Sunday, August 21, 2016

ई कचरा आणि प्लास्टिक मुक्त परिसर अभियानाला पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते सुरुवात



 ई कचरा आणि प्लास्टिक मुक्त परिसर अभियानाला
पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते सुरुवात

पुणे : 21 - पुणे शहराला स्वच्छ बनविण्यासाठी ई कचरा आणि प्लास्टिक मुक्त परिसर अभियानाची सुरुवात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते आज येथील अलका टॉकीज चौकातून करण्यात आली.
पुणे महानगर पालिकेच्या सहकार्याने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळांतील ४० हजार विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा उपक्रम पुणे शहरात राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, महाराष्ट्र एज्युकेशन सोसाटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले, अभियानाचे प्रमुख कर्वे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रमोद गोरे, रविंद्र वंजारवाडकर उपस्थित होते.
यावेळी गिरीश बापट म्हणाले, पुणे शहर स्वच्छ ठेवण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. म.ए.सोसायटीच्या शाळांचा हा उपक्रम स्तुत्य असून इतर शाळांनी याचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. समाजावर स्वच्छतेचा संस्कार करण्याचे काम विद्यार्थ्यांनी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी कुणाल कुमार, रविंद्र वंजारवाडकर यांची भाषणे झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातील सर्वाना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजीव सहस्त्रबुध्दे यांनी केले. तर आभार के. एन. अर्नाळे यांनी मानले. कार्यक्रमाला शाळेचे विद्यार्थ्यांसह, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*******




No comments:

Post a Comment

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...