पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील
स्टेनो विकास देसाईंचे
वॉटर पोलो क्रीडा प्रकारात
महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात योगदान
पुणे,
दि.11- अखिल
भारतीय नागरी सेवा जलतरण स्पर्धा 2018-19 या स्पर्धेत
विभागीय आयुक्त कार्यालयातील विकास देसाई यांनी महाराष्ट्र संघाबरोबर वॉटर पोलो क्रीडा
प्रकारात अंतिम सामन्यामध्ये केंद्रीय सचिवालय, नवी
दिल्ली संघाचा 10/5 गुणांच्या फरकाने धुव्वा उडवून महाराष्ट्र
संघाला विजेतेपद मिळवून दिले.
गांधीनगर,गुजरात
येथे दि.27 नोव्हेंबर, ते
29 नोव्हेंबर,2018 मध्ये झालेल्या
राष्ट्रीय जलतरण स्पर्धेंतर्गत अखिल भारतीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा सहभाग
होता. महाराष्ट्राच्या संघामध्ये विकास देसाई यांची निवड झाली होती. त्यामध्ये या संघाने
विजय प्राप्त केला. विकास देसाई यांनी वॉटर पोलो क्रीडा प्रकारा शिवाय
50 मी. ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात रौप्यपदक व 4 बाय
100 मिडले प्रकारात कास्यपदक मिळविले. त्यांनी महसूल विभागाच्या होणा-या
विभागीय क्रीडा स्पर्धेत तसेच
राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेत जलतरण प्रकारात अनेकवेळा
सुवर्ण पदके मिळविली आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेवून त्यांना अनेक वेळा गौरविण्यात
आले आहे.
त्यांनी आत्तापर्यंत
मालवण येथील राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा (3 कि.मी.),
संकरॉक
टू गेट वे ऑफ इंडिया येथील (5.कि.मी.) स्पर्धेत
तसेच गोवा येथील बंबोलीम बिचवर झालेल्या 5 कि.मी.सागरी
जलतरण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करुन विभागीय
आयुक्त कार्यालयाचा नावलौकिक केला आहे.
त्यांच्या या
यशाबद्दल विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त पुनर्वसन श्री. दीपक नलवडे,
उपसचिव
तथा प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी श्री. भ.सं.वानखेडे, तहसिलदार
श्री.विवेक साळुंके, तसेच
जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी, डॉ जयश्री
कटारे, श्री. विकास भालेराव,
तहसिलदार,
महाराष्ट्र
राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष श्री.दिपक चव्हाण, पुणे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे
अध्यक्ष श्री. विनायक राऊत व स्वाती मुरदाळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन
करुन शुभेच्छा दिल्या.
0000

No comments:
Post a Comment