प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी
सहभागी व्हावे
योजनेत सहभागी होण्याची 31 जुलै
2016 अंतीम तारीख
पुणे दि. 8 : शासनाने खरीप हंगाम
2016 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्याजील सर्व जिल्हात राबविण्याचा निणर्य
घेतला असुन या योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची
अंतीम मुदत दि. 31 जुलै 2016 अशी आहे.
पीक पेरणी
पासून काढणी पर्यतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट, पीक पेरणीपुर्व / लावणीपुर्व
नुकसान भरपाई निश्चित करणे, हंगामातील प्रतीकुल परीस्थीतीत नुकसान भरपाई निश्चित करणे,
काढणी पश्चात नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती इ.विमा संरक्षणाच्या बाबी आहेत.
अधिसुचित
क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे कूळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह)
सर्व शेतकरी या योजनेत भाग घेणास पात्र आहेत. या योजनेअंतर्गत 70 टक्के जोखिमस्तर देय
आहे.
राज्यात
योजनेचे सनियंत्रण करण्यासाठी राज्यस्तरावर मुख्यसचिव याचे अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय
पिका विमा समन्व्य समितीची (SLCCI) स्थापना करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक
जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखली योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय
समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी
पीक विमा संरक्षण मिळणेस्तव् प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 31 जुलै, 2016 या अंतिम
दिनांकापुर्व जास्तीतजास्त संख्येने सहभागी व्हावे. अधिकमाहितीसाठी तात्काळ नजिकच्या
विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी तसेच नजिकच्या
बँकेशी संपर्क साधावा. असे आवाहन कृषी विभागामार्फत
करण्यात आले आहे. योजनेअंतर्गत समाविष्ट पिके विमा संरक्षीत रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा
पिक विमा हप्ता तपशील पुढीलप्रमाणे आहे.
|
अ.क्र
|
पिकाचे नाव
|
विमा संरक्षित रक्कम
(रु. प्रति हेक्टर)
|
शेतकऱ्यांनी भरावयाचा
पिक विमा हप्ता (रु.)
|
|
1
|
भात
|
39000/-
|
780/-
|
|
2
|
खरीब ज्वारी
|
24000/-
|
480/-
|
|
3
|
बाजरी
|
20000/-
|
400/-
|
|
4
|
नाचणी
|
20000/-
|
400/-
|
|
5
|
मका
|
25000/-
|
500/-
|
|
6
|
तुर
|
28000/-
|
560/-
|
|
7
|
मुग
|
18000/-
|
360/-
|
|
8
|
उडीद
|
18000/-
|
360/-
|
|
9
|
भुईमुग
|
30000/-
|
600/-
|
|
10
|
सोयाबीन
|
36000/-
|
720/-
|
|
11
|
सुर्यफुल
|
22000/-
|
440/-
|
|
12
|
तीळ
|
22000/-
|
440/-
|
|
13
|
कारळे
|
20000/-
|
400/-
|
|
14
|
कापुस
|
36000/-
|
1800/-
|
|
15
|
कांदा
|
50000/-
|
2500/-
|
No comments:
Post a Comment