औषध निर्मितीमध्ये हाफकिनची
दर्जेदार उत्पादने :
अन्न व औषध
प्रशासन मंत्री बापट
पुणे, दि. 1: औषध निर्मिती
क्षेत्रात कंपन्यामध्ये खूप स्पर्धा आहे. यामध्ये हाफकिनने दर्जेदार उत्पादन निर्माण करुन सातत्य राखले आहे. असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री तथा
जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
हाफकिन जीव – औषध निर्माण महामंडळाच्या 42 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात बोलत होते. यावेळी आमदार गौतम चाबुकस्वार, महामंडळाच्या कार्यकारी संचालिका श्रीमती सीमा व्यास, महाव्यवस्थापक सुभाष शंकरवार, भारतीय कामगार सेनेचे चिटणीस जयसिंग पवार आदिची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी
पालकमंत्री बापट म्हणाले की, या संस्थने
विविध उत्पादनाद्वारे समाजाप्रती असणारे कर्तव्य पार पाडले आहे. सर्पदंशाचे आगळे- वेगळे उत्पादन व अन्य उत्पादन केले जाते. भविष्यात या संस्थेच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने प्रयत्न
केले जातील. पुढील वर्धापन दिनी निश्चित
चांगली प्रगती झालेली दिसेल असा आत्मविश्वास श्री.बापट यांनी व्यक्त केला.
या संस्थेच्या
रम्य परिसरात भविष्यात नवीन संशोधन करुन आणखी काय उत्पादन करता येईल याचा विचार
केला जाईल. संस्थेबरोबर येथे काम करणाऱ्या
कामगारांची भरभराट होवो अशा शुभेच्छा पालकमंत्री बापट यांनी व्यकत केल्या.
याप्रसंगी
आमदार गौतम चाबुस्कवार यांनी या संस्थेद्वारे मानवी जीवनाशी निगडीत मौल्यवान औषधे
निर्माण केली जातात. या परिसरात
अन्य उत्पादन वाढविण्याबाबत विचार व्हावा असे प्रतिपादन केले.
प्रारंभी
संस्थेच्या व्यस्थापकीय संचालिका श्रीमती सीमा व्यास यांनी मान्यवरांचे स्वागत
केले.
तसेच प्रास्ताविकात चांगल्या गुणवत्तेची औषधे निर्माण
व्हावी या उद्देशाने संस्थेची निर्मिती झाली.
त्याच उद्देशाने वाटचाल करीत 42 वर्षे पुर्ण झाली असे सांगितले. त्याचप्रमाणे संस्थेच्या वाटचालीची माहिती दिली.
यावेळी
जयसिंगराव पवार यांचेही भाषण झाले.
000000
No comments:
Post a Comment