Thursday, October 10, 2019

सहभागपूर्ण लोकशाहीसाठी 'कम्युनिटी रेडिओंनी मतदार जागृतीच्या माध्यमातून योगदान द्यावे - वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा







राज्यातील कम्युनिटी रेडिओसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्धाटन संपन्न

पुणे, दि. 10: निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा पाया असून लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत लोकांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. सहभागपूर्ण लोकशाहीसाठी मतदार जागृतीच्या माध्यमातून समूह रेडिओंनी (कम्युनिटी रेडिओ) आपले योगदान द्यावे, असे आवाहन भारत निवडणूक आयोगाचे वरीष्ठ  निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांनी आज येथे केले.
पुणे जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने राज्यभरातील कम्युनिटी रेडिओ वाहिन्यांसाठी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा)येथे आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी श्री. सिन्हा बोलत होते. याप्रसंगी  निवडणूक उपायुक्त चंद्र भूषण कुमार, राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, पुणे विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, भारत निवडणूक आयोगाचे सचिव एस. के. मिश्रा, 'स्मार्ट व्होट'च्या अर्चना कपूर आदी उपस्थित होते.
कम्युनिटी वाहिन्यांच्या स्वरूपात नव्याने रेडिओ हे माध्यम पुन्हा प्रभावीपणे उदयास आले आहे, असे सांगून श्री. सिन्हा म्हणाले की, लोकांशी जोडण्याचे हे सशक्त माध्यम ठरले आहे. लोकांना कोणताही दबाव, प्रभाव, प्रलोभनाला बळी न पडता नैतिक मूल्यांच्या आधारे मतदान करण्यासाठी जागृत करण्याचे काम कम्युनिटी रेडिओंनी करावे. त्यासाठी रेडिओंनी स्थानिक भाषा, संस्कृती लक्षात घेऊन वैविध्यपूर्ण कार्यक्रम निर्माण करावेत. मतदार जागृतीचा कार्यक्रम निरंतर चालू ठेवायचा आहे.

रेडिओ माध्यमाचे महत्त्व लक्षात घेता भारत निवडणूक आयोगाकडून स्वतःची वेब रेडिओ वाहिनी सुरू करण्यात येणार आहे. ही वाहिनी इंटरनेटच्या माध्यमातून जगातून कोठूनही लाभ घेता येईल. सर्व कम्युनिटी वाहिन्या या वेब रेडिओशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. आयोगाच्यावतीने देशात 15 लाख साक्षरता क्लब स्थापन करण्यात येणार असून 6 लाख स्थापन झाले आहेत. राज्यातील सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वतःची कम्युनिटी रेडिओ वहिनी सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.
निवडणूक उपायुक्त चंद्र भूषण कुमार म्हणाले की, निवडणुकांचे वैशिष्ट्य म्हणजे कोणता उमेदवार निवडायचा याचा निर्णय घेण्याची भूमिका म्हणजेच एक प्रकारे न्यायाधीशाची भूमिका यामुळे सामान्य मतदाराला मिळते. सर्वसामान्य नागरिकांशी जोडण्याचे  कम्युनिटी रेडिओ हे सशक्त माध्यम आहे. त्यामुळे कम्युनिटी रेडिओंनी लोकांना या न्यायाधीशांच्या भूमिकेचे महत्त्व आणि निवडणुक प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण  बाबी लोकांपर्यंत योग्यरित्या पोहोचविण्यासाठी कल्पकतेने कार्यक्रम निर्माण करावेत.
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले की, मतदानाचा हक्क, आदर्श आचारसंहिता तसेच निवडणूक प्रक्रियेविषयी सर्वसामान्य नागरिकांना समजेल अशा पद्धतीने पोहचविण्यासाठी कार्यक्रमांची निर्मिती करावी. तसेच युवक, महिला, वृद्ध आदी लक्ष्य गट ठरवून त्याप्रमाणे कार्यक्रम प्रसारणाची वेळ ठरवावी.
यावेळी श्री. सिन्हा यांच्या हस्ते मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने निर्मिती करण्यात आलेल्या निवडणूक विषयक जनजागृती ध्वनिचित्रफितींचे उद्घाटन करण्यात आले.
आभार अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी मानले. यावेळी कम्युनिटी रेडिओ वाहिन्यांचे प्रतिनिधी तसेच जिल्हा स्वीप अधिकारी यांनीही प्रातिनिधिक स्वरूपात आपले अनुभव मांडले.
भारत निवडणूक आयोगाने 'स्मार्ट' फौंडेशनच्या माध्यमातून या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यावेळी मीडिया कम्युनिटी कन्सल्टंट रुक्मिणी वेमराजू उपस्थित होत्या. कार्यशाळेसाठी राज्यातील सुमारे 22 कम्युनिटी रेडिओ वाहिन्यांचे 40 प्रतिनिधी उपस्थित आहेत.
*****

Thursday, September 19, 2019

जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडून अप्परजिल्हाधिकारी रमेश काळे यांना निरोप

       पुणे दि. 19 - जिल्‍हाधिकारी कार्यालयाती


ल अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे यांची ‍ नाशिक येथे बदली झाल्याने जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्या वतीने  जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी त्यांना पुष्प गुच्छ देवून निरोप दिला. त्यांच्या जागी सातारा जिल्‍हाधिकारी कार्यालयातील अप्पर जिल्हाधिकारी म्हणून साहेबराव गायकवाड यांनी पदभार स्वीकारला आहे.
            यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा जुन्नरआंबेगावचे उपविभागीय अधिकारी जितेंद्र डुडी,  निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉजयश्री कटारेउपजिल्‍हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांच्‍यासह उपविभागीय अधिकारीतहसीलदार व सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

                                                                           0000




निवडणूक यंत्रणेतील अधिका-यांनी समन्‍वयाने काम करावे
                       जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

       पुणे दि. 19 -आगामी विधानसभा निवडणुका मुक्‍त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्‍यासाठी निवडणूक यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस अधिकारी यांनी निवडणूक आयोगाच्‍या निर्देशाप्रमाणे  काम करावे व निवडणूक प्रक्रिया यशस्‍वी करावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
            विधानसभा निवडणूक पूर्वतयारीबाबत जिल्‍हाधिकारी नवलकिशोर राम यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्‍यात आली,  त्‍यावेळी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा जुन्नर- आंबेगावचे उपविभागीय अधिकारी जितेंद्र डुडी, अपर जिल्‍हाधिकारी साहेबराव गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त मितेश घटटे, निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांच्‍यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
            जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम म्‍हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीच्‍या अनुषंगाने कायदा व सुव्‍यवस्‍था, आदर्श आचार‍संहिता आणि निवडणूक आयोगाच्‍या निर्देशाप्रमाणे निवडणूक प्रक्रियेबाबत  काटेकोर नियोजन करणे आवश्‍यक आहे.  विधानसभा निवडणुकीसाठी निश्चित केलेल्‍या मतदान केंद्रावर आवश्‍यक त्‍या उपाययोजना करण्‍याची दक्षता घ्‍यावी, अशी सूचना करुन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदान केंद्राची पाहणी करावी व सोईसुविधांचा आढावा घ्यावा, तसेच दिव्यांग मतदारांच्या सोयीसाठी तळमजल्यावर मतदान केंद्र ठेवावीत, तसेच आवश्यकतेप्रमाणे तात्पुरते मतदान केंद्र स्थापन करावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या.        कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधित रहावी  यासाठी कराव्‍या लागणा-या सर्व प्रतिबंधात्‍मक उपाययोजना, निवडणूक आयोगाच्‍या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणूक यंत्रणेतील अधिका-यांनी कार्यवाही करावी  असे सांगून मतदारांच्या तक्रार निवारणासाठी विधानसभा मतदारसंघ निहाय एका नोडल अधिका-याची नियुक्ती करावी, असेही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.
            यावेळी पॉवरपाईंट प्रेझेंटेशनद्वारे पुणे जिल्‍हयाच्‍या अनुषंगाने निवडणूक विभागाची  पूर्वतयारी, कायदा व सुव्‍यवस्‍था आणि आगामी विधानसभा निवडणूकीच्‍या अनुषंगाने उपाययोजनाबाबत उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी सविस्‍तर माहिती दिली.
            जिल्‍हयातील एकूण मतदार, मतदान केंद्रे, एक खिडकी योजना, समाधान ॲप, दिव्यांग मतदारांची संख्या व त्यानुसार करावयाचे नियोजन, मतदान केंद्राच्‍या व्यवस्थेबाबत सविस्‍तर  चर्चा करण्‍यात आली.  यासोबतच निवडणुकीच्‍या अनुषंगाने आवश्‍यक मनुष्‍यबळ, मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण, आदर्श आचारसंहितेचे पालन या सर्व बाबीवर सविस्‍तर चर्चा करण्‍यात आली.
                                                                           0000

Saturday, September 7, 2019




राजे उमाजी नाईक यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

            पुणे, दि. 7 : जिल्हा प्रशासनातर्फे राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात, अपर जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनीही अभिवादन केले.
यावेळी, नायब तहसीलदार श्रावण ताते यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000

Tuesday, August 20, 2019





द्भावना दिनानिमित्त घेतली प्रतिज्ञा

            पुणे, दि. 20 : जिल्हा प्रशासनातर्फे द्भावना  दिनानिमित्त प्रतिज्ञा घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, खनि कर्म अधिकारी श्री.बामणे, तहसिलदार श्रावण ताते, नायब तहसिलदार पी.डी.काशिकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी प्रतिज्ञा घेतली.
0000

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...