चित्रप्रदर्शन आणि कलापथक
शासनाचे स्तुत्य उपक्रम
पुणे शहरात संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या
पालख्यांचे आगमन झाले आहेत. त्यासोबत लाखो वारकरी पुण्यनगरीत आलेले आहेत. संत
ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे दर्शन एका
रांगेत वारकरी मनोभावे घेत आहेत. भवानी पेठेतील सावित्रीबाई फुले प्रशालेत लावलेले
चित्रप्रदर्शन सगळयांचे आकर्षण ठरत आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनायच्या वतीने आषाढी वारीचे औचित्य साधून 'संवादवारी'
हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे. लाखो भाविक या वारीत सहभागी होतात. संपूर्ण
राज्यातून वारकरी पंढरपूरात विठ्ठलाच्या दर्शनसाठी येतात.
'संवादवारी' संबंधी आपली प्रतिक्रिया व्यक्त करतांना ज्ञानेश्वर
महाराजांच्या रथापुढील दिंडी क्रमांक एकचे प्रमुख श्री. राणोजी वासकर महाराज म्हणाले,
विसाव्यासाठी दरवर्षी आम्ही या ठिकाणी थांबतो. या शाळेच्या प्रवेशद्वारावर लावलेले
चित्ररथही सर्वांना आकर्षून घेत आहे, खरोखरच हा चांगला उपक्रम आहे. या उपक्रमास
माझ्या शुभेच्छा.
*****
No comments:
Post a Comment