Thursday, September 19, 2019

जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडून अप्परजिल्हाधिकारी रमेश काळे यांना निरोप

       पुणे दि. 19 - जिल्‍हाधिकारी कार्यालयाती


ल अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे यांची ‍ नाशिक येथे बदली झाल्याने जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्या वतीने  जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी त्यांना पुष्प गुच्छ देवून निरोप दिला. त्यांच्या जागी सातारा जिल्‍हाधिकारी कार्यालयातील अप्पर जिल्हाधिकारी म्हणून साहेबराव गायकवाड यांनी पदभार स्वीकारला आहे.
            यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा जुन्नरआंबेगावचे उपविभागीय अधिकारी जितेंद्र डुडी,  निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉजयश्री कटारेउपजिल्‍हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांच्‍यासह उपविभागीय अधिकारीतहसीलदार व सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

                                                                           0000




निवडणूक यंत्रणेतील अधिका-यांनी समन्‍वयाने काम करावे
                       जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

       पुणे दि. 19 -आगामी विधानसभा निवडणुका मुक्‍त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्‍यासाठी निवडणूक यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस अधिकारी यांनी निवडणूक आयोगाच्‍या निर्देशाप्रमाणे  काम करावे व निवडणूक प्रक्रिया यशस्‍वी करावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
            विधानसभा निवडणूक पूर्वतयारीबाबत जिल्‍हाधिकारी नवलकिशोर राम यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्‍यात आली,  त्‍यावेळी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा जुन्नर- आंबेगावचे उपविभागीय अधिकारी जितेंद्र डुडी, अपर जिल्‍हाधिकारी साहेबराव गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त मितेश घटटे, निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांच्‍यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
            जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम म्‍हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीच्‍या अनुषंगाने कायदा व सुव्‍यवस्‍था, आदर्श आचार‍संहिता आणि निवडणूक आयोगाच्‍या निर्देशाप्रमाणे निवडणूक प्रक्रियेबाबत  काटेकोर नियोजन करणे आवश्‍यक आहे.  विधानसभा निवडणुकीसाठी निश्चित केलेल्‍या मतदान केंद्रावर आवश्‍यक त्‍या उपाययोजना करण्‍याची दक्षता घ्‍यावी, अशी सूचना करुन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदान केंद्राची पाहणी करावी व सोईसुविधांचा आढावा घ्यावा, तसेच दिव्यांग मतदारांच्या सोयीसाठी तळमजल्यावर मतदान केंद्र ठेवावीत, तसेच आवश्यकतेप्रमाणे तात्पुरते मतदान केंद्र स्थापन करावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या.        कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधित रहावी  यासाठी कराव्‍या लागणा-या सर्व प्रतिबंधात्‍मक उपाययोजना, निवडणूक आयोगाच्‍या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणूक यंत्रणेतील अधिका-यांनी कार्यवाही करावी  असे सांगून मतदारांच्या तक्रार निवारणासाठी विधानसभा मतदारसंघ निहाय एका नोडल अधिका-याची नियुक्ती करावी, असेही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.
            यावेळी पॉवरपाईंट प्रेझेंटेशनद्वारे पुणे जिल्‍हयाच्‍या अनुषंगाने निवडणूक विभागाची  पूर्वतयारी, कायदा व सुव्‍यवस्‍था आणि आगामी विधानसभा निवडणूकीच्‍या अनुषंगाने उपाययोजनाबाबत उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी सविस्‍तर माहिती दिली.
            जिल्‍हयातील एकूण मतदार, मतदान केंद्रे, एक खिडकी योजना, समाधान ॲप, दिव्यांग मतदारांची संख्या व त्यानुसार करावयाचे नियोजन, मतदान केंद्राच्‍या व्यवस्थेबाबत सविस्‍तर  चर्चा करण्‍यात आली.  यासोबतच निवडणुकीच्‍या अनुषंगाने आवश्‍यक मनुष्‍यबळ, मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण, आदर्श आचारसंहितेचे पालन या सर्व बाबीवर सविस्‍तर चर्चा करण्‍यात आली.
                                                                           0000

Saturday, September 7, 2019




राजे उमाजी नाईक यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

            पुणे, दि. 7 : जिल्हा प्रशासनातर्फे राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात, अपर जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनीही अभिवादन केले.
यावेळी, नायब तहसीलदार श्रावण ताते यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000

Tuesday, August 20, 2019





द्भावना दिनानिमित्त घेतली प्रतिज्ञा

            पुणे, दि. 20 : जिल्हा प्रशासनातर्फे द्भावना  दिनानिमित्त प्रतिज्ञा घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, खनि कर्म अधिकारी श्री.बामणे, तहसिलदार श्रावण ताते, नायब तहसिलदार पी.डी.काशिकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी प्रतिज्ञा घेतली.
0000

Wednesday, August 14, 2019

21 व्या शतकातील पोलीस स्‍मार्ट आणि तंत्रज्ञानस्‍नेही  असणे आवश्‍यक- राज्‍यपाल
            पुणे, दिनांक 14- एकविसाव्‍या शतकातील महाराष्ट्राला 21 व्या शतकाच्या पोलिस दलाची आवश्यकता आहे,  यासाठी आपल्या पोलिस दलाचे स्मार्ट व तंत्रज्ञानस्‍नेही पोलिस दलात रूपांतर करावे लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले.
           येथील सिम्बायोसिस कॉलेजच्या सभागृहात पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध लोकाभिमुख उपक्रमांचे लोकार्पण राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले. त्‍यावेळी ते बोलत होते. महाराष्‍ट्रातील प्रभावी पोलीस प्रशासनाच्‍या आकलन आणि अपेक्षांबद्दलचे सर्व्‍हेक्षण आणि सेवा व सुरक्षा बोध मानके यांचे राज्‍यपाल चे. विद्यासागर राव यांच्‍या हस्‍ते स्‍वतंत्रपणे लोकार्पण करण्‍यात आले.  यावेळी पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कामगार व पुनर्वसन राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, खासदार अमर साबळे, खासदार गिरीश बापट, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सिम्बायोसिसचे संस्थापक शां. ब. मुजुमदार, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम आदी उपस्थित होते.
            राज्‍यपाल म्‍हणाले, महाराष्ट्रात वृद्ध लोकांची संख्या सर्वाधिक आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या वैयक्तिक, आर्थिक, भावनिक सुरक्षा आणि सुरक्षिततेचा विश्‍वास निर्माण करणे हे एक मोठे आव्हान असेल. विविध आस्‍थापनांमध्‍ये महिलांच्या वाढत्या सहभागामुळे देशातील कार्यक्षेत्रांमध्ये वेगाने बदल होत आहेत. महिला वेगवेगळ्या रोजगारांच्‍या क्षेत्रात पुरुषांपेक्षा अधिक संख्‍येने आहेत, ही आनंदाची बाब आहे  नजीकच्या काळात निमलष्‍करी दलात आणि सैन्य दलातही अधिक महिला असतील.
            पोलिस आणि सर्व सार्वजनिक संघटनांनी महिला आणि वृद्ध लोकांसाठी संवेदनशील बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते सामाजिक-आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, व्यक्तींसाठी अधिक दयाळू असले पाहिजेत. पुण्यासारख्या आंतरराष्ट्रीय शहरातील परदेशी नागरिक आणि विद्यार्थ्यांकरिता पोलिस दल अत्यंत सभ्य आणि सहकारी वृत्‍तीचे असणे देखील आवश्यक आहे, असे राज्‍यपाल म्‍हणाले.
            यापूर्वी महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबई आणि पुणे या शहरांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. असे हल्ले रोखण्यासाठी आपल्याकडे यंत्रणा असणे आवश्यक असल्याचे सांगून सोशल मिडीयाद्वारे होणा-या वाढत्‍या गुन्‍ह्यांबाबतही त्‍यांनी चिंता व्‍यक्‍त केली.
            पालकमंत्री तथा महसूल मंत्री पाटील म्‍हणाले, पोलीस विभागाने सुरु केलेल्‍या या नवीन अभिनव उपक्रमांमुळे सर्वसामान्‍यांच्‍या मनात पोलिसांविषयी चांगली प्रतिमा निर्माण होण्‍यास मदत होणार आहे. सीमेवरील सैनिकांविषयी जनतेच्‍या मनात जशी आदरयुक्‍त प्रतिमा आहे, तशीच पोलिसांविषयी निर्माण होण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍याची अपेक्षाही त्‍यांनी व्‍यक्‍त केली. शासन पोलिसांना मदत करण्‍यास बांधिल असून पोलिसांच्‍या गृहप्रकल्‍पासाठी 25 कोटी रुपयांची मान्‍यता देण्‍यात आली आहे. तसेच जिल्‍ह्यातील नियोजन समितीच्‍यावतीने  5 कोटी रुपयांची तरतूद वाहतूक विषयकबाबीसाठी करण्‍यात आल्याचे त्‍यांनी सांगितले.
            सिम्बायोसिसचे संस्थापक शां. ब. मुजुमदार यांनी पोलिस विभागाचे कौतुक करुन पोलीस आणि समाज यांच्‍यामधील दरी दूर होण्‍याची गरज प्रतिपादन केली.
            कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक पोलीस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम यांनी केले. पोलीस म्‍हणजे नम्र आणि कर्तव्यात कठोर अशी प्रतिमा कायम ठेवण्‍याची गरज प्रतिपादन करुन त्‍यांनी शहरी नक्षलवादाविरुध्‍द कठोरपणे कारवाई केल्‍याचे सांगितले. पोलिस विभागामार्फत नागरिकांना सुरक्षिततेची हमी देण्‍यासाठी सुरु केलेल्‍या विविध उपक्रमांचीही त्‍यांनी माहिती दिली. शहरात गेल्‍या 4 महिन्‍यापूर्वी 1300 सीसीटीव्‍ही कॅमेरे होते. नागरिक आणि विविध कंपन्‍या, संस्‍था यांच्‍या मदतीने आज शहरात 30 हजार कॅमेरे लावण्‍यात आल्‍याचे त्‍यांनी लक्षात आणून दिले. महाराष्‍ट्रातील प्रभावी पोलीस प्रशासनाच्‍या आकलन आणि अपेक्षांबद्दलचे सर्व्‍हेक्षण हे सिम्‍बॉयसिसच्‍या विद्यार्थ्‍यांनी केले आहे. पोलिसांनी नागरिकांना दिलेल्‍या सेवेनंतर नागरिकांचे समाधान झाले की नाही, त्‍यांच्‍या अपेक्षा काय होत्‍या, याबाबत सर्वेक्षण करण्‍यात आले,असेही त्‍यांनी सांगितले.
            कार्यक्रमात पोलिस दलाच्‍या विविध विभागांचा गौरव राज्‍यपाल चे. विद्यासागर राव यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. कार्यक्रमास जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह पोलिस व सनदी अधिकारी उपस्थित होते.आभार प्रदर्शन सह पोलीस आयुक्‍त रवींद्र शिसवे यांनी केले. 
0000




मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू
            पुणेदि. 14 : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुणे जिल्हयातून विविध सामाजिक संस्थाउद्योजकसामान्य नागरिकांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदतीचा ओघ सुरू आहे. महसूलसार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्याकडे आज अनेकांनी मदतीचे धनादेश सुपूर्द केले.
                 पूरग्रस्त भागात गतीने पुनर्बांधणी व्हावी, पूरग्रस्त भागातील प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबाचा संसार नव्याने उभा करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातून दिलेल्या माहितीनुसार दिनांक 13 ऑगस्ट रोजी विठठल्‍ परशुराम महाजन यांच्याकडून 50 हजारइंदापूर नगरपरिषदइंदापूर अधिकारीकर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतन एक लाख 16 हजार 882, श्री राजेंद्र सोपान भोसले यांच्याकडून हजार 555, कै.सौशशिकला कोठारी ट्रस्ट यांच्याकडून 10 हजारश्रीरंग प्रकाश दर्प, पेट कम्फर्ट संस्था यांच्याकडून हजार तर बुधवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी दिवसभरात विश्वस्त मंडळ श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट यांच्याकडून दोन लाख 51 हजार रुपये,  श्रीसुभाष पीशेलार यांच्याकडून 11 हजार रूपयेश्रीगौरीशंकर निलकंठ कल्याणी व  श्रीमती रोहीणी गौरीशंकर कल्याणी यांच्याकडून एक लाख रूपयेकल्याणी फोर्ज लीयांच्याकडून एक लाख रूपयेमुळशी तालुका पोलीस पाटील सेवकाची सहकारी पतसंस्था मर्यायांच्याकडून 25 हजार रूपये यांच्यासह विविध संस्थासंघटना मान्यवरांकडून मदतीचे हात पूरग्रस्तांसाठी पुढे येत आहेत.
                                                           ००००



  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...