माजी राष्ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांना मेक्सिको सरकारचा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान
सेनापती बापट रस्त्यावरील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजच्या पाचव्या मजल्यावरील सभागृहात हा कार्यक्रम झाला.यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. शां.ब. मुजूमदार, डॉ. देविसिंह शेखावत, ज्योती राठोड, मोहन जोशी, उल्हास पवार, शरद रणपिसे,डॉ. शिवाजीराव कदम, चंद्रकांत शिवरकर, डॉ. के. एम. संचेती, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमती पाटील म्हणाल्या, राष्ट्रपतीपदी असतांना मेक्सिको आणि भारत देशामध्ये विविध क्षेत्रातील परस्पर सामंजस्य करार करण्यात आले. दोन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध वाढवण्यावर भर देण्यात आला. हे सर्व करत असतांना मी देशाचे प्रतिनिधीत्व केले. त्यामुळे हा पुरस्कार म्हणजे माझ्या देशाचा गौरव आहे. दोन्ही देशांच्या मैत्रीचा गौरव आहे. देशाच्या राष्ट्रपतीपदी असतांना सन 2007मध्ये मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष फेलिपी डी जेझस कॉल्डेरॉन हिनोजोसा यांनी भारताला भेट दिली होती. त्यानंतर मी 2008 मध्ये मेक्सिकोला भेट दिली होती. या काळात दोन्ही देशांदरम्यान असलेले संबंध अधिक बळकट झाले होते, अशी आठवण श्रीमती पाटील यांनी यावेळी सांगितली.
कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारी तसेच त्यांच्या मेक्सिको भेटीवरील व्हिडीओ चित्रफीत दाखवण्यात आली. श्रीमती मेल्बा प्रिया यांचे स्वागत ज्योती राठोड यांनी तर डॉ. देविसिंह शेखावत यांचे स्वागत डॉ. जसवंत पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा शहा यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. शैलेश गुजर यांनी केले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते..
No comments:
Post a Comment