पुणे , दि. 6
: भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज गुरुवार, 6
डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या त्यांच्या पुतळ्यास
अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुष्पहार
अर्पण करुन आदरांजली वाहिली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते,
स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी निर्णय, उपक्रम, धोरणे, विविध मोहिमा आणि विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवणे, दैनंदिन वृत्तविशेष प्रसारित करणे, राज्य शासन त्याचबरोबर पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेतल्या गेलेल्या विविध निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे, राज्य शासनाच्या विविध योजनांची व्यापक प्रसिद्धी करणे.
Thursday, December 6, 2018
Wednesday, December 5, 2018
जिल्ह्याबाहेर चारावाहतुकीस प्रतिबंध-जिल्हाधिकारी
जिल्ह्याबाहेर चारावाहतुकीस प्रतिबंध-जिल्हाधिकारी
पुणे दि. 5 : पुणे
जिल्ह्यामध्ये माहे सप्टेंबर,2018 अखेर सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी पडलेला असल्याने, तसेच यापुढील कालावधीमध्ये पावसाची अशाश्वती निर्माण
झाल्याने जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई व जनावरांना चारा टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे चाऱ्याची पळवापळवी होऊन त्यातून मोठ्या प्रमाणात कायदा व
सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यामध्ये शिल्लक असलेला चारा इतर जिल्ह्यात जाऊ नये व त्यामुळे कायदा
व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी तथा
जिल्हादंडाधिकारी, नवल किशोर राम यांनी
पुणे जिल्ह्यातून जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक करु नये यासाठी आदेश निर्गमित केले आहे. सदरचा आदेश, निर्गमित झाल्यापासून दोन महिन्याच्या कालावधी करीता अंमलात राहील, असे कळविले आहे.
00000
Tuesday, December 4, 2018
दिव्यांग उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय विशेष
रोजगार मेळावा
पुणे दि.४- जिल्हा
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रास्ता पेठ, पुणे व प्रहार
अपंग क्रांती आंदोलन वाघोली नं.१ ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी, ता.हवेली.जि.पुणे
येथे सकाळी १० वाजता फक्त दिव्यांग उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय विशेष
रोजगार मेळाव्याचे आयोजन असून, इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य
विकास, रोजगार व उद्योजकता सहायक संचालक अ.उ.पवार यांनी केले आहे.
पुणे जिल्हयातील पुणे शहर, रांजगणगाव, सणसवाडी,
चाकण या औद्योगिक परिसरातील एकूण -१८ उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला असून,
त्यांच्याकडून एकूण-७९६ रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत. ही सर्व रिक्तपदे फक्त
अस्थिव्यंग, मुक व कर्णबधीर उमेदवारांकरीता नोंदविण्यात आलेली आहेत.
जिल्हयातील जास्तीत जास्त दिव्यांग बेराजगार उमेदवारांना चांगले रोजगार
उपलब्ध करुन देण्याकरीता या रोजगार मेळाव्यामध्ये संधी उपलब्ध करुन देण्यात येणार
आहे. किमान १० वी, १२ वी पास, पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा, बीई इ.
शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या आणि फक्त वरील प्रवर्गातील दिव्यांग उमेदवारांनी
रविवार, दि. ९ डिसेंबर रोजीच्या मेळाव्याअंतर्गत खाजगी क्षेत्रातील उपलब्ध असणाऱ्या
विविध प्रकारच्या जागांसाठी प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे. मुलाखतीस येताना उमेदवारांनी
आपली सर्व मुळ शैक्षणिक कागदपत्रे, आपला अपंगत्वाचे प्रमाण व प्रकार दर्शविणारा
अपंगत्वाचा दाखला, पासपोर्ट साईज फोटो, अर्जाच्या व आधारकार्डच्या प्रती सोबत आणाव्यात,
असेही सहायक संचालक श्रीमती पवार यांनी कळविले आहे.
००००
Friday, November 23, 2018
टंचाई परिस्थितीवर मात
करण्यासाठी
सर्व प्रमुख धार्मिक
न्यासाच्या विश्वस्तांनी मदत करावी
पुणे,दि.२२- राज्याच्या अनेक जिल्हयांत टंचाई परिस्थिती
निर्माण झाली असून परिणामी चारा टंचाई व पाणी टंचाईमुळे पशुधनावर परिणाम होणार
आहे. यासाठी पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर जिल्हयांतील मंदिर,
मस्जिद,चर्च इत्यादी सर्व प्रमुख धार्मिक न्यासाच्या विश्वस्तांनी दुष्काळी
परिस्थितीवर मात करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन राज्याचे धर्मादाय आयुक्त
शिवकुमार डिगे यांनी केले आहे.
पुणे येथील विधान भवनाच्या पाठीमागील
अल्पबचत हॉलमध्ये पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर जिल्हयातील
प्रमुख धार्मिक न्यासाच्या विश्वस्तांनी
जिल्हयातील चारा छावण्यांच्या नियोजनासंदर्भात चर्चा व योग्य ती कार्यवाही
करण्यासाठी प्रमुख धार्मिक न्यासाच्या विश्वस्तांची बैठक राज्याचे धर्मादाय आयुक्त
शिवकुमार डिगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी
पुणे विभागाचे धर्मादाय सह आयुक्त दिलीप देशमुख, धर्मादाय उपआयुक्त नवनाथ
जगताप,अधीक्षक अभिजित अनाप, के. डी.शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी पुण्याचे धर्मादाय उप आयुक्त
नवनाथजी जगताप व काही धार्मिक न्यासाच्या विश्वस्तांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक धर्मादाय सह आयुक्त दिलीप देशमुख यांनी केले तर उपस्थितांचे आभार
अधिक्षक के.डी.शिंदे यांनी मानले. यावेळी
धार्मिक न्यासाचे विश्वस्त उपस्थित होते.
००००
Saturday, September 29, 2018
कालवा बाधितांना मदत करणार - पालकमंत्री बापट
कालवा बाधितांना मदत करणार
- पालकमंत्री बापट
पुणे, दिनांक 29- पुणे
महानगरपालिका हद्दीतील पर्वती भागातून वाहणारा मुठा उजवा कालवा फुटून नुकसान
झालेल्या घरांच्या पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण झाले असून त्यांना खास
बाब म्हणून मदत देण्याबाबतचा 3 कोटी रुपयांचा प्रस्ताव तात्काळ पाठविण्याच्या
सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. गिरीश बापट यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी
कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी
डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, तहसिलदार गीता दळवी, हेमंत निकम आदी उपस्थित
होते.
पालकमंत्री
श्री. बापट म्हणाले, कालवा फुटण्याची दुर्घटना ही नैसर्गिक आपत्ती
म्हणून गृहीत धरण्याबाबत विनंती करण्यात यावी. शासनाच्या मदत व पुनर्वसन
विभागाच्या निर्णयानुसार कालवाबाधितांना नुकसान भरपाई मिळेलच, पण हानीची तीव्रता पहाता
खास बाब म्हणून 3 कोटी रुपयांच्या मदतीची विनंती करणारा प्रस्ताव तात्काळ
पाठवावा. हा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. कालवाबाधित
भागातील घरांचे पंचनामे पूर्ण झालेल्या
संपूर्ण कुटुंबाची यादी त्या भागातील स्वस्त धान्य दुकानदारांकडे देऊन संबंधित
कुटुंबांना धान्य वाटप करण्यात यावे, यावेळी नियंत्रण व
देखभालीसाठी जिल्हा प्रशासनाचा प्रतिनिधी असावा, असेही ते म्हणाले.
मुठा
उजवा कालवा फुटून या भागातील घरांमध्ये पाणी जाऊन त्यांच्या घरातील चीजवस्तूंचे
नुकसान झाले आहे. हानीची तीव्रता पहाता शासनाकडून भरीव मदतीची गरज असल्यामुळे 3
कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात यावा, असे पालकमंत्री श्री. बापट यांनी सांगितले.
0000
शौर्य दिन
-पालकमंत्री गिरीश बापट
पुणे दि. 29 - देशाला सुरक्षित
ठेवण्यासाठी सैनिक नेहमीच कर्तव्यदक्ष असतात. अशा सैनिकांच्या कुटूंबास व सैनिकांना
कोणतीही अडचण येणार नाही. अडचण आल्यास ती सोडविणे हे पालकमंत्री म्हणून माझे कर्तव्य
आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
शौर्य दिनानिमत्त जिल्हाधिकारी
कार्यलयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, कर्नल
सदानंद साळुंखे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार, जिल्हा माहिती अधिकारी
राजेंद्र सरग, आदि उपस्थित होते.
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले,
शौर्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांसमोर मनोगत व्यक्त
करणे हे माझे भाग्य आहे. एस.टी.पास, पेन्शन, नौकरी इत्यादी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री म्हणून कटीबद्ध आहे. शब्दांचे सामर्थ्य हे कर्तृत्वावर अवलंबून असते. सैनिक हा शब्दच देशासाठी
लढणाऱ्या जवानांच्या कर्तृत्वाची ओळख करुन देतो.
Friday, September 7, 2018
लोकराज्य वाचक मेळावा
लोकराज्य अंकाचे नियमित वाचन ही यशाची गुरुकिल्ली – प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे
पुणे दि. ६- माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने लोकराज्य हे मासिक प्रकाशित करण्यात येते. तरुणांनी हे मासिक आवर्जून वाचावे. लोकराज्य मासिक करीयर घडवण्यासाठी गरजेचे असून ती यशाची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन वाघीरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी केले.
डॉ. घोरपडे म्हणाले, आजच्या पिढीत समाज माध्यमांचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे वाचनाची सवय मात्र नष्ट होतांना दिसत आहे. लोकराज्य वाचक मेळाव्यातून वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यसाठी मदत होणार आहे. लोकराज्य या अंकातील प्रत्येक पान वाचनीय आहे. जसा हा अंक स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचा आहे तसाच तो आयुष्यात यशस्वी होण्यासाठी गरजेचा आहे. वाचन हा विद्यार्थ्याचा आत्मा आहे, त्यामुळे वाचनाकडे लक्ष देऊन लोकराज्य अंक नियमित घेण्याचे आवाहन देखील यावेळी डॉ. घोरपडे यांनी केले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी लोकराज्य मासिकाचे महत्व सांगीतले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले, लोकराज्य मासिक हे स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे आहे. वाचनाने विचारांची कक्षा रुंदावते. या मासिकातील प्रत्येक पान आपणास विचारांनी समृद्ध करेल. देशाची भावी पिढी वाचनातून प्रगल्भ होण्यासाठी लोकराज्य वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे देखील श्री.सरग म्हणाले.
लोकराज्य वाचक मेळाव्याची संकल्पना तसेच उद्देश याबाबत ज्ञानेश भुकेले यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुनिता कोलते, यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.संजय लांडगे यांनी मानले. कार्यक्रमाला विलास कसबे, नीलिमा आहेरकर, वैशाली रांगणेकर, विशाल कार्लेकर, संतोष मोरे,दिलीप गांगुर्डे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठया संख्यने उपस्थित होते.
लोकराज्य अंकावरील परीक्षेत
५०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
वाघिरे महाविद्यालयाच्या वतीने लोकराज्य वाचक मेळाव्याच्या निमित्ताने लोकराज्य अंकावर आधारित परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या परीक्षेस भरघोस प्रतिसाद दिला. ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग घेतला होता.
Subscribe to:
Posts (Atom)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...
-
स्टार्टअप उद्योगांनी कृषी क्षेत्रातही काम करावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन: आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे उद्घाटन पुणे, दि. १३...
-
लोकसंवाद उपक्रमाद्वारे मुख्यमंत्र्यांनी साधला लाभार्थ्यांशी संवाद पुणे , दि .2 :- शासनाच्या विविध योजना गरजूंपर्य...
-
चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम गतीने मार्गी लावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश ...