उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कारासाठी अर्ज करावेत
पुणे, दि. 20 : महाराष्ट्र शासनाच्या उच्च
व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य
सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, त्यांना अधिक चांगल्या सेवा
देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी 'डॉ.
बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय' पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीस योगदान देणाऱ्या
सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील कार्यकर्ता व सेवक यांनी अधिक चांगल्या सेवा
देण्यासाठी प्रवृत्त व्हावे व त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून 'डॉ .एस आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक
ग्रंथमित्र' पुरस्कार
देण्यात येतो .
राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील
अ, ब, क, व ड वर्गातील
उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रुपये पन्नास हजार, रूपये तीस हजार, रूपये वीस हजार, रूपये दहा हजार रोख स्वरुपात, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह
सन्मानपूर्वक देऊन सन्मानित करण्यात येते.
राज्यस्तरीय प्रत्येकी एक उत्कृष्ट
कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी रुपये पंचवीस हजार रोख पारितोषिक, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभाग स्तरावर प्रत्येकी
एक कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी रुपये पंधरा हजार रोख पारितोषिक, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येते.
सन 2016-17 च्या पुरस्कार योजनेत सहभागी होण्यासाठी ग्रथालय, कार्यकर्ते
व सेवक यांनी आपले विहीत नमुन्यातील अर्ज दि. 10 सप्टेंबर,
2016 पर्यत दोन प्रतीत जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्याकडे
सादर करावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले
आहे.
0000
No comments:
Post a Comment