अन्नसुरक्षा अधिनियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी
पुणे दि. 8- अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या योजनांची तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी अशी सुचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत व्हीव्हीआयपी सर्कीट हाऊस येथे श्री. बापट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार सर्वश्री जयदेव गायकवाड, माधुरी मिसाळ, संग्राम थोपटे, राहूल कुल, जगदीश मुळीक, महेश लांडगे, मेधा कुलकर्णी, भिमराव तापकीर, योगेश टिळेकर, उपायुक्त दीपक नलावडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार, जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी रघुनाथ पोटे, आदी उपस्थित होते.
श्री. बापट म्हणाले, एइपीडीएस प्रणालीद्वारे पुणे जिल्ह्यात धान्य वितरण सुरू आहे. या प्रणालीवरील व्यवहार वाढविण्याचा प्रयत्न करावेत.अन्नधान्य वितरण विभागाची परिमंडल कार्यालये संबंधीत भागातच स्थापन करण्यासाठीची जलद कार्यवाही करावी. अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी समन्वय ठेवून आधार सिडींग वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. काही ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडर हे व्यावसायिक कारणासाठी वापरल्याचे आढळून येते. याची तपासणी करून दोषींवर कारवाई करावी. जिल्ह्यात उज्जवला गॅस योजनेंतर्गत 72 हजार 500 कनेक्शन देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अधिकाधिक गरजू व्यक्तींना या योजनेचा लाभ द्यावा, असे सांगून श्री. बापट म्हणाले, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. तसेच लोकप्रतिनिधींनी जागरूकतेने काम करावे. अन्नधान्य वितरण व्यवस्थेत गैरव्यवहार करणाऱ्या दुकानदारांविरूद्ध तक्रार दाखल करावी, जेणेकरुन दोषींवर कारवाई करता येईल, अशा सूचना देखील श्री. बापट यांनी यावेळी दिल्या.
यावेळी लोकप्रतिनिधींनी त्यांच्या भागामधील अन्नधान्य वितरण व्यवस्थेबाबत तसेच समस्येबाबत चर्चा केली आणि विविध सूचना मांडल्या.
00000

No comments:
Post a Comment