Tuesday, December 18, 2018





पुणे शहराला स्वच्छ भारत सर्वेक्षणात प्रथम क्रमांक
मिळवून देण्यासाठी जनतेने सहकार्य करावे
                        - ज्ञानेश्वर मोळक
            पुणे दि.१८- गेल्या चार वर्षापासून केंद्र सरकार स्वच्छ सर्वेक्षणाद्वारे देशातील शहरांमध्ये स्वच्छता अभियानांतर्गंत स्पर्धा घेत असून, 2019 च्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पुणे शहराला प्रथम क्रमांक प्राप्त करुन देण्यासाठी शहर स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी जनतेने सहकार्या करावे, असे आवाहन पुणे महानगर पालिका घन कचरा व्यवस्था विभागचे सह आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी केले. 
            केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पुणे येथील रीजनल आऊरिंच ब्युरो द्वारे हडपसर, पुणे येथील साधना विद्यालयात आयोजित स्वच्छ भारत अभियान शहरी  विशेष जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते.
            यावेळी पुणे महानगर पालिका सहायक आयुक्त सुनील यादव, साधना विद्यालयाचे प्राचार्य अजित अभंग, आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाडके आणि फिल्ड आऊटरिच ब्युरोचे क्षेत्रीय अधिकारी माधव जायभाये, महानगरपालिकेचे अधिकारी , कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थी  आदि उपस्थित होते.
            मोळक पुढे म्हणाले की, पुणे शहरात जवळपास 2 हजार 200 मेट्रीक टन घणकचरा गोळा होतो, या कचऱ्याचे वर्गिकरण करुन आलो कचरा आणि सुका कचरा वेगळा करण्यात येत आहे, शहरातील जनतेने कचऱ्याच्या वर्गिकरणाबरोबरच प्लॉस्टीकचा वापर करने पुर्णपणे बंद करुन पर्यावरणाबरोबरच जीवनमान सुधारण्यासाठी सहकार्य करावे असे ते म्हणाले.
            मुख्य कार्यक्रमापुर्वी हडपसर परिसरातून विद्यार्थींची स्वच्छ भारत संकल्पनेवर अधारित एक जनजागरण रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी  हातात फलक आणि ढोल ताशाच्या गजरात आपले शहर स्वच्छ सूंदर ठेवण्याबरोबरच प्लॉस्टीक मुक्ती शहर, नद्यांचे प्रदूषण थांबवा, झाडे लावा झाडे जगवा, बेटी बचओ बेटी पढावचा संदेश देत एक वातावरण निर्मिती केली.
            रीजनल आऊटरीच ब्यूरोद्वारा आयोजित गीत नाटक विभागाने सांस्कृतिक कार्यकरमातून आरोग्य आणि स्वच्छतेचा संदेश दिला. साधना विद्यालयाच्या विद्यार्थींनी स्वच्छ भारत - सूदर भारत बेटी बचाओ बेटी पढाओ अशी दोन पथनाट्य सादर करुन उपस्थितांमध्ये  एक जागरुती निर्माण करत शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले.
            कार्यक्रमापुर्वी आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानावर अधारित चित्रकला स्पर्धेतील विजेत्या  स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. या स्पर्धेला साधना विद्यालय मुले आणि मुली अशा दोन शाळांमधून जवळपास 1 हजार 500 विद्यार्थांनी सहभाग घेतला.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव जायभाये यांनी केले यावेळी त्यांनी या कार्यक्रमाची रुपरेशा विषद करुन केंद्र सरकारद्वारे घेण्यात येत असलेल्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती दिली.

******

Sunday, December 16, 2018



पुणे, दिनांक 16- भामा आसखेड प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली. यावेळी  आमदार सुरेश गोरे, पुणे महानगर पालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे, उप विभागीय अधिकारी विजयसिंह देशमुख तसेच प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

Friday, December 14, 2018

विजयस्‍तंभ येथे होणारा अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडणार
                                           - जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

            पुणे, दिनांक 14- तरुण वर्गापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहचवून त्‍यांच्‍यामध्‍ये सकारात्‍मक सक्षमता निर्माण करण्‍याची गरज आहे, असे प्रतिपादन करीत येत्‍या 1 जानेवारी रोजी विजयस्‍तंभ येथे होणारा अभिवादन कार्यक्रम शांततेत संपन्‍न होईल, असा विश्‍वास जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्‍यक्‍त केला. जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपमहापौर डॉ. सिध्‍दार्थ धेंडे, निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, ज्‍योती कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप पखाले आदी उपस्थित होते.
            जिल्‍हाधिकारी राम म्‍हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अन्‍यायग्रस्‍त समाजाला न्‍याय मिळवून देण्‍यासाठी जीवनभर कार्य केले. त्‍यांनी कधीही हिंसेचा मार्ग अवलंबला नाही. देशाला सर्वोत्‍तम राज्‍य घटना देऊन सर्वसामान्‍य जनतेला न्‍याय मिळवून दिला. त्‍यांच्‍या विचार आणि वाणीमध्‍ये खूप मोठी ताकत होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या विचारांवर विश्‍वास आणि श्रध्‍दा असणारे विजयस्‍तंभ येथे अभिवादन करण्‍यासाठी येत असतात. येथील 1 जानेवारीचा कार्यक्रम अत्‍यंत शांततेत पार पाडण्‍याचे नियोजन करण्‍यात आले आहे. जिल्‍हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि जनता यांच्‍या एकत्रित समन्‍वयातून हा कार्यक्रम यशस्‍वी होईल, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.
            अभिवानद कार्यक्रमासाठी मोठ्या संख्‍येने नागरिक येतील त्‍यामुळे कायदा व सुव्‍यवस्‍था राखणे आणि येणा-या नागरिकांना पार्कींग, पिण्‍याचे पाणी, शौचालयांची व्‍यवस्‍था आदी बाबी उपलब्‍ध होतील याची काळजी घेतली जाईल, असे जिल्‍हाधिकारी राम म्‍हणाले. अन्‍न-पदार्थांच्‍या स्‍टॉलवर भेसळयुक्‍त पदार्थ नसतील, याबाबत दक्षता घेण्‍याची सूचनाही त्‍यांनी केली. रस्‍ते दुरुस्‍ती, सीसीटीव्‍ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरे, बॅरीकेड्स, वीजपुरवठा आदींबाबतही त्‍यांनी मार्गदर्शन केले.  25 हून अधिक रुग्‍णवाहिकांची सोय करण्‍यात येणार असून पिण्‍याचे पाणी, पार्कींग, रुग्‍णवाहिका याबाबतची माहिती उपलब्ध करुन दिली जाईल, असेही ते म्‍हणाले.
            जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस प्रशासनाने केलेल्‍या नियोजनाची माहिती दिली.  सोशल मिडीयावर बारकाईने लक्ष ठेवण्‍यात आले असून प्रतिबंधात्‍मक कार्यवाही चालू आहे. देशविघातक, समाजविघातक शक्‍ती कार्यरत असतात, जाती-जातींमध्‍ये भांडणे लागावीत हाच त्‍यांचा हेतू असतो, अशा शक्‍तींपासून आपण सावध रहायला हवे. प्रशासन त्‍यांच्‍यावर योग्‍य ती कारवाई करत आहे. प्रत्‍येक नागरिक हा पोलीस असतो असे नमूद करुन नागरिकांनी त्‍यांना काही नकारात्‍मक बाबी आढळून आल्‍यास प्रशासनाच्‍या निदर्शनास आणाव्‍यात, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.
            उपमहापौर डॉ. धेंडे यांनीही अभिवानद कार्यक्रम यशस्‍वी होण्‍यासाठी उपयुक्‍त सूचना केल्‍या.
            प्रारंभी विविध संस्‍था, संघटना आणि व्‍यक्‍तींनी प्रशासनाकडून असलेल्या अपेक्षा व्‍यक्‍त केल्या. यावेळी  विविध संघटना, पक्षांचे प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते. 
0000

Tuesday, December 11, 2018


पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील स्टेनो विकास देसाईंचे
वॉटर पोलो क्रीडा प्रकारात महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात योगदान

            पुणे, दि.11- अखिल भारतीय नागरी सेवा जलतरण स्पर्धा 2018-19 या स्पर्धेत विभागीय आयुक्त कार्यालयातील विकास देसाई यांनी महाराष्ट्र संघाबरोबर वॉटर पोलो क्रीडा प्रकारात अंतिम सामन्यामध्ये केंद्रीय सचिवालय, नवी दिल्ली संघाचा 10/5 गुणांच्या फरकाने धुव्वा उडवून महाराष्ट्र संघाला विजेतेपद मिळवून दिले.
            गांधीनगर,गुजरात येथे दि.27 नोव्हेंबर, ते 29 नोव्हेंबर,2018 मध्ये झालेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेंतर्गत अखिल भारतीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा सहभाग होता. महाराष्ट्राच्या संघामध्ये विकास देसाई यांची निवड झाली होती. त्यामध्ये या संघाने विजय प्राप्त केला. विकास देसाई यांनी वॉटर पोलो क्रीडा प्रकारा शिवाय 50 मी. ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात रौप्यपदक व 4 बाय 100 मिडले प्रकारात कास्यपदक मिळविले. त्यांनी महसूल विभागाच्या होणा-या विभागीय क्रीडा स्पर्धेत तसेच  राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेत जलतरण प्रकारात अनेकवेळा सुवर्ण पदके मिळविली आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेवून त्यांना अनेक वेळा गौरविण्यात आले आहे.
            त्यांनी आत्तापर्यंत मालवण येथील राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा (3 कि.मी.), संकरॉक टू गेट वे ऑफ इंडिया येथील (5.कि.मी.) स्पर्धेत तसेच गोवा येथील बंबोलीम बिचवर झालेल्या 5 कि.मी.सागरी जलतरण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी  करुन विभागीय आयुक्त कार्यालयाचा नावलौकिक केला आहे.   
त्यांच्या या यशाबद्दल विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त पुनर्वसन श्री. दीपक नलवडे, उपसचिव तथा प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी श्री. भ.सं.वानखेडे, तहसिलदार श्री.विवेक साळुंके,  तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी, डॉ जयश्री कटारे, श्री. विकास भालेराव, तहसिलदार, महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष श्री.दिपक चव्हाण,  पुणे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री. विनायक राऊत व स्वाती मुरदाळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
0000


Monday, December 10, 2018

खेलो इंडियाच्या यशस्वीतेसाठी उद्योजकांनी प्रशासनास सहकार्य करावे
                                              -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

        पुणे दि. ९: विविध खेळांमध्ये कौशल्य असलेल्या प्रतिभावंत खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने खेलो इंडियास्पर्धेचे आयोजन करण्यात येते. 7 ते 20 जानेवारी, 2019 या कालावधीत महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेलो इंडियास्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या आयोजनात उद्योजकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
            खेलो इंडिया स्पर्धेच्या आयोजनाच्यानिमित्त चाकण परिसरातील उद्योजकांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, क्रीडा विभागाचे सहसंचालक नरेंद्र सोपल, चाकण औद्योगिक वसाहत संघटनेचे सनी साकला, क्रीडा सहायक संचालक सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, तहसिलदार विकास भालेराव आदी उपस्थित हेाते.
            या स्पर्धेमुळे उत्कृष्ट खेळाडू तयार होतील व ते आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नांव उज्वल करणार असल्याने, उद्योजकांनी या  स्पर्धेच्या ठिकाणी  देण्यात येणाऱ्या आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्यासाठी स्पर्धा आयोजनात प्रशासनास सहकार्य करावे. यावेळी महानगरपालिका आयुक्त सौरभ राव  यांनीही उद्योजकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. बैठकीला उपस्थित विविध उद्योगांच्या प्रतिनिधींनी स्पर्धेला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. बैठकीला चाकण परिसरातील उद्योजक उपस्थित होते.
0000

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...