Thursday, June 21, 2018

सुदृढ लोकशाहीसाठी पारदर्शी आणि जबाबदारीपूर्ण काम व्हावे
उपराष्‍ट्रपती व्‍यंकय्या नायडू
 पुणे दि. 21 (विमाका):  पुणे शहराला  ऐतिहासिक वारसा लाभलेला असून देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून या शहराची ओळख आहे.महानगरपालिकेने सुंदर सभागृह बांधले असून या सभागृहातून जनहिताचे चांगले निर्णय व्हावे आणि  सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न व्हावा.सुदृढ लोकशाहीसाठी पारदर्शी आणि जबाबदारीपूर्ण कामकाज व्हावेअसे प्रतिपादन उपराष्‍ट्रपती व्‍यंकय्या नायडू यांनी केले.

पुणे महानगरपालिकेच्‍या नवीन विस्‍तारीत इमारतीचे उद्घाटन उपराष्‍ट्रपती व्‍यंकय्या नायडू यांच्‍या हस्‍ते झालेत्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्‍हणून  मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. कार्यक्रमास  केंद्रीय मनुष्‍यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकरराज्‍याचे अन्‍न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राज्‍याचे सामाजिक न्‍याय राज्‍यमंत्री दिलीप कांबळेजलसंपदा व जलसंधारण राज्‍यमंत्री विजय शिवतारेखासदार अनिल शिरोळेमहापौर मुक्ता टिळकउपमहापौर सिध्दार्थ धेंडेस्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीकसभागृह नेते श्रीनाथ भिमाले,मनपा आयुक्त सौरभ राव आदि उपस्थित होते

आपण अनेक ठिकाणी जावून आलो पण असे सुंदर आणि देखणे सभागृह कुठेही पाहायला मिळाले नाहीअसे गौरवोद्गार काढून उपराष्‍ट्रपती व्‍यंकय्या नायडू पुढे म्हणालेया शहराविषयी नेहमीच मनात आदर व आकर्षण राहिले आहेया शहराने देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात अमुल्य योगदान दिले आहेमुंबईनंतर देशात पुण्याची  ओळख आहेझपाट्याने विकसित होणाऱ्या या पुणे शहराने केंद्र व राज्यशासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून स्वच्छसुंदर आणि हिरवेगार शहर निर्माण करावेअशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पुणे शहराचा स्मार्टसिटी योजनेत समावेश झाला आहेयातील सर्व योजनांच्या कामात पारदर्शीपणा आणि उत्तरदायित्व जोपासले जावे.नागरिकांना कालचे पुणेआजचे पुणे आणि उद्याचे पुणे याबाबत समजावून सांगितल्यास त्यांचाही सहभाग याकामी लाभू शकतोनागरिकांना प्राथमिक गरजा उपलब्ध करुन देतांनाच ऑनलाईन सुविधा पुरविण्याच्या प्रयत्न केला जावारस्ते तसेच नद्यांवरील अतिक्रमणे दूर व्हावीतनद्यांमध्ये सांडपाणी सोडले जावू नयेयासाठी जनजागृती करावीअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शारीरिक श्रम नसल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याचे नमूद करुन त्यांनी सायकल ट्रॅक्सची आवश्यकता प्रतिपादन केलीआरोग्य हीच संपत्ती या उक्तीचा उल्लेख करुन ते म्हणालेधनसंपत्ती असूनही मधूमेहहायपर टेन्सन या सारखे रोग असतील तर त्या संपत्तीचा काय उपयोग ?महापालिकेने नागरिंकाच्या आरोग्याचीही काळजी घ्यावीअसे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
          मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यावेळी आपल्या प्रमुख भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेउपराष्ट्रपती या कार्यक्रमासाठी आलेयाबद्दल राज्याचे प्रमुख या नात्याने त्यांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतोपुणे महानगरपालिकेने सुंदर आणि देखणे सभागृह बांधले आहेया सभागृहाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव दिल्याने अधिक महत्व वाढले आहेछत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार चालवताना नेहमीच रयतेचा विचार केलासामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून सर्व घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केलात्यांचे विचार व आचार अंमलांत आणून या सभागृहातून कामकाज चालावेअशी अपेक्षा व्यक्त करुन मुख्यमंत्री पुढे म्हणालेपुणे हे ऐतिहासिक शहर आहेया शहराला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेला आहेत्यांच्या कार्याने ही भूमी पुनित झालेली आहे.
          सांस्कृतिक बरोबरच ज्ञाननगरी म्हणून पुण्याचा देशभर नावलौकिक आहे.        21  व्या शतकात मुंबईनंतर पुणे हे विकासाचे इंजिन म्हणून काम करणार असल्याचे सांगून ते पुढे म्हणालेपुणे हे आंतरराष्ट्रीय शहर व्हावेयासाठी विविध विकासाची कामे आपण राबवित आहोतपुणे महामेट्रो,रिंगरोड हे विकासाचे मॉडेल ठरणार आहेपुणे येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊ घातले असून पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा व मुठा या नदीचे पुनर्जीवन करण्याचे काम हाती घेतले आहेयाशिवाय स्वारगेट येथे ट्रान्सपोर्ट हब होत आहेप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे स्मार्ट सिटीचे उद्घाटन झाले होतेत्यांच्या स्वप्नातले हे शहर आदर्शसुंदर व देखणे होण्यासाठी राज्यशासनाचे पाठबळ असणार आहे.
          पुण्याचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा यापुढेही अधिक जोमाने सुरु राहावायासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन करुन  मुख्यमंत्री पुढे म्हणालेविकासासाठी सर्वांनी एकत्र येवून काम करावेया सभागृहातून चांगले निर्णय व्हावेअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी केंद्रीय मनुष्‍यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर म्हणालेहे सभागृह देखणे झाले आहेविकासासाठी सर्वांनी एकत्र येवून काम करावे.
          यावेळी पालकमंत्री गिरीश बापट आपल्या मनोगतात म्हणालेपुण्याचा डीपी मंजूर झाल्याने विकासाच्या वाटा मोकळ्या झाल्यासामान्यांना केंद्रबिंदू मानून पुण्याचा विकास सुरु आहेशहराच्या विकासासाठी कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
          यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात पुणे शहराची ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी स्पष्ट करतांना शहराने केलेल्या विकास कामाची व होऊ घातलेल्या विविध योजनांची माहिती दिलीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे शहर नावलौकिक मिळवेलअसा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपमहापौर सिध्दार्थ धेंडे यांनी मानलेयावेळी लोकप्रतिनिधी,अधिकारी उपस्थित होते.
       
ठळक वैशिष्ट्ये
·                     पुणे महानगरपालिकेचे सध्याचे क्षेत्रफळ सुमारे 250 चौ. कि.मी असून नव्याने समाविष्ट 11 गावांसहीत क्षेत्र सुमारे 331 चौ. किमी. इतके झाले आहे. सध्याची लोकसंख्या सुमारे 40 लक्ष  इतकी असून 167 नगरसेवक आहेत. वाढत्या लोकसंख्येचा कारभार त्या त्या भागातून चालण्याच्या दृष्टीने क्षेत्रिय स्तरावरील 15 क्षेत्रिय कार्यालये कार्यरत आहेत.
·                     पुणे मनपाचा वाढलेला विस्तार विचारात घेऊन अस्तित्वातील इमारतीच्या दक्षिण बाजूस चौरस आकारात एका नवीन विस्तारीत इमारतीचे दुमजली बेसमेंट पार्किंग अधिक चार मजले अशा स्वरूपाचे इमारतीचे बांधकाम पूर्ण केले असून वापरासाठी एकूण सुमारे अंदाजे 14 हजार चौ.मी. क्षेत्र उपलब्ध झाले आहे.
·                    या मध्ये तळमजल्यावर सर्व विभागांसाठी एकत्रित असे नागरिक सुविधा केंद्रएक खिडकी योजना कक्षपोस्ट ऑफिसबँक ए.टी.एम,पीएमपीएमएल पास केंद्र इ. सुविधा करण्यात आल्या आहेत.
·                    पहिल्या मजल्यावर विविध पक्ष कार्यालये व नगरसचिव कार्यालय करण्यात आली आहेत. दुस-या मजल्यावर सभागृह नेतास्थायी समिती अध्यक्षउपमहापौरविरोधी पक्षनेता व विविध समिती अध्यक्ष यांची दालने तसेच स्थायी समिती सभागृह इतर समिती सभागृहपत्रकार कक्ष व विविध पक्ष पदाधिकारी कार्यालय बांधण्यात आली आहेत.
·                    तिस-या मजल्यावर 72 फूट व्यासाचे घुमटाकार मुख्य सभागृहाचे व महापौर दालनाचे बांधकाम करण्यात आले आहे. मुख्य सभागृहाचे व महापौर दालनाचे बांधकाम करण्यात आले आहे. मुख्य सभागृहासाठीलोखंडी फ्रेम व जी.आर.सी. (ग्लास रिनर्फोर्स्ड कॉन्क्रीट) मटेरियलचा गोलाकार घुमट करण्यात आला असून घुमटाची उंची तळापासून सुमारे 60 फूट इतकी आहे. नवीन सभागृहामध्ये 224 सभासदांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रेक्षक गॅलरीमध्ये 180 नागरिकांकरीता आसन व्यवस्था केलेली आहे. महापौर यांच्या डायसच्या मागील बाजूस 50 अधिकारी व त्या मजल्यावर सुमारे 50 पत्रकारांसाठी कक्षाची रचना केली आहे.
·                    इमारतीसाठी अद्ययावत वातानुकूलीत यंत्रणा, 6 उद्वाहने व वीजेची बचत होणारी एल.ई.डी दिव्यांची विद्युत व्यवस्था करण्यात आलेली आहे. या इमारतीचे बांधकाम हे पर्यावरण पुरक निकषांन्वये करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे सुसज्ज अग्निशमन यंत्रणा व फायर अलार्म सिस्टिम करण्यात आली आहे.
·                     आजपर्यंत या कामासाठी सुमारे 48.75 कोटी रुपये इतका खर्च झाला आहे. या इमारतीचे बांधकाम सुमारे सव्वातीन वर्षात पूर्ण करण्यात आले असून यामुळे पुणे महानगरपालिकेस नवीन सुसज्ज वास्तू उपलब्ध झाली आहे.

000000

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे पुणे विमानतळावर स्वागत

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे पुणे विमानतळावर स्वागत
  उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे आज वायुसेनेच्या विमानाने पुणे येथील लोहगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पुणे येथील विविध समारंभास उपस्थित राहण्यासाठी पुण्यात त्यांचे आगमन झाले आहे.
  यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापटसामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेपुण्याच्या महापौर मुक्ता टिळकखासदार अनिल शिरोळेलेफ्टनंट जनरल मनोज पांडेविभागीय आयुक्त दीपक म्हैसेकरपोलीस आयुक्त रश्मी शुक्लाजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही उपराष्ट्रपती महोदय यांचे स्वागत केले.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.






























शेतीच्या शाश्वत विकासासाठी प्रयोगशाळेतील तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता -उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

शेतीच्या शाश्वत विकासासाठी
प्रयोगशाळेतील तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता
-उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
            पुणे दि. २१ : शेती क्षेत्राच्या विकासासाठी सिंचनपायाभूत सुविधागुंतवणूक आणि विमा क्षेत्रांना बळकट करून प्रयोगशाळेतील तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे. कृषी उत्पादनाच्या विपणन व्यवस्थेला बळकटी देण्याबरोबरच शेतकऱ्यांना ज्ञानतंत्रज्ञान आणि पतपुरवठा केल्यास त्यांची उत्पादकता वाढेल. शेतकऱ्यांच्या ज्ञानात आणि त्यांच्याकडील तंत्रज्ञानात भर घालण्यासाठी सर्वांना  शेतकऱ्यांसोबत काम करावे लागेलअसे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज व्यक्त केले.
येथील वैकुंठ मेहता सहकार व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेमध्येआयोजित कृषी क्षेत्र शाश्वत व फायदेशीर बनविण्याविषयी आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमाजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवारज्येष्ठ शास्त्रज्ञ तथा कृषी तज्ज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथनएस. के. पट्टनायकआय. व्ही. सुब्बा रावटी. चटर्जीआंध्रप्रदेशचे माजी कृषीमंत्री व्ही रावअशोक गुलाटी उपस्थित होते.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणालेशेती व्यवहार्यफायदेशीर आणि शाश्वत  बनविण्यासाठी बहुस्तरीय धोरण विकसित करण्याची गरज आहे. कृषी उत्पादनात आपण मोठी प्रगती केली असून  अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झालो आहे. मात्र यापुढे आपल्याला रासायनिक खते व औषधांच्या वापरावर नियंत्रण आणण्याची आवश्यकता आहे.तरच आपण शाश्वत शेतीकडे जावू शकतो. शेतीमधून शाश्वत उत्पादन मिळत नसल्याने अनेक जण शेतीपासून तुटत आहेत. विविध उपाययोजनांचा अवलंब करून आपल्याला शेतीला शाश्वत केले पाहिजे. तरुणांना शेती व्यवसायाकडे वळविण्यासाठी आपल्याला प्रयत्न करण्याची आवश्यकताआहे. कृषी क्षेत्रासमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

         फळेभाजीपालामसालेडाळीआणि ऊस यांसारख्या उच्च मूल्यांच्या पिकाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. उत्पादन वाढीबरोबरच आपल्याला अन्नधान्याच्या कार्यक्षम वितरणाची गरज आहे. शेतकऱ्यांना पीक पध्दतीकापणी नंतरची प्रक्रिया आणि अन्नप्रक्रिया तंत्रज्ञानाविषयी सल्ला देण्यासाठी कृषि विज्ञान केंद्रांनी अधिक लोकाभिमूकपणे काम करण्याची आवश्यकता आहे. आपल्याला शेती क्षेत्र सुधारण्यासाठी काही अर्थपूर्ण आणि व्यावहारिक उपाय शोधून सध्याच्या धोरण व कार्यक्रमांचे सुसूत्रीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेराज्यातील ५० ते ५५ टक्के जनता आजही कृषी क्षेत्रावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अवलंबून आहे. मात्र राष्ट्रीय सकल उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा केवळ १० टक्के आहे.  यासाठी कृषी क्षेत्रात अधिकाधिक गुतंवणूक होण्याची आवश्यकता आहे. गुंतवणुकीच्या माध्यमातूनच कृषी क्षेत्राचा शाश्वत विकास शक्य आहे. त्यासाठी राज्य शासन कृषी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी प्रयत्नशील आहे. कृषी क्षेत्राच्या विकासावर अनेक घटकांचा परिणाम होतोत्यात मान्सूनचा मोठा वाटा आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे कृषी क्षेत्रावर मोठा ताण येतो. जलव्यवस्थापनाच्या माध्यमातून या समस्येवर मात करता येते. महाराष्ट्रात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून यावर मात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जलयुक्त शिवार’ अभियान हे शास्त्रशुद्ध प्रक्रीया असणारी चळवळ आहे. या माध्यमातून राज्यातील अनेक खेडी जलस्वयंपूर्ण झाली आहेत. शेकडो गावे पाणीदार झाली असून त्याठिकाणी संरक्षीत सिंचन शेतीसाठी उपलब्ध झाले आहे. गेल्यावर्षी सरासरीच्या ८० टक्के पाऊस होऊनही शेती उत्पादन ११० टक्के झालेहे योग्य प्रकारे जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापनामुळेच शक्य झाले.
            मुख्यमंत्री पुढे म्हणालेजलसंधारणाच्या विविध उपययोजनांमुळे शेती उत्पादनात वाढ झाल्याने कृषी मालाच्या दरा विषयी अडचण निर्माण झाली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या कृषी मालाला योग्य दर देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठया प्रमाणावर कृषिमाल खरेदी केला आहे. शाश्वत शेतीसाठी शेती आणि शेतकऱ्यांसमोर मार्केट लिंकेज हे सगळ्यात मोठे संकट आहे. शेतकऱ्याच्या उत्पादित कृषी मालाला योग्य बाजारपेठ मिळवून देणे आवश्यक आहे. त्याच बरोबर छोटी जमीनधारणा ही सुध्दा शाश्वत शेतीसमोरील मोठी समस्या आहे. यासाठी शासन गट शेतीला चालना देण्यासाठी प्रयत्नशील आहे. गट शेतीला चालना देण्यासाठी शासनाच्यावतीने विविध योजना आखण्यात आल्या आहेत. कृत्रिम बुध्दीमत्ते सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती क्षेत्रात तंत्रज्ञान आणणे आवश्यक असून यासाठी शासन प्रयत्नशील आहे. केंद्र सरकारच्यामाध्यमातून सुरू असणारी स्वराज्य ते सुराज्य ही चर्चासत्राची शृंखला अत्यंत महत्वाची आहे. या माध्यमातून देशातील कृषी क्षेत्रात मोठा बदल घडण्यास मदत होईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी खासदार शरद पवार म्हणालेगेल्या काही वर्षात भारत हा कृषीमाल निर्यातदार देश झाला आहे. देशातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी त्यांच्या कौशल्य विकासव्यापार कौशल्य आणि कृषी क्षेत्रात येणाऱ्या नवनव्या तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याची आवश्यकता आहे. तसेच शेतकऱ्यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगांना चालना देण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी हे चर्चासत्र उपयुक्त आहे.
 यावेळी  डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनी ग्रीन टू एव्हरग्रीन फॉरेव्हर या विषयावर सादरीकरण केले. यावेळी त्यांनी आपल्या देशातील शेतीसमोर असणाऱ्या विविध आव्हानांचा आढावा घेतला. शेतीच्या शाश्वत विकासासाठी उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.
यावेळी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञसंशोधकशास्त्रज्ञ उपस्थित होते.
00000

Monday, June 18, 2018

बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याला उत्स्फुर्त प्रतिसाद 
रोजगार मेळावा सोहळा नसून शासनाची बांधिलकी
-उद्योगमंत्री सुभाष देसाई
पुणे दि. 16 : राज्यातील तरुणाईच्या हाताला रोजगार मिळवून देण्याचे काम उद्योग विभागाने हाती घेतले आहे. त्यासाठी बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याची अभिनव संकल्पना राज्य सरकारने सुरू केली आहे. रोजगार मेळावा हा फक्त ‘सोहळा’ नसून  शासनाची ती ‘बांधिलकी’ असल्याचे सांगत या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरी मागणारा आणि देणारा यांच्यात सांगड घालण्याचे काम शासन करत असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज केले.
राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि सी.आय.आय.च्यावतीने उरळी देवाची जि. पुणे येथे आयोजित पहिल्या बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी उद्योग मंत्री सुभाष देसाई बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, खादी ग्रामोद्योग महामंडळाचे विशाल चोरडीया, उद्योग विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सी. आय. आय.चे महाव्यवस्थापक आशिष केशरवानी उपस्थित होते.
उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले, राज्यातील उद्योगवाढी बरोबरच तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्याचे काम उद्योग विभागाचे आहे. राज्यात उद्योगांची संख्या वाढली की त्यांना काम करणाऱ्या कुशल कामगारांचीही गरज असते, असे कुशल कामगार या मेळाव्याच्या माध्यमातून उद्योजकांना मिळणार आहेत. बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यासाठी पहिल्याच आठवड्यात 8 हजार 800 उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. तर दोन ते तीन हजार नव्या उमेदवारांनी आज प्रत्यक्ष नोंदणी केली आहे. हा पहिलाच मेळावा अत्यंत यशस्वी झाला आहे. याच प्रकारचे मेळावे राज्यभर घेण्यात येणार आहेत. यासाठी एका स्वतंत्र कक्षाची स्थापना करून या मेळाव्याच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या उमेदवारांना नोकरी मिळेपर्यंत त्याचा पाठपुरवा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, तरुणांच्या हाती ताकद आहे, बुद्धी आहे, परंतु रोजगार नसल्याने प्रश्न निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत या रोजगार मेळाव्याला मोठे महत्व आहे. राज्यातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा मेळावा आहे. एका युवकाला रोजगार मिळाला की त्याचे संपुर्ण कुटुंब उभे राहते. त्यामुळे या मेळाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक कुटुंबे उभी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले, विकासाच्या कामात प्रशिक्षीत मनुष्यबळाची खूप आवश्यकता असते. या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक बेरोजगार युवकांना काम मिळणार आहे. रोजगाराबरोबरच स्वयंरोजगाराला या माध्यमातून चालना मिळणार आहे. गुंजवणी धरणाच्या माध्यमातून पुरंदर तालुक्याच्या विकासाला मोठी चालना मिळाली आहे. पुरंदर विमानतळामुळे पुरंदर हा सर्वात वेगाने विकसित होत असलेला तालुकाअसल्याचे त्यांनी सांगितले.

श्री आदित्य ठाकरे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा ही राज्य शासनाची अत्यंत उपयुक्त संकल्पना आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून राज्यातील तरुणाईच्या हाताला त्याच्या योग्यतेचे काम मिळणार आहे. राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्यासाठी या मेळाव्याचा मोठा उपयोग होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत तरुणांनी जिद्द आणि चिकाटी सोडू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
        कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. हर्षदीप कांबळे यांनी केले. तर आभार विश्वनाथ राजाळे यांनी मानले. मेळाव्याला हजारो तरुण-तरुणींसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मेळाव्याची ठळक वैशिष्ट्ये
§  या मेळाव्यासाठी एकूण १० हजार ६८० उमेदवारांची ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी.
§  मेळाव्यामध्ये ४ हजार ३०० उमेदवारांची उपस्थिती.
§  मेळाव्यात १ हजार ८९० उमेदवारांना नियुक्ती पत्र.
§  नोंदणी झालेल्या उमेदवारांना नोकरी मिळवून देण्याच्या पाठपुराव्यासाठी उद्योग विभाग स्वतंत्र कक्ष उभारणार.
§  देशातील नामवंत ६० हून अधिक कंपन्यांची मेळाव्यात हजेरी.   
§  स्वयंरोजगार मार्गदर्शनासाठी स्वतंत्र दालन.
§  स्वयंरोजगार मार्गदर्शनासाठी विशेष चर्चासत्राचे आयोजन.
§  योग्य नियोजनामुळे मेळाव्यासाठी उपस्थित उमेदवार आणि पालक यांच्यात समाधान.
§  पालक आणि उमेदवारांच्यात मोठा उत्साह.
*****

मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या प्रतिक्रीया

मेळाव्याला आल्याचे सार्थक झाले...
मी माजी सैनिक आहे. सैन्य दलातून निवृत्त झाल्यावर कुटुंबाची काळजी घेत, घराच्या जवळ दुसरी नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्नशील होतो. बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याची माहिती मिळाली, त्यानुसार मी नोकरीसाठी मेळाव्यात नाव नोंदविले. सैन्य दलातील माझ्या कामाचा अनुभव पाहून मला तात्काळ या ठिकाणी नोकरी मिळाली. मला लगेचच जॉईनिंग लेटर ही मिळाले. या मेळाव्याला आल्याचे सार्थक झाले, मी शासनाचा मनापासून आभारी आहे.
-          आबासाहेब चौधरी
रा. फुरसुंगी, पुणे.

मला माझ्या पात्रतेची नोकरी मिळाली!
कराड तालुक्यातील छोट्या खेड्यातील मी मुलगा आहे. मी सीएनजी ऑपरेटर आहे. मी कामाच्या शोधात होतो. नोकरीसाठी मी अनेक ठिकाणी जावून आलो परंतू मला माझ्या पात्रतेची नोकरी मिळत नव्हती. बाळासाहेब ठाकरे मेळाव्यात मी आलो आणि मला माझ्या पात्रतेची नोकरी मिळाली. या ठिकाणी मला थेट जॉईनिंग लेटरच मिळाले, त्यामुळे मी खूप खूश असून शासनाचा आभारी आहे.
-          राहूल आनंदराव खबाले
रा. विंग, ता. कराड, जि. सातारा.   

नोकरी मिळाल्याचा मोठा आनंद!
बाळासाहेब ठाकरे मेळाव्याची माहिती मला मिळाल्यानंतर या ठिकाणी मी नोकरीसाठी नावाची नोंदणी केली. एकाच ठिकाणी एवढ्या कंपन्या आल्यामुळे नोकरी नक्की मिळेल अशी आशा होती. मात्र लगेच आजच हातात कॉल लेटर मिळेल असे वाटले नव्हते. मात्र या रोजगार मेळाव्यामुळे हे शक्य झाले. नोकरी मिळाल्याचा मला मोठा आनंद असून शासनाचा मी खूप-खूप आभारी आहे.
-          प्रसाद सुनिल मेमाणे
रा. पारगाव, ता. पुरंदर, जि. पुणे. 

लगेच नोकरी मिळेल असे वाटलेच नव्हते...
दौंड तालुक्यातले लोणारवाडी हे माझ गाव आहे. मात्र मी पुरंदर तालुक्यातल्या माझ्या काकांच्या गावात शिक्षण पूर्ण केले. बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्या विषयी माहिती मला मिळाल्यावर मी सहजच नोकरीसाठी माझ्या नावाची नोंदणी केली. एवढी मुल इथ दिसल्यावर मला नोकरी मिळेल का? अशी शंका होती, मात्र अगदी सहजच मला नोकरी मिळाली, कॉल लेटर हातात घेतल्यावर सुध्दा एवढ्या सहज नोकरी मिळाली आहे, असं वाटतच नाही. मी शासनाचा आभारी आहे.
-          अक्षय गाढवे
रा. लोणारवाडी, ता. दौंड, जि. पुणे. 
*****
खुपच चांगले उमेदवार आम्हाला मिळाले
बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यात आमची आयएसटीसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सहभागी झाली होती. या निमित्ताने अनेक होतकरू, हुशार उमेदवार आम्हाला मिळाले आहेत. आमच्याकडे आलेल्या अर्जातील मुलांच्या पात्रतेनुसार आम्ही त्यांना नोकरी देणार आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने कुशल उमेदवार आम्हाला मिळणार आहेत, या रोजगार मेळाव्याचा उमेदवारांबरोरच कंपन्यांनाही चांगला फायदा झाला आहे.
-          मनिषा मोहिते
                                                                        आयएसटीसी प्रा. लि. कंपनी. प्रतिनीधी  
रा. खराडी, पुणे. 

*****

Friday, June 8, 2018


जिल्हयातील उरळी देवाची येथे 16 जून रोजी रोजगार मेळावा
पुणे दि.8 : जिल्हयातील बेरोजगार युवक युवतींसाठी आता रोजगाराच्या एकत्रीत पणे ‘बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या’ माध्यमातून संधी उपलब्ध होणार आहेत.  पुणे जिल्हयातील उरळी देवाची येथे शनिवार दि. 16 जून रोजी हा मेळावा होणार आहे. दहावी उत्तीर्ण ते पदवीधर मुला-मुलींना या मेळाव्यातून माहिती तंत्रज्ञान, औषध उत्पादन, हॉटेल  व इतर व्यवसाय क्षेत्रातील रोजगाराची संधी मिळणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्यावतीने बाळासाहेब ठाकरे रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे कौशल्य विकास विभाग, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, उद्योग संचालनालय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यावतीने युवक / युवतींना रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून राज्यभर मेळावे घेतले जाणार आहेत.  त्याचा प्रारंभ पुणे जिल्ह्यातील हडपसर परिसरातील उरळी देवाची येथून 16 जून रोजी सकाळी 10.00 ते 02.00 या कालावधीत होणार आहे. 
            या मेळाव्यात पुणे परिसर व जिल्ह्यातील प्रमुख उद्योग, कारखाने तसेच माहिती तंत्रज्ञान, औषध उत्पादक, हॉटेल उद्योग आदी क्षेत्रातील80 हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत.  संबंधित कंपन्या आपल्या प्रतिनिधीमार्फत इच्छुक उमेदवारांची आवड निवड लक्षात घेऊन प्रत्यक्षात नोकरीची संधी उपलब्ध करुन देणार आहेत. या मेळाव्यात कौशल्य विकास व स्वयंरोजगार या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. मेळाव्यात शासनाच्या विविध विभागांची रोजगार-स्वयंरोजगार संबंधीची दालने मार्गदर्शनासाठी उपलब्ध असतील.  या ठिकाणी इच्छुकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तसेच मेळाव्यानंतरही त्यासंबंधीचा पाठपुरावा केला जाणार आहे.
            सीआयआय या उद्योग संघटनेचा या उपक्रमात प्रमुख सहभाग आहे. राज्याच्या विविध भागात अशा प्रकारे मेळावे आयोजित केले जाणार असून त्याद्वारे तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी  www.balasahebthackrayrojgarmeleva.com  या संकेतस्थळावर 4 ते 10 जून दरम्यान नोंदणी करावी, असे आवाहन उद्योग विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
00000

  अन्नसुरक्षा अधिनियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी
                                                                   - पालकमंत्री गिरीश बापट
पुणे दि. 8- अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या योजनांची तसेच  राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी अशी सुचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत व्हीव्हीआयपी सर्कीट हाऊस येथे श्री. बापट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी  ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार सर्वश्री जयदेव गायकवाड, माधुरी मिसाळ, संग्राम थोपटे, राहूल कुल, जगदीश मुळीक, महेश लांडगे, मेधा कुलकर्णी, भिमराव तापकीर, योगेश टिळेकर, उपायुक्त दीपक नलावडे, जिल्हा ‌पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार, जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी रघुनाथ पोटे, आदी उपस्थित होते.
श्री. बापट म्हणाले, एइपीडीएस प्रणालीद्वारे पुणे जिल्ह्यात धान्य वितरण सुरू आहे. या प्रणालीवरील व्यवहार वाढविण्याचा प्रयत्न करावेत.अन्नधान्य वितरण विभागाची परिमंडल कार्यालये संबंधीत भागातच स्थापन करण्यासाठीची जलद कार्यवाही करावी. अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी समन्वय ठेवून आधार सिडींग  वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. काही ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडर हे व्यावसायिक कारणासाठी वापरल्याचे आढळून येते. याची तपासणी करून दोषींवर कारवाई करावी. जिल्ह्यात उज्जवला गॅस योजनेंतर्गत 72 हजार 500 कनेक्शन देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अधिकाधिक गरजू व्यक्तींना या योजनेचा लाभ द्यावा, असे सांगून श्री. बापट म्हणाले, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. तसेच लोकप्रतिनिधींनी जागरूकतेने काम करावे. अन्नधान्य वितरण व्यवस्थेत गैरव्यवहार करणाऱ्या दुकानदारांविरूद्ध तक्रार दाखल करावी, जेणेकरुन  दोषींवर कारवाई करता येईल,  अशा सूचना देखील श्री. बापट यांनी  यावेळी दिल्या.  
यावेळी लोकप्रतिनिधींनी त्यांच्या भागामधील अन्नधान्य वितरण व्यवस्थेबाबत तसेच समस्येबाबत चर्चा केली आणि विविध सूचना मांडल्या.

00000

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...