पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुणे विमानतळावर स्वागत
पुणे, दि. २४ (वि.मा.का.): पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित
राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज सायंकाळी भारतीय हवाई दलाच्या
विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले.
यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी पंतप्रधान श्री. मोदी यांचे स्वागत केले. तसेच केंद्रीय नगरविकास व
माहिती प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन
गडकरी, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, आमदार जगदीश मुळीक, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन
क्षत्रिय, लष्कराचे ले. जनरल पी. एम. हरतीज, एअर कमांडर ए. के. भारती, पोलीस महासंचालक सतीश
माथूर, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी सौरभ राव
यांनीही यावेळी श्री. मोदी यांचे स्वागत केले.
0000000
No comments:
Post a Comment