‘लोकसंवाद’
उपक्रमाद्वारे मुख्यमंत्र्यांनी साधला लाभार्थ्यांशी संवाद
पुणे,दि.14 :- शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून
होणारा लाभ, येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक
सुधारणा याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसंवाद’ उपक्रमाच्या
माध्यमातून कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधून घेतली.
मुख्यमंत्र्यांशी थेट
संवाद साधताना, विविध जिल्हयातील लाभार्थ्यांनी कृषि विभागामार्फत
राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा मिळालेल्या लाभाबद्दल मुख्यमंत्र्यांशी संवाद
व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. शेतकऱ्यांच्यासाठी
राबविण्यात आलेल्या योजनांमुळे शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झाल्याचे
सांगतानाच कृषि विभागाच्या योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत असल्यामुळे
त्याचा फायदा मोठया प्रमाणात शेतकऱ्यांना झाल्याची भावना यावेळी व्यक्त
लाभार्थ्यांनी केली.
महाराष्ट्र ॲग्रीटेक कार्यक्रमाची सुरुवात
शेतमालाला चांगला भाव
मिळावा आणि पेरणीपासून ते कापणीपर्यतचा डेटा तयार करण्यासाठी इस्त्रो आणि एमआरसॅट
यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र ॲग्रीटेक कार्यक्रमाची सुरुवात
मुख्यमंत्र्यांच्याहस्ते लोकसंवाद
कार्यक्रमानंतर करण्यात आली. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट
व्हावे आणि शेती सुजलाम सुफलाम होण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे,
अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
००००
No comments:
Post a Comment