टेमघर धरणाला जलसंपदा
मंत्री गिरीश महाजन यांची भेट
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन
गळतीच्या दुरुस्तीचे काम करणार
... जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
पुणे, दि. 06 – मुळशी तालुक्यातील
टेमघर धरणाच्या बाहय भागातील भिंतीतून पाणी गळतीच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री
गिरीश महाजन यांनी आज धरणाला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. जलसंपदा राज्यमंत्री
विजय शिवतारे यावेळी त्यांच्यासोबत होते.
धरणाच्या भिंतीतून होणाऱ्या पाणी गळतीमुळे धरणाच्या सुरक्षिततेला
कोणताही धोका नसल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले. जलसंपदा
विभागाने धरणाच्या भिंतीतून पाणी गळती होत असल्याची घटना गंभिरपणे घेतली आहे. ती बंद
करण्यासाठी सुमारे 95 कोटी रुपयांचा खर्च येणार असून त्यासंबधीची निविदा प्रक्रिया
अंतीम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी जलसंपदा मंत्र्यांनी दिली. आधुनिक तंत्रज्ञानाचा
वापर करुन गळती दुरुस्तीची कार्यवाही कालबध्द योजनेनुसार तातडीने हाती घेण्याचे निर्देश
त्यांनी यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. धरणक्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे
पाण्याची पातळी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे
अशी सूचना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली. भविष्यात अशाप्रकारे धरणाच्या भिंतीतून
पाण्याची गळती होणार नाही याबद्दल दक्षता घेण्याचेही त्यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी सौरभ राव, जलसंपदा सचिव शिवाजीराव उपासे,
महाराष्ट्र कृष्णा खेारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक रा.भ.धोटे, मुख्य अभियंता
व्ही.एम.कुलकर्णी, मुख्य अभियंता ईश्वर चौधरी, मुख्य अभियंता र.वा.पानसे आदि अधिकारी
उपस्थित होते.
000
कौशल्य विकास कार्यक्रमास व्यापक स्वीकृती
देण्यासाठी अभियान सुरु करावे
--- जिल्हाधिकारी सौरभ राव
पुणे दि. 6 : कौशल्य विकास कार्यक्रमास व्यापक स्वीकृती देण्यासाठी अभियान सुरु करावे. सामाजिक परिवर्तन आणण्यासाठी अभियानाशिवाय दुसरा उपाय नाही. स्कील गॅप भरुन काढण्यासाठी नियोजन करावे. कौशल्या व उद्योजकता विकास विभागाच्या योजनांचा
प्रचार मोठया प्रमाणात होणे
आवश्यक आहे. त्याकरिता आवश्यक
तो प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला
सादर करावा. त्यासाठी निधी
उपलब्ध करुन देण्यात येईल. पंचायत
समिती, जिल्हा परिषद, आयटीआय येथे
फलेक्सबोर्ड स्वरुपात प्रसिध्दी द्यावी
अशा सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीच्या बैठकीत केले.
पुढे ते म्हणाले, स्कील गॅप
स्टडीबाबत एन.एस.डी.सी.ने केलेल्या
सर्व्हेनुसार 28 लाख उमेदवारांसाठी जॉब
आहेत. याबाबत स्कील गॅप नुसार
विविध शासकीय खात्यांच्या बरोबर
बैठका घेऊन नियोजन करणे
आवश्यक आहे. विविध सेक्टरकरिता
स्वतंत्र बैठक घेणे आवश्यक आहे. रोजगार स्वयंरोजगार निर्मितीसाठी
स्वयंसेवी संस्थांची स्वतंत्र कार्यशाळा
आयोजित करावी. उद्योगांसाठी आवश्यक
कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी उद्योग समूहांना प्रशिक्षण संस्था म्हणून सूचीबध्द
करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
प्रमोद महाजन
कौशल्य व उद्योजकता विकास
अभियान या योजनेची माहिती सदस्य
सचिवांनी यावेळी बैठकीमध्ये दिली.
यावेळी
प्रकल्प संचालक दिनेश डोके, समितीतील शासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी आदी उपस्थित
होते.
*****
No comments:
Post a Comment