Monday, August 5, 2019

स्‍थानांतरीत कुटुंबियांची जिल्‍हाधिकारी राम यांनी केली विचारपूस
पुणे, दिनांक 5- अतिवृष्‍टीमुळे बाधित झालेल्‍या नागरिकांची विविध भागात राहण्‍याची सोय करण्‍यात आली आहे. आज जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी महात्‍मा फुले प्राथमिक विद्यालयात स्‍थानांतरीत  करण्‍यात आलेल्‍या कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली.  ढोलेपाटील रोड तसेच ताडीवाला रोड येथील नागरिकांची या विद्यालयात सोय करण्‍यात आली आहे. त्‍यांना भोजन, चहा-नाश्‍ता या शिवाय वैद्यकीय सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आल्‍या आहेत. जिल्‍हाधिकारी राम यांच्‍यासमवेत उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, पुणे महापालिकेचे सहायक आयुक्‍त दयानंद सोनकांबळे, नगरसेवक अरविंद शिंदे, मंगला मंत्री, प्रदीप गायकवाड, चांदबी नदाफ आदी उपस्थित होते. प्रशासनाच्‍या वतीने उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेल्‍या सोयीबद्दल नागरिकांनी समाधान व्‍यक्‍त केले. पूर ओसरल्‍यानंतर पंचनामे करण्‍यात येतील, असे जिल्‍हाधिकारी राम यांनी यावेळी सांगितले. 





No comments:

Post a Comment

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...