अन्न धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी
जिल्ह्यातील धान्य मिलवर कडक लक्ष ठेवा
- पालकमंत्री गिरीश बापट
पुणे दि. ९ : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्याच्या काळ्याबाजारावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्ह्यातील सर्व धान्य मिलवर कडक लक्ष ठेवण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज दिली.
येथील
व्ही.व्ही.आय.पी विश्रामगृहात जिल्हास्तरीय सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समितीची बैठक पालकमंत्री श्री. बापट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, आमदार निलम गोऱ्हे, आमदार संग्राम थोपटे, आमदार शरद सोनावणे, जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योती कदम उपस्थित होत्या.
श्री.
बापट म्हणाले, सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून सामान्य नागरीकांना धान्य, केरोसिन, गॅसचे योग्य प्रकारे वाटप होण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने सतर्कता बाळगावी. काळ्या बाजारात जाणाऱ्या धान्याची विल्हेवाट धान्याच्या मिलवर लावण्यात येते, त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक मिलवर कडक लक्ष ठेवावे. जिल्ह्यात टाकलेल्या धाडींचा अद्यावत अहवाल वेळोवेळी सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
काळ्या
बाजारात जाणारे धान्य रोखण्यासाठी विशेष प्रकारच्या शिलाई पॅकींगचे प्रात्यक्षिक यावेळी पालकमंत्री श्री. बापट यांच्यासमोर सादर करण्यात आले.
याबैठकीला
सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समितीचे सदस्य पल्लवी सुरसे, ज्योती गायकवाड, चेतन आगरवाल, निलेश जठार, अपर्णा खामकर, अमृत शेवकरी, निहाल घोडके, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत पिसाळ, तहसिलदार श्री. सावंत, नायब तहसिलदार श्री. बडे उपस्थित होते.
या बैठकीनंतर हुतात्मा स्मारक देखभाल व पर्यवेक्षण समिती बैठक पालकमंत्री श्री. बापट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी यावषयीचा आढावा सादर केला. या बैठकीला समितीचे सदस्य उपस्थित होते.
0000
No comments:
Post a Comment