लाख 16 हजार 882, श्री राजेंद्र सोपान भोसले यांच्याकडून हजार 555, कै.सौशशिकला कोठारी ट्रस्ट यांच्याकडून 10 हजारश्रीरंग प्रकाश दर्प, पेट कम्फर्ट संस्था यांच्याकडून हजार तर बुधवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी दिवसभरात विश्वस्त मंडळ श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट यांच्याकडून दोन लाख 51 हजार रुपये,  श्रीसुभाष पीशेलार यांच्याकडून 11 हजार रूपयेश्रीगौरीशंकर निलकंठ कल्याणी व  श्रीमती रोहीणी गौरीशंकर कल्याणी यांच्याकडून एक लाख रूपयेकल्याणी फोर्ज लीयांच्याकडून एक लाख रूपयेमुळशी तालुका पोलीस पाटील सेवकाची सहकारी पतसंस्था मर्यायांच्याकडून 25 हजार रूपये यांच्यासह विविध संस्थासंघटना मान्यवरांकडून मदतीचे हात पूरग्रस्तांसाठी पुढे येत आहेत.
                                                           ००००



2022 पर्यंत सर्वसामान्य नागरिकाला किमान मुलभूत सुविधा
देण्यासाठी मिशन मोडवर काम करा-
-         पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
पुणे दि. 14-  सन 2022 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत, 2022 पर्यंत सर्वसामान्य नागरिकाला किमान मुलभूत सुविधा मिळाव्यातयासाठी मिशन मोडवर काम करावेअसे आवाहन महसूल,सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे केले. जिल्हा वार्षिक योजनेचा उपलब्ध निधी वेळेत खर्च करण्याचे निर्देशही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी दिले.
 
जिल्हा वार्षिक योजना 2019-20 बाबत महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री  तथा पालकमंत्री चंद्रकांत(दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. आर्थिक वर्षातील मंजूर कामांचा आढावा घेतांना पालकमंत्री पाटील बोलत होते. यावेळी खा. गिरीश बापट, जिल्हाधिकारी नवल किशोर राममनपाचे अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयलजिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्‍हा नियोजन अधिकारी प्रमोद केंभावी, सामाजिक न्‍याय विभागाचे सहायक आयुक्‍त विजयकुमार गायकवाड, यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील यांनी 2019-20 या वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या विविध विकास कामांची सद्यस्थितीकामावर झालेला खर्च आदी बाबींचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी राम यांनी 2019-20 साठी तयार करण्यात आलेल्या आराखडयाबाबत सविस्तर माहिती दिली.
पालकमंत्री पाटील म्हणाले पुणे जिल्हयात पर्यटन वाढीला मोठा वाव आहेत्यादृष्टिने पर्यटन स्थळांच्या विकासासोबतच पर्यटकांना सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात यावेमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून गत तीन वर्षात जिल्हयात झालेल्या कामांचा आढावा घेताना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमुळे ग्रामीण भागात रस्त्यांची चांगली सुविधा उभी राहिल्याचे त्यांनी सांगितले.
महावितरणबाबत आढावा घेताना शेतीपंपाबाबत ग्राहकांना मार्चअखेर वीजजोडणी देण्याचे उद्दिष्‍ट पूर्ण कराअशा सूचना  पालकमंत्री पाटील यांनी दिल्‍या. वन विभागच्या विविध योजनाआरोग्य विभागक्रीडा विभागसार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत जिल्ह्यातील रस्त्यांची स्थिती व त्यासाठी आवश्यक निधीसामाजिक न्याय विभागांततर्गत अनुसूचित जाती उपयोजनादलित वस्ती सुधार योजनानागरी दलित वस्तीमध्ये सुधारणा कार्यक्रम आदी योजनांचाही त्‍यांनी आढावा घेवून योजनांची  स्थितीझालेला खर्चआवश्यक निधी आदींची माहिती घेतली.  जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत देण्यात आलेला निधी विहित मुदतीत खर्च कराअशा सूचना दिल्या. शासनाच्या विकास योजनासंदर्भात लोकप्रतिनिधींशी चर्चा करून लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांची  दखल घ्यावी व विकासकामांना गती देण्याची सूचना पालकमंत्री पाटील यांनी केली. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.




Tuesday, August 13, 2019

डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाच्यावतीने कोल्हापूर  सांगलीतील पूरग्रस्त भागात वैद्यकीयआरोग्य पथक रवाना
            पुणे दि. 13 - पिंपरी येथी डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय हाविद्यालय, रुग्णालयाच्यावतीने कोल्हापूर  सांगलीतील पूरग्रस्त भागात वैद्यकीय आरोग्य पथक रवाना करण्यात आले आहे. कोल्हापूर वसांगली या दोन भागासाठी दो वै

द्यकीय पथक तयार करण्यात आले  आहे.  यामध्ये सर्व सेवासुविधांनी युक्त रुग्णवाहिका,डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, दहा लाखांहून अधिक किमतीची
आवश्यक औषधे तसेच पाणी शुद्ध करण्यासाठी लागणारी औषधे आणि वैद्यकीय साहित्य,   उपकरणांचा यात समावेश आहे.
यावेळी डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाच्या उपाध्यक्षा मा. भाग्यश्रीताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमरजित सिंग, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जे. एस भवाळकर, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच चव्हाण उपस्थित होते.  
विद्यापीठाचे  कुलगुरु डॉ. पी. डी. पाटील, ट्रस्टी डॉ स्मिता जाधव, कोशाध्यक्ष डॉ. यशराज पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली ही  दोन्ही वैद्यकीय आरोग्य पथके कोल्हापूर  सांगलीतील पूरग्रस्त भागात पाठविण्यात अली आहे.  
भीमाशंकरला एमटीडीसी पर्यटक निवासाचे उद्घाटन
            पुणे, दिनांक 13- भीमाशंकर येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) भव्य पर्यटक निवास पर्यटकांच्या सेवेत रुजू केले आहे.  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे  भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरेविश्वस्त सुनील देशमुख, प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे वरिष्ठ व्यवस्थापिका क्षिप्रा बोरा यांच्‍या उपस्थितीत या पर्यटक निवासाचे उद्घाटन करण्यात आले.
           सर्व सोयींनी युक्त अशा या दुमजली पर्यटक  निवासात तळमजल्यावर 30 डीलक्‍स रूम, 3 व्‍हीआयपी सूट,   भव्य रेस्टॉरंट असून पहिल्या मजल्यावर 48 डीलक्स रूम आहेत. या ठिकाणी लोकनिवास असून कॉन्फरन्स हॉल आहेत. कॉन्फरन्स हॉल प्रोजेक्टरसह सर्वसोयीनी युक्त असून या ठिकाणी 45 कव्‍हर्ड  कार पार्किंग तयार आहेत. वाहन चालकांसाठी स्वतंत्र सोय आहे. पर्यटक निवासातील रेस्टॉरंटमध्ये स्वादिष्ट शाकाहारी भोजनाची व्यवस्था असून येथील खोल्या परवडणाऱ्या दरात पर्यटकांसाठी उपलब्ध करण्यात येत आहेत, अशी माहिती प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी दिली.
0000



Monday, August 12, 2019






अतिवृष्टी बाधित जिल्हा परिषदेच्या शाळांना तातडीने
 57 कोटीचा निधी उपलब्ध करुन देणार
- शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. आशिष शेलार
- शाळा दुरूस्ती, शैक्षणिक साहित्य,पोषण आहार, उपलब्ध करणार
                  - पूरग्रस्त विद्यार्थी पाठ्यपुस्तक योजना राबविणार

                पुणे, दि. 11: राज्यातील 21 जिल्ह्यातील 2 हजार 177 जिल्हा परिषद शाळांना फटका बसला असून त्यांची दुरुस्ती व पोषण आहार, शैक्षणिक साहित्य व पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी शाळांना 57 कोटीचा निधी आवश्यक असून तो निधी तातडीने शिक्षण विभागाकडून खासबाब म्हणून  देण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज पुण्यात केली.
        राज्यातील अतिवृष्टीबाधित शाळांचा आढावा गेल्या दोन दिवसांपासून शिक्षण विभागाकडून घेण्यात येत असून. त्याचा एकत्रित आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री ॲड. आशिष शेलार तातडीने पुणे दौऱ्यावर आले होते. पुर परिस्थिती ओसरल्यावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण मंत्री ॲड. शेलार यांनी आज सांगली, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर वगळून पुर बाधित जिल्ह्यातील संबंधितांची आढावा बैठक पुणे येथे घेतली. या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांकडून जिल्हे आणि तालुकानिहाय शाळांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.
        राज्यातील अतिवृष्टीमुळे आठ शिक्षण विभागापैकी सहा विभाग पुर परिस्थितीने बाधित झाले असून 21 जिल्ह्यातील 155 तालुक्यात नुकसान झाले आहे. या 21 जिल्ह्यात  जिल्हा परिषदेच्या 2 हजार 177 शाळा बाधित झाल्या आहेत. याचा फटका 1 लाख 63 हजार 275 विद्यार्थ्यांना बसेल असा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. तातडीने 53 पुर्ण वर्ग खोल्याचे बांधकाम करावे लागणार असून  2 हजार 177 शाळांच्या वर्ग खोल्या दुरुस्ती करावी लागणार आहे. 36 किचनशेड बाधित झाले असून 477 शाळांमध्ये शालेय  पोषण आहार बाधीत झाला आहे. तर 260 शाळांमधील 27 हजार 905 विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके ही पुरामुळे बाधित झाली आहेत. एकंदरीत यासाठी रुपये 57 कोटी एवढ्या निधीची गरज असल्याचे विभागीय उपसंचालक, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी कळविलेल्या अहवालातील माहिती आजच्या बैठकीत ॲड. शेलार यांच्या समोर संबंधित अधिकाऱ्यांनी मांडली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष अडचणीत येऊ नये आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण मंत्री ॲड. शेलार यांनी खास बाब म्हणून 57 कोटीचा निधी शिक्षण विभागातर्फे उपलब्ध करून देण्यात येईल असे या बैठकीत घोषित केले.
हा निधी थेट शाळेच्या बँक खात्यामधे जमा करण्यात येणार असून स्थानिक पातळीवर दुरुस्ती करण्यात येणार आहे.
        पूरग्रस्त भागातील शाळा पुन्हा सुरू करताना आरोग्याच्या दृष्टीने तो संपूर्ण शाळा परिसर संबंधित शासकीय यंत्रणेकडून निर्जंतुक करण्यात यावा तसेच पिण्याच्या पाण्याच्या टाक्या व वर्गखोल्यांची स्वच्छता याबाबत सविस्तर  परिपत्रक शिक्षण विभागाने काढावे, असे निर्देश या बैठकीत शिक्षणमंत्री ॲड. शेलार यांनी संबंधित अधिका-यांना दिले. ज्या शाळांमध्ये पुरग्रस्तांसाठी तात्पुरती निवा-याची व्यवस्था करण्यात आली आहे, आशा शाळांतील विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था नजीकच्या खाजगी शाळांमध्ये करता येईल का? अथवा दोन सत्रात शाळा भरविण्याची व्यवस्था होऊ शकते का ? याबबात स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात यावा, असे निर्देश बैठकीत शिक्षण अधिका-यांना शालेय शिक्षणमंत्री ॲड. शेलार यांनी दिले. ज्या ठिकाणी पुर परिस्थितीमुळे शाळा  पुन्हा वापरताना योग्य  ती स्वच्छता करण्यात यावी याबाबतही सूचना या बैठकीत देण्यात आल्या.
        पुर परिस्थितीनियंत्रणात आल्यानंतर सांगली, सिंधुदुर्ग व कोल्हापूर या जिल्हयांची माहिती गोळा करून त्यांचाही या योजनेत समावेश करून त्यांनाही निधी उपलब्ध करून देण्यात येईल. पुर परिस्थिती नियंत्रणात आल्याननंतर तातडीने शाळा दुरूस्ती होऊन शैक्षणिक कामकाज सुरू व्हावे, याउद्देशाने व विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आयोजित केलेल्या या बैठकीला अप्पर मुख्य सचिव शिक्षण विभाग वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, शिक्षण विभागातील सर्व संचालक, बालभारती, बोर्डाचे अध्यक्ष व सचिव आणि संबंधित बाधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी उपस्थित होते.
0000


  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...