Monday, August 14, 2017

पालकमंत्री गिरीश बापट यांच्याहस्ते पुण्यात मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न


पुणे, दि. १५ -  भारतीय स्वातंत्र्याच्या 70 व्या वर्धापना दिनानिमित्त पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्याहस्ते आज विधान भवनाच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजवंदन झाले. विधान भवन परिसरात सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी ध्वजवंदनाचा शानदार समारंभ पार पडला.
पालकमंत्री गिरीश बापट यांचे सकाळी नऊ वाजता विधानभवन येथे आगमन झाले. विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनतर पालकमंत्र्यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजवंदनानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, प्रशासकीय अधिकारी आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांसह महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, खासदार अमर साबळे, आमदार भिमराव तापकीर, आमदार माधुरी मिसाळ, आमदार शरद रणपिसे, आमदार जयदेव गायकवाड, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी सौरभ राव,अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, पदाधिकारी, नागरिक, पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.
00000000












No comments:

Post a Comment

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...