पानशेत
वरसगाव धरणाच्या परिसरात
पालकमंत्री
गिरीश बापट यांच्या हस्ते वृक्षारोपण
झाडे लावा-झाडे जगवा घोषणांच्या निनादात वृक्षसंगोपनाचा निर्धार
पुणे
दि. 01: संपूर्ण राज्यात आज दोन कोटी वृक्ष
लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. या उपक्रताचे औचित्य साधून पानशेत वरसगांव
धरणाच्या परिसरात पायथ्याशी पालकमंत्री गिरीश बापट यांनी भर पावसात सपत्निक वृक्षारोपण
केले. यावेळी राज्य राखीव पोलीस दलाच्या सुमारे शंभर जवानांनी धरणक्षेत्र परिसरात जवळपास
एक हजार झाडे लावली.
यावेळी
जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले, वेल्हयाच्या तहसीलदार श्रीमती वनश्री
लाभशेटवार, खडकवासला सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता पुंडलीक शेलार, यांत्रिकी विभागाचे
कार्यकारी अभियंता काझी, राज्य राखील बलगटाचे समादेशक सय्यद यांनीही वृक्षारोपण केले.
पर्यावरणाचा
होणारा ऱ्हास थांबविण्यासाठी आणि मानवी जीवन सुसहय होण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण
करणे आवश्यक आहे. वृक्षारोपण केल्यानंतर त्याचे संगोपन करणे व झाड वाढविणे महत्वाचे
असल्यामुळे वृक्षरोपणानंतर पाणी देण्याबरोबरच त्याचे संगोपन जाणीवपूर्वक करावे असे
आवाहन पालकमंत्री बापट यांनी उपस्थितांना केले. झाडे लावा झाडे जगवा, झाडे जगवा झाडे
लावा या घोषणांच्या निनादात उपस्थितांनी वृक्षसंगोपनाचा निर्धार व्यक्त केला.
पानशेत
वरसगांव धरणाला पालकमंत्र्यांची भेट
पानशेत
वरसगांव धरण पायथ्याशी वृक्षारोपण केल्यानंतर पालकमंत्री बापट यांनी जलसंपदा व सिंचन
विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत दोन्ही धरणाला भेट देऊन तेथील परिस्थतीची पाहणी केली. पावसाळा
सुरु झाला असल्याने सुरक्षिततेच्यादृष्टीने आवश्यक कार्यवाही प्राधान्याने पूर्ण करण्याच्या
सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या.
000


No comments:
Post a Comment