Thursday, June 21, 2018

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे पुणे विमानतळावर स्वागत

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे पुणे विमानतळावर स्वागत
  उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे आज वायुसेनेच्या विमानाने पुणे येथील लोहगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पुणे येथील विविध समारंभास उपस्थित राहण्यासाठी पुण्यात त्यांचे आगमन झाले आहे.
  यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, लेफ्टनंट जनरल मनोज पांडे, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही उपराष्ट्रपती महोदय यांचे स्वागत केले.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.






























No comments:

Post a Comment

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...