Monday, September 12, 2016

केसरी वाडयात संवादपर्व उपक्रम
मुद्रा बँक योजनेत पुणे जिल्हा
राज्यात प्रथम : देशमुख
पुणे, दि.12:  मुद्रा बँक योजना ही अतिशय महत्वपूर्ण योजना आहे. यामध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दिनकर देशमुख यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत जिल्हा माहिती कार्यालय यांच्या वतीने केसरी वाडयात गणेश  मंडळाच्या सहकार्याने आयोजित संवादर्व  कार्यक्रमात मार्गदर्शन करताना  बोलत होते. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी श्री. ए. व्ही. सौंधनकर, जिल्हा माहिती अधिकारी गोविंद अहंकारी, गणेश मंडळाचे संयोजक रमेश ढेकणे आदि उपस्थित होते.
यावेळी श्री. देशमुख यांनी मुद्रा योजनेअंतर्गत शिशु, किशोर, तरुण योजनेची सविस्तर माहिती दिली. तसेच या योजनेचा जिल्हयातील सुमारे 53 हजार व्यक्तींनी लाभ घेतला आहे. या योजनेचा जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले.
तसेच प्रधानमंत्री जन-धन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल  पेन्शन योजनेची माहिती देवून मार्गदर्शन केले.
संवादपर्व उपक्रमाव्दारे गणेश मंडळाच्या मार्फत थेट संवाद साधून विविध योजनेची माहिती लाभार्थ्यांना पेाहचविण्याचा उपक्रम राबविला असल्याचे प्रतिपादन श्री. देशमुख यांनी केले.
यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी श्री. सौंधनकर यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने योजना, त्याची कर्ज मर्यादा, अर्ज कसा करावा, ऑनलाईन अर्ज कसा करावा. त्याचप्रमाणे महिलांसाठी व्यवसाय करण्यासाठीच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.
प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी गोविंद अहंकारी यांनी संवादपर्व उपक्रमाबातची संकल्पाना विषद केली. सदरील कार्यक्रमास मुद्रा योजनेच्या बाबतची माहितीपत्रकेही उपस्थितांना देण्यात आली.

                                                            00000

No comments:

Post a Comment

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...