जलयुक्त शिवार
अभियानांसाठी
सीएसआर
फंड वाढविण्यावर भर द्या
- पालकमंत्री
गिरीश बापट
पुणे
दि. ९ : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१६-१७ या वर्षासाठी जिल्ह्यात १९० गावांची निवड करण्यात आली असून यासाठी २४७ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. या कामांसाठी १५८ कोटी रुपयांचा संभाव्य निधी उपलब्ध असून उर्वरीत निधीसाठी लोकसहभागाबरोबरच उद्योजकांकडील सीएसआर फंड वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज दिल्या.
येथील
व्ही.व्ही.आय.पी विश्रामगृहात जलयुक्त शिवार अभियानाच्या जिल्हास्तरीय सनियंत्रण व आढावा
बैठक पालकमंत्री श्री. बापट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, खासदार अमर साबळे, आमदार सर्वश्री अजित पवार, जीवनराव गोरे, दत्तात्रय भरणे, शरद सोनवणे, बाबुराव पाचर्णे, संजय भेगडे, भिमराव तापकीर, लक्ष्मण जगताप, संजय भेगडे, आमदार निलम गोऱ्हे, जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, जिल्हा कृषि अधिक्षक सुभाष काटकर उपस्थित होते.
जलयुक्त
शिवार अभियानांतर्गत सन २०१५-१६ या वर्षासाठी जिल्ह्यातील २०० गावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी १८७ गावे जलयुक्त म्हणून संबंधित गावच्या ग्रामसभांनी जाहिर केली आहेत. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात ३९ हजार ३०५ टिसीएम पाणी साठ्याची निर्मिती झाली असून ३५ हजार ३३० हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आले आहे. यावर्षी १९० नव्या गावांची निवड करण्यात आली आहे. यासाठी २४७ कोटी रुपयांचा आरखडा तयार करण्यात आला आहे. जलयुक्त शिवार
अभियानाच्या कामाची गती वाढविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात स्थानिक आमदारांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याच्या सूचना श्री. बापट यांनी यावेळी दिल्या.
जलयुक्त
शिवार अभियानाच्या आढावा बैठकीनंतर रोजगार हमी निगडीत फळबाग लागवड कार्यक्रम सन २०१६-१७ जिल्हास्तरीय संनियंत्रण व पुर्नविलोकन
समितीची सभा पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्ह्यातील सर्व रोपवाटीकेतील रोपांच्या संख्येचा आढावा घेण्यात आला. तसेच यावर्षीच्या फळबाग लागवड नियोजनाची माहिती जिल्हा कृषि अधिक्षक श्री. काटकर यांनी सभेसमोर दिली.
0000
No comments:
Post a Comment