पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुण्यात स्वागत
पुणे,
दि. 13 (वि.मा.का.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज वसंतदादा
शुगर इन्स्टिट्यूट, पुणे येथे आयोजित "शुगरकेन व्हॅल्यू चेन-व्हिजन 2025 शुगर" आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनकार्यक्रमास
उपस्थित राहण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या विमानाने लोहगाव विमानतळावर सायंकाळी
4.35 वाजता आगमन झाले.
राज्यपाल
सी.विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी पुष्पगुच्छ देवून
पंतप्रधान श्री. मोदी यांचे स्वागत केले. तसेच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट,
सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार सर्वश्री रावसाहेब दानवे, अनिल
शिरोळे, अमर साबळे,आमदार सर्वश्री संजय भेगडे, लक्ष्मण जगताप,
पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, लष्कराचे मेजर जनरल मनोज ओका, एअर कमांडर
ए.के. भारती, विभागीय आयुक्त
एस.चोक्कलिंगम,पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी सौरभ राव यांनीही यावेळी
श्री. मोदी यांचे स्वागत केले.
००००
--
No comments:
Post a Comment