विकास
कामे वेळेत पूर्ण करण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचे निर्देश
पुणे,दि.7 :- जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विविध विकास कामांना मंजूरी देण्यात
येते. ही विकास कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश
पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज येथे अधिकाऱ्यांना दिले.
पालकमंत्री गिरीश बापट यांनी 2018-19 या वर्षात जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या
विविध विकास कामांची सद्यस्थिती आणि त्यावर झालेल्या खर्चाचा आढावा घेतला. बैठकीत 2019-20 साठी प्रशासकीय विभागांनी योजनांच्या
अंमलबजावणीबाबत केलेल्या सूचना, नवीन अंतर्भूत करण्यात आलेल्या योजना, केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांसाठी प्राप्त
झालेल्या निधीतून झालेला खर्च व अखर्चित निधी, नवीन बाबींवरील प्रस्ताव मंजूरीसाठी शासनाकडे
पाठविण्याबाबत चर्चा करण्यात आली. समिती सदस्य तसेच लोकप्रतिनिधींनी विकास कामांच्या अंमलबजावणीमध्ये
केलेल्या सूचनांची दखल घेण्याची सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी बैठकीत केली.
जिल्हा नियोजन अधिकारी यांनी प्रास्ताविकात 2019-20 साठी तयार करण्यात आलेल्या प्रारुप आराखडयाची
माहिती दिली. बैठकीला विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
००००
No comments:
Post a Comment