Monday, July 11, 2016

आमदार आदर्श ग्राम योजनेचा लाभ सर्वांना मिळावा … जिल्हाधिकारी सौरभ राव

वृत्त क्र.  559
आमदार आदर्श ग्राम योजनेचा लाभ सर्वांना मिळावा
                                … जिल्हाधिकारी सौरभ राव
पुणे दि. 11 :  आमदार आदर्श गाव योजनेंतर्गत गावांचे पालकत्व यासाठी नेमणूक केलेल्या अधिकाऱ्यांने स्विकारावे.   ॲक्टीव्हिटी चार्टची त्वरेने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. चार्टचा पाठपुरावा करावा व वेळोवेळी तो अपडेट करावा व  सुयोग्य नियोजन करुन, नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवून या योजनेची अंमलबजावणी काटेकोरपण करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आज येथे अधिकाऱ्यांना दिल्या. आमदार आदर्श गाव योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली त्यावेळी ते बोलत होते.
      पुढे ते म्हणाले, लोकप्रतिनिंधीचे या योजनेबाबत मार्गदर्शन घ्यावे  तसेच त्यांनी सूचना केल्याप्रमाणे पाठपुरावा करावा.  गावात वातावरण निर्मिती करावी.  योजनेची अंमलबजावणी सुरु करावी.  जनजागृतीपर आधारित कार्यक्रम, समतोल अहवाल तयार करावा.  गावाचे भविष्य या योजनेवर अवलंबून असल्यामुळे अधिकाऱ्यांनी त्वरेने कामे पूर्ण करावीत. 
या बैठकीला जिल्हा परिषदचे प्रकल्प संचालक दिनेश डोके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, रजा राखीव उपजिल्हाधिकारी रामदास जगताप, जिल्हास्तरावरील योजनेचे चार्ज अधिकारी, तालुकास्तरावरील अधिकारी,  आमदारांचे प्रतिनिधी, आदी उपस्थित होते.
*****


No comments:

Post a Comment

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...