Sunday, July 31, 2016

मागासगवर्गियांसाठीच्या योजनांचा लाभ तळागाळापर्यत पोहोचवा --- सामजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले


मागासगवर्गियांसाठीच्या योजनांचा लाभ
तळागाळापर्यत पोहोचवा
                                  --- सामजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले




पुणे, दि.३१ : मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. या  योजनांचा लाभ सर्वसामान्यांना होण्यासाठी त्या ताळागाळापर्यत पोहोचाव्याअसे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री श्री. राजकुमार बडोले यांनी आज केले.
            सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने शिरुर, जि. पुणे येथे बांधण्यात येणाऱ्या १०० विद्यार्थीनी क्षमतेचे मुलींचे शासकीय वसतीगृह इमारतीची पायाभरणी सामाजिक न्यायमंत्री  राजकुमार बडोले  यांच्या शुभहस्ते झाली. या पायाभरणी समारंभानंतर आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार बाबुराव पाचर्णे, माजी आमदार सुर्यकांत पलांडे, बांधकाम सभापती मंगलदास बांदल, पंचायत सभापती सिध्दार्थ कदम, भगवानराव शेळके, धर्मेंद्र खांडरे उपस्थित होते.
            यावेळी बोलतांना सामाजिक न्यायमंत्री  श्री. बडोले म्हणाले की, थोर पुरुषांनी समाज घडवण्याचे मोलाचे कार्य केले आहे. राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता व बंधुत्वाची शिकवण भारतीयांना दिली. सामाजिक न्यायाचा त्यांचा विचार जिवंत ठेवण्यासाठी व सर्वांना प्रेरणा मिळावी यासाठी शासनाने लंडनस्थीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पावन झालेले निवासस्थान खरेदी केले आहे. विदेशामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे असे सांगून ते म्हणाले की, समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे कार्य सामाजिक न्याय विभाग करत आहे. येणाऱ्या काळात नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी वसतिगृह उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मंत्रीमहोदयांनी दिली.
            दिव्यांगांसाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ दिव्यांगांना मिळावा यासाठी ग्रामीण भागात शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
            आमदार बाबुराव पाचर्णे यांनी मुलींच्या वसतिगृहाप्रमाणे मुलांचे वसतिगृह मंजूर करणे करवे अशी सूचना केली.
            बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांनी वसतिगृह प्रमाणे क्रीडा संकुल उभे करावे अशी मागणी यावेळी केली.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त लक्ष्मीकांत महाजन यांनी केले. वसतिगृह इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. पंचायत समिती सभापती भगवानराव शेळके यांनी आभार प्रदर्शन केले.
            कार्यक्रमास कार्यकारी अभियंता अेन. अे. तेलंग, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त्‍ अेस. आर. दाणे, विद्यार्थीनी , नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००


No comments:

Post a Comment

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...