‘खेलो इंडिया’च्या यशस्वीतेसाठी उद्योजकांनी प्रशासनास सहकार्य करावे
-जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे दि. ९: विविध खेळांमध्ये कौशल्य असलेल्या प्रतिभावंत खेळाडूंना
प्रोत्साहित करण्यासाठी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने ‘खेलो इंडिया’ स्पर्धेचे
आयोजन करण्यात येते. 7 ते 20 जानेवारी, 2019 या कालावधीत महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती
क्रीडा संकुलात ‘खेलो इंडिया’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले
आहे. या स्पर्धेच्या आयोजनात उद्योजकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
खेलो इंडिया स्पर्धेच्या आयोजनाच्यानिमित्त चाकण परिसरातील उद्योजकांची
बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी जिल्हाधिकारी नवल
किशोर राम बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, क्रीडा
विभागाचे सहसंचालक नरेंद्र सोपल, चाकण औद्योगिक वसाहत संघटनेचे सनी साकला, क्रीडा सहायक
संचालक सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, तहसिलदार
विकास भालेराव आदी उपस्थित हेाते.
या
स्पर्धेमुळे उत्कृष्ट खेळाडू तयार होतील व ते आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नांव
उज्वल करणार असल्याने, उद्योजकांनी या
स्पर्धेच्या ठिकाणी देण्यात
येणाऱ्या आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्यासाठी स्पर्धा आयोजनात प्रशासनास सहकार्य
करावे. यावेळी महानगरपालिका आयुक्त सौरभ राव
यांनीही उद्योजकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. बैठकीला उपस्थित विविध
उद्योगांच्या प्रतिनिधींनी स्पर्धेला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. बैठकीला चाकण
परिसरातील उद्योजक उपस्थित होते.
0000
No comments:
Post a Comment