Saturday, October 1, 2016

महात्मा गांधी, लाल बहादुर शास्त्री यांना जयंती दिनानिमित्त अभिवादन

महात्मा गांधी, लाल बहादुर शास्त्री यांना
जयंती दिनानिमित्त अभिवादन
            पुणे, दि. 2 – राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीदिनानिमित्त आज अभिवादन करण्यात आले.
            पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात विभागीय आयुक्त एस.चोक्कलींगम यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.जय जाधव,निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, उपायुक्त श्रीमती कविता द्विवेदी तसेच विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
***** 

लोकशाही दिन
सोमवारी होणार
          पुणे, दि. 2 : जिल्हा लोकशाही दिनाचे आयोजन महिन्याच्या पहिल्या सोमवारी दुपारी  1-00 वाजता आयोजित केले जातेऑक्टोबर, 2016 चा लोकशाही दिन सोमवार  3 ऑक्टोबर, 2016 रोजी दुपारी ठिक एक वाजता  जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात होणार आहेयाची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
***** 









No comments:

Post a Comment

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...