शहरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
पुणे, दि. 4: संबंधित ध्वनीनियंत्रण प्राधिकरण व जिल्हाधिकारी यांनी कायदा व सुव्यवस्था लक्षात घेवून प्रत्येक वर्षी गणेश उत्सवाच्या एक महिना आधी ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक (लाऊड स्पीकर व डी. जे.) यांच्या वापरासाठी चार दिवस निश्चित करुन जाहिर करावेत असे निर्देश दिलेले आहेत.
पुणे शहराचे पोलीस आयुक्त यांचे प्रतिनिधी, पोलीस निरीक्षक पुणे ग्रामीण पुणे यांचे प्रतिनिधी तसेच प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, पुणे यांचे प्रतिनिधी यांच्या दि. 29 जुलै, 2016 रोजी झालेल्या बैठकीत सदर दिवस निश्चित करणेबाबत सर्वंकष चर्चा करण्यात आली व सर्वांच्या सहमतीने दि. 5 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर, 2016 या गणेशोत्सवाच्या कालावधीतील दि. 6 सप्टेंबर, 7 सप्टेंबर, 9 सप्टेंबर व 10 सप्टेंबर या चार दिवशी व जिल्हाधिकारी यांच्या अधिकारातील दोन दिवसांपैकी दि. 11 सप्टेंबर, 2016 हा एक दिवस असे एकूण 5 दिवस निश्चित करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सदर 5 दिवस ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 च्या नियम 5 चा उपनियम (3) नुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यंत्रणेचा वापर ध्वनीची विहीत मर्यादा राखून सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ध्वनी प्रदुषण नियम 2000 मधील नियम 3 व 4 चे अनुपालन करण्यात यावे, झोनींग प्रमाणे ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज ठेवू नये व ध्वनीचे शोषण करणारी विशिष्ट लाकडी सामुग्री आवश्यक त्या ठिकाणी लावावी या अटींवर ही परवानगी देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment