विद्यार्थीच देशाचा कणा आणि केंद्रबिंदू आहेत
-पालकमंत्री गिरीश बापट
पुणे दि. 25- विद्यार्थी देशाचा कणा आणि केंद्रबिंदू आहेत. त्यामुळे त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण आणि शैक्षणिक सुविधा देण्यासाठीच शासनाच्या विविध योजना आहेत. विद्यार्थी दशेत चांगले शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी स्वत:चे भवितव्य घडवावे, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन तथा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
येथील अल्पबचत भवन येथे आयोजित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव, अंतर्गत मुला-मुलींच्या वसतिगृहस्तरावरील विविध उपक्रमांचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकास विभागाचे आयुक्त रामचंद्र कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगूरू विलास गायकर, बि. डी. काळे महाविद्यालयाचे प्राचार्य इंद्रजित जाधव, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते, स्टार्टअप ट्रायबल या योजनेचे तसेच संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. तसेच पुणे विद्यापीठाबरोबर वस्तिगृहातील शैक्षणिक प्रगतीबाबत आढावा घेण्यासाठीचा सामंजस्य करार तसेच वसतिगृहातील विविध कामांचे मुल्यमापन करण्यासाठीचा गोखले महाविद्यालया सोबतचा सामंजस्य करार यावेळी त्यांच्या हस्ते सबंधितांकडे हस्तांतरीत करण्यात आला. तसेच ज्ञानदर्पन या पुस्तकाचे, वस्तिगृह व आश्रमशाळेच्या कॅलेंडरचे प्रकाशन श्री. बापट यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आदिवासी विकास विभागाचे आयुक्त रामचंद्र कुलकर्णी यांचा निवृत्ती सत्कार देखील करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
●वसतीगृहातील विद्यार्थांची गुणवत्ता मुल्यमापनासाठी विशेष कक्ष ●
00000
No comments:
Post a Comment