कॅशलेस व्यवहाराचे शासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
पुणे, दि.20: सहसंचालक, लेखा व कोषागारे व
कोषागार कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने लेखाकोषभवन येथील प्रशिक्षण हॉलमध्ये
डिजिटल पेमेंटबाबत पुणे कोषागार कार्यालय अधिनस्त आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी व
कर्मचाऱ्यांसाठी नुकतीच एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये सहसंचालक श्रीमती शुभांगी माने व जिल्हा कोषागार
अधिकारी श्री.संजय राजमाने यांनी शासनाच्या कॅशलेस धोरणाचे महत्व विषद केले. कॅशलेस व्यवहारात लोकसहभाग अत्यंत
आवश्यक असल्याने सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना प्रशिक्षित करुन त्याचा जास्तीत
जास्त प्रचार व दैनंदिन कामकाजात वापर करण्याचे अहवाहन त्यांनी केले. कॅनरा बॅाकेचे
शाखा प्रबंधक श्री . सतीश कुमार व बँकेचे प्रतिनिधी सुमित कुडकेलवार यांनी युनिफाई
पेयमेंट विविध प्रकारची डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड व ई-वॉलेटबाबत बहुमोल मार्गदर्शन
केले.
कार्यक्रमाची
सांगता करताना वरिष्ठ कोषागार अधिकारी संजय राजमाने यांनी यापुढेही
अशा प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येतील असे सांगितले.
0000
No comments:
Post a Comment