Wednesday, August 17, 2016

शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कृषी मालाच्या मुल्यवृध्दीवर भर द्यावा - कृषि आयुक्त विकास देशमुख






शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून
शेतकऱ्यांनी कृषी मालाच्या मुल्यवृध्दीवर भर द्यावा
-         कृषि आयुक्त विकास देशमुख

पुणे, दि. 17: राज्यातील शेतकरी उत्पादन वाढीत प्रगत झाले आहेत, मात्र त्यांनी आपल्या कृषी मालाच्या     मुल्यवृध्दीवर भर देणे आवश्यक असून  शेतकरी उत्पादक कंपनींच्या माध्यमातून हे शक्य आहे. यापुढचे दिवस हे शेतकरी उत्पादक कंपन्यांचेच असतील असे प्रतिपादन कृषि आयुक्त विकास देशमुख यांनी केले.
     पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या स्मरणार्थ शेतकरी दिनानिमित्त येथील मध्यवर्ती इमारतीमधील पद्मश्री सभागृहात आयोजित प्रगतशील शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सत्कार कार्यक्रमात श्री. देशमुख बोलत होते. यावेळी कृषि संचालक के.व्ही. देशमुख, एस. एल. जाधव, पी.एन. पोकळे, सुभाष खेमकर, श्री. घावटे, पणन विभागाचे सह निबंधक रमेश शिंगटे, विभागीय कृषि सहसंचालक विजयकुमार इंगळे उपस्थित होते.
     श्री. विकास देशमुख म्हणाले, राज्यातील एकुण शेतकऱ्यांपैकी 78 टक्के शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. त्यामुळे गट शेती शिवाय पर्याय नाही. यासाठी कृषि विभागाने शेतकरी गटांची संकल्पना तयार केली असून या संकल्पनेला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राज्यात सव्वा लाख शेतकऱ्यांचे बचत गट तर 800 शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना झाली आहे. आपले शेतकरी उत्पादन वाढ करण्यात माहिर आहेत, मात्र त्यांनी आता पॅकेजींग आणि मार्केटींगकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांचे हे संघटन कायम राहण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने शासन लवकरच धोरण निश्चित करणार आहे. आपल्या कृषिमालाचे मुल्यवृध्दी करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांना पर्याय नाही, यामाध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दीड पट वाढ होत असल्याचे         श्री. देशमुख यांनी सांगितले.
      यावेळी रमेश शिंगटे यांनी मार्गदर्शन केले. तसेच शेतकरी प्रतिनिधी म्हणून अन्वर शेख, वाघजाई कृषी महिला बचत गटाच्या सुवर्णा शेडगे यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा कृषी अधिक्षक सुभाष काटकर यांनी पद्मश्री डॉ. विखे यांच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक के.व्ही. देशमुख यांनी केले. तर आभार दिलीप झेंडे यांनी मानले.
******* 



यादी

सन्मानित शेतकरी उत्पादक कंपनी

 कोकण विभागात आदिती शेतकरी  उत्पादक कंपनी लि.,  मु. पो. वडखळ, ता. पेण,             जि. रायगड
कोकण रत्न कृषी उत्पादक प्रक्रीयादार प्रो कं. लि. रत्नागिरी
नाशिक विभागात संत चांगदेव तापी पुर्णा शेतकरी उत्पादक कंपनी लि. मु. पो. चांगदेव,           ता. मुक्ताई नगर, जि. जळगाव
पुणे विभागात
       अहमदनगर जिल्ह्यात अगस्ती शेतकरी उत्पादक कंपनी लि.,  मु. पो. मेहंदुरी, ता. अकोले, जि. अहमदनगर
      पुणे ‍जिल्ह्यात वाघजाई महिला कृषि बचत गट, मु. पो. रिहे (शेडगेवाडी), ता. मुळशी,        जि. पुणे.  बहुळावन ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लि.,  मु. पो. बहुळ, ता. खेड, जि. पुणे.  राधानाथस्वामी फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लि.,  मु. पो. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे
   सोलापूर जिल्ह्यात भोसे ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लि. मु. पो. भोसे, ता. पंढरपूर, जि. पुणे
   कोल्हापूर विभागात फरांदवाडी कृषि क्रांती ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लि. मु. पो. फरांदवाडी, त ता. फलटण
   औरंगाबाद विभागात क्रिएटिव्ह शेतकरी प्रोड्युसर कंपनी लि., मु. पो. बोरखेड, ता. जि. बीड
   लातूर विभागात ओम साई आधुनिक फार्मर्स प्रोडृयुसर कंपनी, मु. पो. लातूर, ता. जि. लातूर
   अमरावती विभागात इंद्रधनु शेतकरी उत्पादक कंपनी लि. मु. पो. देऊळगाव घाट, ता. जि. बुलढाणा
   नागपूर विभागात नागपूर विभाग फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि.,  मु. पो. नागपूर, ता. जि. नागपूर



No comments:

Post a Comment

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...