Thursday, August 11, 2016

शेतकरी व विकास कार्यकारी सोसायटया केंद्रबिंदू मानून अधिकाऱ्यांनी कार्य करावे ... सहकार मंत्री सुभाष देशमुख

सहकार विभागातील प्रशिक्षण लेखापरिक्षण अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेला सुरुवात
शेतकरी विकास कार्यकारी सोसायटया
केंद्रबिंदू मानून अधिकाऱ्यांनी कार्य करावे
                                                        ... सहकार मंत्री सुभाष देशमुख
            पुणे, दि. 11 –  शेतकरी, गांव विविध विकास कार्यकारी सोसायटया सहकाराचा गाभा असून त्यांना केंद्रबिंदू मानून सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्य करावे अशी सूचना सहकार, पणन वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे केली. सहकार विभागातील प्रशिक्षण लेखापरिक्षण अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेला जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. याप्रसंगी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
                यावेळी व्यासपिठावर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, सहकार विभागाचे प्रधान सचिव एस.एस.संधू, सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, अप्पर सहनिबंधक राजेश जाधवर हे उपस्थित होते.
                सहकार विभागातील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख पुढे म्हणाले की, विविध कार्यकारी सोसायटयांमध्ये ठेवी ठेवण्याचे प्रमाण वाढले पाहिजे. त्यासाठी या सस्थांनी ग्रामीण भागातील जनतेमध्ये आपली विश्वासार्हता वाढविली पाहिजे. विविध कार्यकारी सोसायटयांमध्ये जिवंतपणा आणला तर शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बदलता येईल. सहकार क्षेत्रातील गैरप्रकार थांबविणे आव्हानात्मक असून अधिकाऱ्यांनी त्याकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे असे सांगून सहकार विभागातील अधिकाऱ्यांनी सहकारी संस्थांचे लेखापरिक्षण काटेकोरपणे करावे अशी अपेक्षा सहकार मंत्रयांनी यावेळी व्यक्त केली. संचालक मंडळांनी जाणिवपूर्वक केलेल्या चूकांना गैरप्रकारांना अधिकाऱ्यांनी संरक्षण देऊ नये असे निर्देश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. सहकारातून समृध्दीकडे-महाराष्ट्र या ध्येयाने अधिकाऱ्यांनी काम करावे अशीही सूचना त्यांनी केली.
                सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी, अशाप्रकारच्या कार्यशाळेतून अधिकाऱ्यांना कायद्याबद्दल सखेाल ज्ञान मिळते असे सांगून सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने दूर कराव्या अशी सूचना केली.
                सहकार विभागाचे प्रधान सचिव एस.एस.संधू म्हणाले की, लेखापरिक्षण हा सहकाराचा महत्वाचा भाग असून अधिकाऱ्यांनी जबाबदारीने कायद्यातील तरतूदीनुसार सहकारी सस्थांचे लेखापरिक्षण करावे असे सांगितले.
                सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी कार्यशाळा आयोजनाचा हेतू विषद करुन सहकार विभागातील कार्याचा आढावा सादर केला. राज्यामध्ये 1,96,907 एवढया सहकारी संस्था कार्यरत असून विभागातील अधिकाऱ्यांनी अर्धन्यायीक प्रकरणे तातडीने निकाली काढावे असे सांगितले.
                या कार्यशाळेला राज्यातील सर्व विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा विशेष लेखा परिक्षक सहकार विभागातील अधिकारी उपस्थित होते.

000

No comments:

Post a Comment

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...