Tuesday, July 23, 2019

जलशक्ती अभियानाचा घेतला आढावा
जलशक्ती अभियानात सर्व घटकांचा व्यापक सहभाग आवश्यक
                                                            -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

            पुणे दि. 23- जलशक्ती अभियानाची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी व्हावी, नागरिकांमध्ये त्याचा सकारात्मक संदेश जावून त्यांचा सहभाग मिळावा, स्थानिक स्तरावर काम करण्याच्या अनुषंगाने सर्व घटकांचा व्यापक सहभाग जलशक्ती अभियानात मिळेल, यासाठी विविध यंत्रणांनी स्थानिक पातळीवर नियोजन करावेअशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या आहेत.
            केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत देशातील दुष्काळी भागातील जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यासाठी जलशक्ती अभियान ( जे.एस.ए .) राबविण्यात येत आहे. जलसंधारण आणि पाऊसपाणी संकलनपारंपरिक व इतर पाण्याच्या संरचनांचे नूतनीकरणपाणलोट क्षेत्र विकास यावर भर देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शिरूर आणि पुरंदर तालुक्यांचा समावेश आहे. या अनुषंगाने या अभियानाची सद्यस्थिती व सुरू असलेल्या कामांचा आढावा जिल्हाधिकारी राम यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस वनविभागसामाजिक वनीकरणपाटबंधारे विभाग, कृषीमहसूल आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
            जलसंवर्धन आणि पाऊस पाणी संकलनाच्या दृष्टीने जिल्ह्यात झालेली कामेत्यांची सद्यस्थितीत्यावर करावयाच्या उपाययोजनाचेक डॅमतळेट्रेंचछतावरील पाण्याचे संकलनपारंपरिक पाणीयोजनातळी आदी संरचनांचे नूतनीकरण तसेच विहीरी आणि विंधनविहीरी पुनर्जिवीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजनाआदी कामांचा त्यांनी आढावा घेतला. सुरुवातीच्या टप्प्यातील कामांचा आढावा घेताना नियोजन करून कामे गतीने पूर्ण कराअसे सांगतानाच काम सुरू होण्यापूर्वीकाम सुरू झाल्यानंतर व काम पूर्ण झाल्यानंतरच्या सर्व प्रक्रिया नियोजनपूर्वक  करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या.
            पीकपदधतीठिबकचा वापरयोजनाव स्थानिक पातळीवरील सहभाग वाढविण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. ग्रामसेवकतलाठीकृषीसहायकभूजल यंत्रणेसह गावचे सरपंच यांची तालुकास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात यावी, स्थानिक स्तरावर काम करण्याच्या अनुषंगाने सर्व घटकांचा व्यापक सहभाग जलशक्ती अभियानात मिळेलयासाठी विविध यंत्रणांनी स्थानिक पातळीवर नियोजन करावेअसे  जिल्हाधिकारी राम यांनी स्पष्ट केले.                              
0000 

No comments:

Post a Comment

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...