सांसद
आदर्श ग्राम योजनेचा लाभ सर्वांना मिळावा
…
जिल्हाधिकारी सौरभ राव
पुणे
दि. 11 : सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत संबधित अधिकाऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना द्यावा. चांगले नियोजन करुन व नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवून या योजनेची अंमलबजावणी काटेकोरपण करावी व जास्तीत जास्त
गावांना या योजनेचा लाभ करुन मिळवून द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी
आज येथे अधिकाऱ्यांना केल्या. सांसद आदर्श
ग्राम योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली त्यावेळी ते बोलत
होते.
यावेळी
अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी सौरभ राव म्हणाले की, सध्या पावसाळा असला
तरी या योजनेंतर्गत वित्तविषयक वगळता स्वच्छता व आरोग्यविषयक, बेटी बचाव बेटी पढाव,
शैक्षणिक, बँकिंग, वृक्षारोपण असे जनजागृतीवर आधारित कार्यक्रम हाती घ्यावेत. ॲक्टीव्हिटी
चार्टची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
या
बैठकीला जिल्हा परिषदचे प्रकल्प संचालक दिनेश डोके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
यशवंत शितोळे, रजा राखील उपजिल्हाधिकारी रामदास जगताप, जिल्हास्तरावरील योजनेचे चार्ज
अधिकारी, तालुकास्तरावरील अधिकारी, खासदारांचे प्रतिनिधी, आदी उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment