डोंगरी विकासात लोकप्रतिनिधींच्या सूचनांची अंमलबजावणी करावी-पालकमंत्री
गिरीश बापट
डोंगरी विकासासाठी 7 कोटी 20 लाखांचा निधी उपलब्ध
पुणे दि. 02: राज्यातील सर्व भागांचा समतोल विकास व्हावा असे शासनाचे
धोरण आहे. त्यादृष्टीने योजनांची आखणी करण्यात येते. हे करीत असताना डोंगरी विभागाच्या
काही विशिष्ट गरजा आहेत हे लक्षात घेऊन लोकप्रतिंनींधी या भागाच्या विकासासाठी केलेल्या
सूचनांची दखल घ्यावी व त्यानुसार विकास कामांचे नियोजन करावे असे निर्देश पालकमंत्री
गिरीश बापट यांनी आज येथे जिल्हा प्रशासनाला दिले.
जिल्हयातील आंबेगांव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी,
भेार, वेल्हे, पुरंदर व हवेली या तालुक्यांतील डोंगरी भागातील विकास कामांसाठी प्रत्येकी
80 लाख रुपयांप्रमाणे एकूण 7 कोटी 20 लाख रुपयांचा निधी शासनाने उपलब्ध करुन दिला आहे.
या निधीतून करण्यात येणारी व प्रस्तावित करण्यात आलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी
आयोजित बैठकीत पालकमंत्री बापट बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप
कंद, आ.दिलीप वळसे पाटील, आ.सुरेश गोरे, आ.शरद सोनवणे, आ.भिमराव तापकीर, जिल्हाधिकारी
सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, समितीचे सदस्य विश्वास
ननावरे, श्रीमती कलावती पोटकुळे उपस्थित होते.
यावेळी बोलताना, पालकमंत्री बापट यांनी डोंगरी
विकास कामांचे नियोजन करताना पिण्याच्या पाण्याच्या व सिंचनाच्या कामाला प्राधान्य
देण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. यावेळी तालुक्यातील डोंगरी भागातील अंतर्गत रस्ते
तयार करणे, पाणी पुरवठयाची कामे, अंगणवाडी इमारत बांधकामासंबधी लोकप्रतिनिधींनी महत्वपूर्ण
सूचना केल्या. त्यानुसार कामाचे नियोजन करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ
राव यांनी दिली.
000
No comments:
Post a Comment