Wednesday, August 14, 2019

मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू
            पुणेदि. 14 : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुणे जिल्हयातून विविध सामाजिक संस्थाउद्योजकसामान्य नागरिकांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदतीचा ओघ सुरू आहे. महसूलसार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्याकडे आज अनेकांनी मदतीचे धनादेश सुपूर्द केले.
                 पूरग्रस्त भागात गतीने पुनर्बांधणी व्हावी, पूरग्रस्त भागातील प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबाचा संसार नव्याने उभा करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातून दिलेल्या माहितीनुसार दिनांक 13 ऑगस्ट रोजी विठठल्‍ परशुराम महाजन यांच्याकडून 50 हजारइंदापूर नगरपरिषदइंदापूर अधिकारीकर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतन एक लाख 16 हजार 882, श्री राजेंद्र सोपान भोसले यांच्याकडून हजार 555, कै.सौशशिकला कोठारी ट्रस्ट यांच्याकडून 10 हजारश्रीरंग प्रकाश दर्प, पेट कम्फर्ट संस्था यांच्याकडून हजार तर बुधवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी दिवसभरात विश्वस्त मंडळ श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट यांच्याकडून दोन लाख 51 हजार रुपये,  श्रीसुभाष पीशेलार यांच्याकडून 11 हजार रूपयेश्रीगौरीशंकर निलकंठ कल्याणी व  श्रीमती रोहीणी गौरीशंकर कल्याणी यांच्याकडून एक लाख रूपयेकल्याणी फोर्ज लीयांच्याकडून एक लाख रूपयेमुळशी तालुका पोलीस पाटील सेवकाची सहकारी पतसंस्था मर्यायांच्याकडून 25 हजार रूपये यांच्यासह विविध संस्थासंघटना मान्यवरांकडून मदतीचे हात पूरग्रस्तांसाठी पुढे येत आहेत.
                                                           ००००



2022 पर्यंत सर्वसामान्य नागरिकाला किमान मुलभूत सुविधा
देण्यासाठी मिशन मोडवर काम करा-
-         पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
पुणे दि. 14-  सन 2022 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत, 2022 पर्यंत सर्वसामान्य नागरिकाला किमान मुलभूत सुविधा मिळाव्यातयासाठी मिशन मोडवर काम करावेअसे आवाहन महसूल,सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे केले. जिल्हा वार्षिक योजनेचा उपलब्ध निधी वेळेत खर्च करण्याचे निर्देशही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी दिले.
 
जिल्हा वार्षिक योजना 2019-20 बाबत महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री  तथा पालकमंत्री चंद्रकांत(दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. आर्थिक वर्षातील मंजूर कामांचा आढावा घेतांना पालकमंत्री पाटील बोलत होते. यावेळी खा. गिरीश बापट, जिल्हाधिकारी नवल किशोर राममनपाचे अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयलजिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्‍हा नियोजन अधिकारी प्रमोद केंभावी, सामाजिक न्‍याय विभागाचे सहायक आयुक्‍त विजयकुमार गायकवाड, यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील यांनी 2019-20 या वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या विविध विकास कामांची सद्यस्थितीकामावर झालेला खर्च आदी बाबींचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी राम यांनी 2019-20 साठी तयार करण्यात आलेल्या आराखडयाबाबत सविस्तर माहिती दिली.
पालकमंत्री पाटील म्हणाले पुणे जिल्हयात पर्यटन वाढीला मोठा वाव आहेत्यादृष्टिने पर्यटन स्थळांच्या विकासासोबतच पर्यटकांना सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात यावेमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून गत तीन वर्षात जिल्हयात झालेल्या कामांचा आढावा घेताना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमुळे ग्रामीण भागात रस्त्यांची चांगली सुविधा उभी राहिल्याचे त्यांनी सांगितले.
महावितरणबाबत आढावा घेताना शेतीपंपाबाबत ग्राहकांना मार्चअखेर वीजजोडणी देण्याचे उद्दिष्‍ट पूर्ण कराअशा सूचना  पालकमंत्री पाटील यांनी दिल्‍या. वन विभागच्या विविध योजनाआरोग्य विभागक्रीडा विभागसार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत जिल्ह्यातील रस्त्यांची स्थिती व त्यासाठी आवश्यक निधीसामाजिक न्याय विभागांततर्गत अनुसूचित जाती उपयोजनादलित वस्ती सुधार योजनानागरी दलित वस्तीमध्ये सुधारणा कार्यक्रम आदी योजनांचाही त्‍यांनी आढावा घेवून योजनांची  स्थितीझालेला खर्चआवश्यक निधी आदींची माहिती घेतली.  जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत देण्यात आलेला निधी विहित मुदतीत खर्च कराअशा सूचना दिल्या. शासनाच्या विकास योजनासंदर्भात लोकप्रतिनिधींशी चर्चा करून लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांची  दखल घ्यावी व विकासकामांना गती देण्याची सूचना पालकमंत्री पाटील यांनी केली. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.




Tuesday, August 13, 2019

डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाच्यावतीने कोल्हापूर  सांगलीतील पूरग्रस्त भागात वैद्यकीयआरोग्य पथक रवाना
            पुणे दि. 13 - पिंपरी येथी डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय हाविद्यालय, रुग्णालयाच्यावतीने कोल्हापूर  सांगलीतील पूरग्रस्त भागात वैद्यकीय आरोग्य पथक रवाना करण्यात आले आहे. कोल्हापूर वसांगली या दोन भागासाठी दो वै

द्यकीय पथक तयार करण्यात आले  आहे.  यामध्ये सर्व सेवासुविधांनी युक्त रुग्णवाहिका,डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, दहा लाखांहून अधिक किमतीची
आवश्यक औषधे तसेच पाणी शुद्ध करण्यासाठी लागणारी औषधे आणि वैद्यकीय साहित्य,   उपकरणांचा यात समावेश आहे.
यावेळी डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाच्या उपाध्यक्षा मा. भाग्यश्रीताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमरजित सिंग, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जे. एस भवाळकर, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच चव्हाण उपस्थित होते.  
विद्यापीठाचे  कुलगुरु डॉ. पी. डी. पाटील, ट्रस्टी डॉ स्मिता जाधव, कोशाध्यक्ष डॉ. यशराज पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली ही  दोन्ही वैद्यकीय आरोग्य पथके कोल्हापूर  सांगलीतील पूरग्रस्त भागात पाठविण्यात अली आहे.  
भीमाशंकरला एमटीडीसी पर्यटक निवासाचे उद्घाटन
            पुणे, दिनांक 13- भीमाशंकर येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) भव्य पर्यटक निवास पर्यटकांच्या सेवेत रुजू केले आहे.  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे  भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरेविश्वस्त सुनील देशमुख, प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे वरिष्ठ व्यवस्थापिका क्षिप्रा बोरा यांच्‍या उपस्थितीत या पर्यटक निवासाचे उद्घाटन करण्यात आले.
           सर्व सोयींनी युक्त अशा या दुमजली पर्यटक  निवासात तळमजल्यावर 30 डीलक्‍स रूम, 3 व्‍हीआयपी सूट,   भव्य रेस्टॉरंट असून पहिल्या मजल्यावर 48 डीलक्स रूम आहेत. या ठिकाणी लोकनिवास असून कॉन्फरन्स हॉल आहेत. कॉन्फरन्स हॉल प्रोजेक्टरसह सर्वसोयीनी युक्त असून या ठिकाणी 45 कव्‍हर्ड  कार पार्किंग तयार आहेत. वाहन चालकांसाठी स्वतंत्र सोय आहे. पर्यटक निवासातील रेस्टॉरंटमध्ये स्वादिष्ट शाकाहारी भोजनाची व्यवस्था असून येथील खोल्या परवडणाऱ्या दरात पर्यटकांसाठी उपलब्ध करण्यात येत आहेत, अशी माहिती प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी दिली.
0000



Monday, August 12, 2019






अतिवृष्टी बाधित जिल्हा परिषदेच्या शाळांना तातडीने
 57 कोटीचा निधी उपलब्ध करुन देणार
- शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. आशिष शेलार
- शाळा दुरूस्ती, शैक्षणिक साहित्य,पोषण आहार, उपलब्ध करणार
                  - पूरग्रस्त विद्यार्थी पाठ्यपुस्तक योजना राबविणार

                पुणे, दि. 11: राज्यातील 21 जिल्ह्यातील 2 हजार 177 जिल्हा परिषद शाळांना फटका बसला असून त्यांची दुरुस्ती व पोषण आहार, शैक्षणिक साहित्य व पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी शाळांना 57 कोटीचा निधी आवश्यक असून तो निधी तातडीने शिक्षण विभागाकडून खासबाब म्हणून  देण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज पुण्यात केली.
        राज्यातील अतिवृष्टीबाधित शाळांचा आढावा गेल्या दोन दिवसांपासून शिक्षण विभागाकडून घेण्यात येत असून. त्याचा एकत्रित आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री ॲड. आशिष शेलार तातडीने पुणे दौऱ्यावर आले होते. पुर परिस्थिती ओसरल्यावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण मंत्री ॲड. शेलार यांनी आज सांगली, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर वगळून पुर बाधित जिल्ह्यातील संबंधितांची आढावा बैठक पुणे येथे घेतली. या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांकडून जिल्हे आणि तालुकानिहाय शाळांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.
        राज्यातील अतिवृष्टीमुळे आठ शिक्षण विभागापैकी सहा विभाग पुर परिस्थितीने बाधित झाले असून 21 जिल्ह्यातील 155 तालुक्यात नुकसान झाले आहे. या 21 जिल्ह्यात  जिल्हा परिषदेच्या 2 हजार 177 शाळा बाधित झाल्या आहेत. याचा फटका 1 लाख 63 हजार 275 विद्यार्थ्यांना बसेल असा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. तातडीने 53 पुर्ण वर्ग खोल्याचे बांधकाम करावे लागणार असून  2 हजार 177 शाळांच्या वर्ग खोल्या दुरुस्ती करावी लागणार आहे. 36 किचनशेड बाधित झाले असून 477 शाळांमध्ये शालेय  पोषण आहार बाधीत झाला आहे. तर 260 शाळांमधील 27 हजार 905 विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके ही पुरामुळे बाधित झाली आहेत. एकंदरीत यासाठी रुपये 57 कोटी एवढ्या निधीची गरज असल्याचे विभागीय उपसंचालक, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी कळविलेल्या अहवालातील माहिती आजच्या बैठकीत ॲड. शेलार यांच्या समोर संबंधित अधिकाऱ्यांनी मांडली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष अडचणीत येऊ नये आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण मंत्री ॲड. शेलार यांनी खास बाब म्हणून 57 कोटीचा निधी शिक्षण विभागातर्फे उपलब्ध करून देण्यात येईल असे या बैठकीत घोषित केले.
हा निधी थेट शाळेच्या बँक खात्यामधे जमा करण्यात येणार असून स्थानिक पातळीवर दुरुस्ती करण्यात येणार आहे.
        पूरग्रस्त भागातील शाळा पुन्हा सुरू करताना आरोग्याच्या दृष्टीने तो संपूर्ण शाळा परिसर संबंधित शासकीय यंत्रणेकडून निर्जंतुक करण्यात यावा तसेच पिण्याच्या पाण्याच्या टाक्या व वर्गखोल्यांची स्वच्छता याबाबत सविस्तर  परिपत्रक शिक्षण विभागाने काढावे, असे निर्देश या बैठकीत शिक्षणमंत्री ॲड. शेलार यांनी संबंधित अधिका-यांना दिले. ज्या शाळांमध्ये पुरग्रस्तांसाठी तात्पुरती निवा-याची व्यवस्था करण्यात आली आहे, आशा शाळांतील विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था नजीकच्या खाजगी शाळांमध्ये करता येईल का? अथवा दोन सत्रात शाळा भरविण्याची व्यवस्था होऊ शकते का ? याबबात स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात यावा, असे निर्देश बैठकीत शिक्षण अधिका-यांना शालेय शिक्षणमंत्री ॲड. शेलार यांनी दिले. ज्या ठिकाणी पुर परिस्थितीमुळे शाळा  पुन्हा वापरताना योग्य  ती स्वच्छता करण्यात यावी याबाबतही सूचना या बैठकीत देण्यात आल्या.
        पुर परिस्थितीनियंत्रणात आल्यानंतर सांगली, सिंधुदुर्ग व कोल्हापूर या जिल्हयांची माहिती गोळा करून त्यांचाही या योजनेत समावेश करून त्यांनाही निधी उपलब्ध करून देण्यात येईल. पुर परिस्थिती नियंत्रणात आल्याननंतर तातडीने शाळा दुरूस्ती होऊन शैक्षणिक कामकाज सुरू व्हावे, याउद्देशाने व विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आयोजित केलेल्या या बैठकीला अप्पर मुख्य सचिव शिक्षण विभाग वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, शिक्षण विभागातील सर्व संचालक, बालभारती, बोर्डाचे अध्यक्ष व सचिव आणि संबंधित बाधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी उपस्थित होते.
0000


Tuesday, August 6, 2019

आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे

                                                               पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
पुणे जिल्हयातील पूरस्थितीचा घेतला आढावा
      पुणे दि.1 : पुणे जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीमुळे  नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे बहुतांश धरणातून विसर्ग सुरू आहे. नुकसान झालेल्या भागात पंचनामे करून अहवाल सादर करा, नुकसानग्रस्तांना शासनाच्या निकषाप्रमाणे मदत केली जाईल. आपत्तीच्या काळात जिल्हयातील सर्व यंत्रणांनी समन्वय  ठेवत सतर्क रहावे, असे निर्देश महसूलसार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज दिले.
              पुणे जिल्हयात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री श्री. पाटील पुणे जिल्हयाच्या दौ-यावर आले होते. बालेवाडी येथील श्री. शिवछत्रपती क्रिडा संकुल सभागृहात पूरस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कामगारपर्यावरणमदत व पुनर्वसन ,भूकंप पुनर्वसन संजय (बाळा ) भेगडे, महापौर मुक्ता टिळक, पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव,  सर्वश्री आमदार बाबुराव पाचरणे,  राहुल कुल, योगेश टिळेकर, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त सौरभ राव, पिंपरी चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांच्यासह सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
                  पालकमंत्री पाटील म्हणाले, पुणे जिल्हयातील बहुतांश धरणे भरली आहेत. धरणक्षेत्रात पाऊस सुरूच आहे, आणखी दोन दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीत धरणांचे सनियंत्रण करावे, आरोग्य विभागाने दक्ष राहावे, आवश्यक त्या लशीसह औषधांचा पुरेसा साठा ठेवावा, गरजेप्रमाणे औषधांची मागणी तातडीने नोंदवावी,  सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करावी, तसेच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यासंबंधिचा अहवाल सादर करावा. असुरक्षित रस्ते, पुल बंद करा, कोणतीही दुर्घटना होणार नाही, याबाबतची काळजी घ्यावी, पुणे जिल्हयात पुढील दोन दिवस पावसाचा जोर राहील, असा अंदाज वेध शाळेने वर्तविला आहे.  त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, प्रशासन वेळोवेळी करत असलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पालकमंत्री  श्री. पाटील यांनी केले.
      राज्यमंत्री भेगडे यांनी मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे, त्या ठिकाणी पाण्याचा साठा होवून खोळंबा होणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी सूचना केली.
                जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले, पुणे जिल्हयात 917.48 मिलीमीटर पाऊस झाला आहे. बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदर वगळता उर्वरित सर्वच तालुक्यात अतिवृष्टीची परिस्थिती आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातून तीन मोठया नद्या वाहत आहेत, त्यामुळे योग्य दक्षता घेतली जात आहे. पुरस्थितीमुळे आतापर्यंत 3 हजार 343 कुटुंबाला स्थलांतरीत करण्यात आले असून यामध्ये 13 हजार 336 नागरिकांचा समावेश आहे. आपत्ती कालावधीत सर्व प्रशासकीय यंत्रणा सतर्क असून पूरबाधीत व्यक्तींचे पंचनामे करून नुकसान भरपाई त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, असे सांगून पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन समन्वयाने काम करीत असल्याचे जिल्हाधिकारी श्री. राम यांनी सांगितले. 
        पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी मनपार्फे करण्यात आलेल्या उपायायोजनांची माहिती दिली. भोजन, निवास व्यवस्था व स्वच्छता आदींची व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.   
                यावेळी आपत्ती व्यवस्थापनाशी सबंधित सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
लोणावळा, सांगवी व पिंपळेनिलख येथे भेट
लोणावळा येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनेत मयत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांची भेट घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांत्वन केले. यावेळी पुनर्वसन राज्य मंत्री संजय (बाळा) भेगडे,जिल्हाधिकारी नवल किशोर रामजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधवलोणावळ्याच्या नगराध्यक्ष सुरेखा जाधवउपनगराध्यक्ष श्रीधर पुजारीउप विभागीय अधिकारी संजय भागडे,लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन पवार तसेच पाटबंधारेसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
लोणावळ्यातील हनुमान टेकडी येथे भिंत पडून कुणाल अजय दोडके या 12 वर्षाच्या मुलाचे निधन झाले होते. भांगरवाडी येथे भिंत पडून जयप्रकाश जगन्नाथ नायडू (42 वर्षे) यांचे निधन झाले. पालकमंत्रीश्री. पाटील यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले. तसेच कुटुंबियांना आर्थिक मदतीचा धनादेश यावेळी प्रदान केले. तत्पूर्वीपरमार हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी मुलगी नंदिनी अजय दोडके हिची भेट घेऊन विचारपूस केली. तसेच सांगवी व पिंपळेनिलख भागातील पूरबाधितांच्या भेटी घेवून तेथील परिस्थितीची माहिती घेतली.







Monday, August 5, 2019

स्‍थानांतरीत कुटुंबियांची जिल्‍हाधिकारी राम यांनी केली विचारपूस
पुणे, दिनांक 5- अतिवृष्‍टीमुळे बाधित झालेल्‍या नागरिकांची विविध भागात राहण्‍याची सोय करण्‍यात आली आहे. आज जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी महात्‍मा फुले प्राथमिक विद्यालयात स्‍थानांतरीत  करण्‍यात आलेल्‍या कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली.  ढोलेपाटील रोड तसेच ताडीवाला रोड येथील नागरिकांची या विद्यालयात सोय करण्‍यात आली आहे. त्‍यांना भोजन, चहा-नाश्‍ता या शिवाय वैद्यकीय सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आल्‍या आहेत. जिल्‍हाधिकारी राम यांच्‍यासमवेत उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, पुणे महापालिकेचे सहायक आयुक्‍त दयानंद सोनकांबळे, नगरसेवक अरविंद शिंदे, मंगला मंत्री, प्रदीप गायकवाड, चांदबी नदाफ आदी उपस्थित होते. प्रशासनाच्‍या वतीने उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेल्‍या सोयीबद्दल नागरिकांनी समाधान व्‍यक्‍त केले. पूर ओसरल्‍यानंतर पंचनामे करण्‍यात येतील, असे जिल्‍हाधिकारी राम यांनी यावेळी सांगितले. 





  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...