आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
पुणे, दि. 21: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयुष मंत्रालय,भारत सरकार,शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सुचनेनुसार पुण्यामध्ये जिल्हा प्रशासन, शालेय शिक्षण विभाग व उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरु युवा केंद्र, योगा संघटना, बी.जे.महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बी.जे.महाविद्यालयाच्या मैदानावर जिल्हास्तरीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी प्रार्थनेने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय योग परीक्षक हेमा शहा यांनी उपस्थितांना योगविषयी माहिती दिली. व्यासपीठावर स्कूल ऑफ योगा ॲण्ड रिसर्च सेंटरच्या विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिके करुन दाखविली व त्यानुसार उपस्थितांनी योगाभ्यासातील सर्व आसनांची प्रात्यक्षिके केली. यावेळी उपस्थितांना योग मार्गदर्शिका पुस्तिकेचे वाटपही करण्यात आले.
००००
No comments:
Post a Comment